स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती फिरत राहणे हीदेखील त्याची आणखी एक गती आहे.
*
आधी अंतरंगामध्ये असणाऱ्या आत्म्याविषयी सचेत व्हा, मग विचार करा आणि तदनंतर कृती करा. सर्वंकष चैतन्यमय विचार हा ज्याची पूर्वतयारी चालू आहे असे एक जग असते आणि सर्व खऱ्या कृती म्हणजे आविष्कृत झालेला विचार असतो. एक सत्य-कल्पना (Idea) दिव्य आत्म-चेतनेमध्ये क्रीडा करू लागली आणि त्यातून हे जडभौतिक जग अस्तित्वात आले.
– श्रीअरविंद (CWSA 13 : 200)
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…
सर्व भावभावनांच्या पलीकडे आपल्या अस्तित्वाच्या निःशब्द आणि अक्षोभ गहनतेमध्ये एक प्रकाश सातत्याने उजळलेला असतो, तो…
स्वत:च्या आत्म्याचा शोध घेण्यात आणि आत्मसत्तेनुसार जीवन जगण्यामध्ये आलेले अपयश ही खरोखरच मनुष्याची एकमेव…
पृथ्वीवरील समग्र जीवसृष्टीमध्ये केवळ मानवाला एक आगळीवेगळी क्षमता परमेश्वराने बहाल केली आहे. स्वतःला वेगळे…
एक अशा प्रकारचा ऊर्जास्रोत असतो की, ज्याचा एकदा शोध लागला की मग बाह्य परिस्थिती…