महायोगी ‘श्रीअरविंद’ व दिव्यत्वाच्या प्रवासातील त्यांच्या सहयोगिनी ‘श्रीमाताजी’ यांनी भारतीय वेदपरंपरा, संस्कृती, संत परंपरा, भारतीय तत्त्वज्ञान यापासून सुरुवात करून, त्याही पलीकडे जाणाऱ्या विचारांची मांडणी केली आहे. अध्यात्म क्षेत्रातील अतिमानस योगाचे प्रणेते, पूर्णयोगाचे उद्गाते म्हणजे श्रीअरविंद. त्यांचे बहुतांशी सारे साहित्य मुळात इंग्रजी व बंगाली भाषेत आहे. तर श्रीमाताजी यांचे बहुतांशी वाङमय फ्रेंच व इंग्रजी भाषेत आहे.
हे दुर्मिळ विचारधन मराठीत आणण्याचे प्रयत्न ‘अभीप्सा’ मासिकाच्या माध्यमातून अव्याहतपणे चालू आहेत. ह्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे ‘ऑरोमराठी’ हे संकेतस्थळ सुद्धा सुरु करीत आहोत.
जगभरात विखुरलेल्या मराठी वाचकांपर्यंत पोहोचण्याचा हा एक प्रयत्न आहे.