Entries by श्रीअरविंद

खरीखुरी विनम्रता

सद्भावना – १६ आश्रमात येणाऱ्या दर्शनार्थींचे स्वागत करण्याची जबाबदारी ज्या व्यक्तींकडे असते त्या व्यक्तींचे आचरण नेहमीच अतिशय विनम्र आणि मृदु असले पाहिजे, अशी श्रीमाताजींची अपेक्षा असते. कोणी उच्च असू दे वा कनिष्ठ, कोणी तरुण असू देत वा वयस्कर, त्यांनी उत्तमोत्तम पोषाख परिधान केलेला असू दे वा अगदी फाटक्या कपड्यातील असू देत, साऱ्यांचे स्वागत सारख्याच सद्भावनेने […]

आध्यात्मिक पायावरील खरा सुसंवाद

सद्भावना – १५ ईश्वराशी एकरूप होण्याच्या आंतरिक अनुभूतीद्वारेच अंतरंगातील एकाकीपण दूर होऊ शकते, कोणतेही मानवी संबंध ही पोकळी भरून काढू शकत नाहीत. त्याच प्रकारे, आध्यात्मिक जीवनासाठी इतरांशी असलेला सुसंवाद हा मानसिक आणि प्राणिक आपुलकीवर आधारित असता कामा नये तर, दिव्य चेतना आणि ‘ईश्वरा’शी ऐक्य यांच्यावरच आधारित असला पाहिजे. जेव्हा व्यक्तीला ‘ईश्वर’ गवसतो आणि व्यक्ती ‘ईश्वरा’मध्ये […]

सद्भावनायुक्त दैनंदिन जीवन

सद्भावना – १४ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…) कोणतेही कर्म हे शांततेमध्ये केल्यास नेहमीच सर्वोत्कृष्ट दर्जाचे होते. काम करण्यासाठीच जर बोलणे आवश्यक असेल तर फक्त त्याचा अपवाद असावा. गप्पागोष्टी फावल्या वेळासाठी राखून ठेवाव्यात. अशावेळी मग काम करत असताना, तुम्ही शांत (गप्पगप्प) असता याबद्दल कोणीही आक्षेप घेता कामा नये. दुसरे असे की, तुम्ही इतरांबाबत योग्य दृष्टिकोन बाळगला […]

प्राणिक प्रवृत्तीचे रूपांतरण

सद्भावना – ०७ (श्रीअरविंद यांच्या पत्रामधून…) इतरांविषयी आप-पर भाव, पसंती-नापसंती या गोष्टी मानवाच्या प्राणिक प्रकृतीमध्ये भिनल्यासारख्या आहेत. याचे कारण काहीजण आपल्या स्वतःच्या प्राणिक स्वभावाशी सुसंवाद राखतात आणि इतरजण मात्र तसे करत नाहीत; तसेच जेव्हा एखाद्याचा प्राणिक अहंकार दुखावला जातो किंवा माणसांनी कसे वागले पाहिजे याबाबतीत त्याच्या असलेल्या कल्पनांनुसार जेव्हा माणसं वागत नाहीत किंवा गोष्टी त्याच्या […]

प्राणिक नातेसंबंध

सद्भावना – ०५ मानवी जीवनामधील सामान्य प्राणिक प्रकृतीचा (Vital nature) भाग असणाऱ्या नातेसंबंधांचे आध्यात्मिक जीवनात काहीच मोल नसते – किंबहुना ते नातेसंबंध प्रगतीमध्ये अडथळा उत्पन्न करतात; (असा अडथळा उत्पन्न होऊ नये म्हणून) मन आणि प्राणसुद्धा पूर्णतः ईश्वराकडेच वळविले पाहिजेत. इतकेच नव्हे तर, साधनेचा हेतूच आध्यात्मिक चेतनेमध्ये प्रवेश करणे आणि साऱ्या गोष्टी एका नव्या आध्यात्मिक आधारावर […]

साधनेची दुसरी बाजू

विचार शलाका – ४१ प्रश्न : मानसिक प्रयत्नांचे, जिवंत अशा आध्यात्मिक अनुभूतीमध्ये परिवर्तन कसे करायचे, त्यासाठी कोणती साधना करायची? काल आपण या साधनेची पहिली बाजू विचारात घेतली होती. आता त्याची दुसरी बाजू विचारात घेऊ श्रीअरविंद : साधनेची दुसरी बाजू ही प्रकृती, मन, प्राण आणि शारीरिक जीवनाशी व त्यांच्या गतिविधींशी संबंधित आहे. येथे तत्त्व हे आहे […]

पूर्णयोगाचे उद्दिष्ट – मुक्ती?

विचार शलाका – ३८ आपण ज्या ‘योगा’चा (पूर्णयोगाचा) अभ्यास करतो आहोत तो आपण केवळ स्वतःसाठी करत नाही, तर ‘ईश्वरा’साठी करतो; ‘ईश्वरा’ची इच्छा या जगामध्ये कार्यकारी व्हावी; आध्यात्मिक परिवर्तन घडून यावे; आणि मानसिक, प्राणिक व शारीरिक प्रकृतीमध्ये तसेच मानवी जीवनामध्ये दिव्य प्रकृती आणि दिव्य जीवन उतरवावे, हे त्याचे उद्दिष्ट आहे. ‘मुक्ती’ ही या योगाची आवश्यक अट […]

‘पूर्णयोगा’चे मूलतत्त्व

विचार शलाका – ३७ पूर्ण ज्ञान, पूर्ण कर्म आणि पूर्ण भक्ती यांचे एकत्रीकरण करणे, त्यांचा समन्वय करणे आणि त्यांना मनोमय पातळीवरून ‘विज्ञाना’च्या अतिमानसिक पातळीवर उन्नत करून, त्यांना परिपूर्ण असे पूर्णत्व प्रदान करणे, हे ‘पूर्णयोगा’चे मूलतत्त्व आहे. जुन्या योगमार्गांध्ये अशी त्रुटी होती की, मन आणि बुद्धी ज्ञात असूनही, ‘आत्मा’ ज्ञात असूनही, ते योग केवळ मनाच्या स्तरावरील […]

आत्मसमर्पणाचा संकल्प

विचार शलाका – ३६ योगाची पहिली प्रक्रिया म्हणजे आत्मसमर्पणाचा संकल्प करणे. तुमच्या समग्र हृदयानिशी आणि तुमच्या सर्व सामर्थ्यानिशी स्वतःला ‘देवा’च्या हाती सोपवा. कोणतीही अट लादू नका, कोणतीही मागणी मागू नका, अगदी योगसिद्धीचीही मागणी करू नका. कारण अन्य कोणत्याही माध्यमातून नव्हे तर, तुमच्यामध्ये जे आहे त्याद्वारे आणि तुमच्या माध्यमातूनच ‘देवा’ची इच्छा थेटपणे कार्यरत होते. जे कोणी […]

ध्यानासाठी आवश्यक आंतरिक व बाह्य परिस्थिती

विचार शलाका – ३५ प्रश्न : ध्यानासाठी अत्यावश्यक अशी आंतरिक व बाह्य परिस्थिती कोणती? श्रीअरविंद : मूलभूत अशी काही बाह्य परिस्थिती आवश्यक नसते, परंतु ध्यानाच्या वेळी एकांत व विलगपणा असेल आणि त्याचबरोबर शरीराची स्थिरता असेल, तर ध्यानासाठी या गोष्टींची मदत होते. नवोदितांसाठी या गोष्टी बऱ्याचदा अगदी आवश्यक असतात. परंतु बाह्य परिस्थितीमुळे व्यक्तीवर मर्यादा पडता कामा […]