मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा या सृष्टीच्या निर्मितीमधील शेवटचा टप्पा नाही किंवा मानवी शक्यतेचा देखील तो शेवटचा टप्पा नाही. मानवी मन आज बौद्धिक, वैचारिक मनाच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचले आहे. परंतु या मनाच्या पलीकडे जात मनुष्य हा, उच्च मन (Higher Mind), प्रकाशित मन (Illumined Mind), अंतःस्फूर्त मन (Intuitive Mind), अधिमानस (Overmind) येथपर्यंत जाऊन पोहोचू शकतो,’ असे श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांनी आपल्याला सांगितले आहे. या प्रत्येक स्तरावरील बारकावे त्यांनी उलगडून दाखविले आहेत.
श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या भगीरथ प्रयत्नामुळे अतिमानस-चेतनेचे (Supremental Consciousness) आविष्करण घडून आले. पण व्यापक जनसमूहाला त्याचा लाभ व्हायचा असेल तर, व्यापक जनसमूहाने उच्चतर चेतनेच्या (Higher Consciousness) पातळ्यांवर चढून जाणे आवश्यक आहे.
उच्चतर चेतनेचे मानवी चेतनेवर जे कार्य चालते त्यातील काही पैलूंना आपण उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘उच्चतर चेतना’ या मालिकेमध्ये स्पर्श करणार आहोत.
संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…
सर्व भावभावनांच्या पलीकडे आपल्या अस्तित्वाच्या निःशब्द आणि अक्षोभ गहनतेमध्ये एक प्रकाश सातत्याने उजळलेला असतो, तो…
स्वत:च्या आत्म्याचा शोध घेण्यात आणि आत्मसत्तेनुसार जीवन जगण्यामध्ये आलेले अपयश ही खरोखरच मनुष्याची एकमेव…
पृथ्वीवरील समग्र जीवसृष्टीमध्ये केवळ मानवाला एक आगळीवेगळी क्षमता परमेश्वराने बहाल केली आहे. स्वतःला वेगळे…