ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

Categories: संकलन

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो,

अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचे विचारधन सातत्याने, सर्वदूर प्रसृत करण्याचे प्रयत्न करत असतो. असाच आपला आणखी एक उपक्रम म्हणजे मराठी विकिपीडियामध्ये श्रीअरविंद व श्रीमाताजी यांच्याविषयीच्या नोंदी.

‘मराठी विकिपीडिया’ हा इंटरनेटवरील एक मुक्त ज्ञानकोश आहे, हे आपल्याला माहिती असेलच. यामध्ये ज्ञानकोशाच्या चौकटीमध्ये राहून, श्रीअरविंद व श्रीमाताजी आणि त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांचे साहित्य, त्यांचा शिष्यवर्ग, त्यांची कामगिरी यासंबंधीची जी जी माहिती देता येणे शक्य आहे, ती माहिती आपण मराठी विकिपीडियामध्ये समाविष्ट करत असतो. हा उपक्रम सुमारे दोन वर्षे चालू आहे आणि त्यामध्ये यथावकाश उर्वरित माहितीचीही भर पडत राहील. आपल्या सर्वांनाही त्या माहितीचा लाभ घेता यावा, या दृष्टीने आजची ही पोस्ट प्रसृत करत आहोत.

‘मराठी विकिपीडिया’मध्ये तीन साचे तयार करून, त्या अंतर्गत ही सर्व माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. त्याच्या लिंक्स येथे देत आहोत.
• पूर्णयोग – https://mr.wikipedia.org/s/6lf2
• श्रीअरविंद तत्त्वज्ञान व पूर्णयोग यासंबंधी साहित्य – https://mr.wikipedia.org/s/6wpr
• श्रीअरविंद व श्रीमाताजी यांचे कार्य – https://mr.wikipedia.org/s/7csk

आजवर यामध्ये सुमारे १५० नोंदी पूर्ण झाल्या आहेत. या सगळ्या पानांच्या लिंक्स तुम्हाला वरील लिंकवर गेल्यावर मिळतील. तुम्हाला आवडेल ती माहिती तुम्ही मुक्तपणे वाचू शकाल अशी सोय यामुळे झालेली आहे. श्रीअरविंद आणि श्रीमाताजी तसेच त्यांचा शिष्यवर्ग यांची बरीच पुस्तके मोफत ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध आहेत, त्या पुस्तकांच्या लिंक्ससुद्धा तुम्हाला त्या त्या संबंधित पानावर पाहायला मिळतील. जिज्ञासू मंडळींनी या सर्व माहितीचा जरूर लाभ घ्यावा, ही विनंती. धन्यवाद.

डॉ. केतकी मोडक
संपादक, अभीप्सा मराठी मासिक

अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Recent Posts

आत्मनिरीक्षण कसे करावे?

  (उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…

15 hours ago

अंतरात्म्याचा शोध

तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…

2 days ago

अमर्त्यतेची जाणीव

सर्व भावभावनांच्या पलीकडे आपल्या अस्तित्वाच्या निःशब्द आणि अक्षोभ गहनतेमध्ये एक प्रकाश सातत्याने उजळलेला असतो, तो…

3 days ago

खरी शोकांतिका

  स्वत:च्या आत्म्याचा शोध घेण्यात आणि आत्मसत्तेनुसार जीवन जगण्यामध्ये आलेले अपयश ही खरोखरच मनुष्याची एकमेव…

4 days ago

अंतरीचा शोध – प्रास्ताविक

  पृथ्वीवरील समग्र जीवसृष्टीमध्ये केवळ मानवाला एक आगळीवेगळी क्षमता परमेश्वराने बहाल केली आहे. स्वतःला वेगळे…

5 days ago

अक्षय ऊर्जास्रोत

  एक अशा प्रकारचा ऊर्जास्रोत असतो की, ज्याचा एकदा शोध लागला की मग बाह्य परिस्थिती…

6 days ago