ईश्वरी कृपा आणि संरक्षण नेहमीच तुमच्यासोबत असते. तुम्ही आंतरिक किंवा बाह्य अशा कोणत्याही अडचणीत किंवा संकटात सापडलेला असलात तरी त्यांना शिरजोर होऊ देऊ नका आणि अशी वेळ येईल तेव्हा, संरक्षण करणाऱ्या दिव्य शक्तीचा आश्रय घ्या. तुम्ही नेहमीच असे श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे करत राहाल तर, पृष्ठभागावर दिसणाऱ्या सर्व प्रकारच्या खळबळीमध्ये, गोंधळामध्येसुद्धा जे नेहमीच स्थिर आणि शांतिपूर्ण असते, असे तुमच्या अंतरंगातील काहीतरी खुले होत आहे, असे तुम्हाला आढळून येईल.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 724-725)
(मन आणि प्राण यांच्या गडबडगोंधळामुळे अंतरात्म्याचा आवाज आपल्याला कसा ऐकू येत नाही, यासंबंधी आपण…
(अंतराम्याला झालेले ज्ञान हेच खरे ज्ञान असते आणि उर्वरित सर्व गोष्टी म्हणजे दिखावा, पूर्वग्रह…
(श्रीअरविंद यांनी वेळोवेळी काही वचने लिहिली आहेत. त्यामध्ये खोलवर अर्थ भरलेला असल्याने ती समजण्यास…
चैत्य पुरुषाचा साक्षात्कार व त्याच्याबद्दलची जागृती येणे आणि तो अग्रभागी येणे या गोष्टी मुख्यतः…
(आंतरात्मिक भक्तीचे स्वरूप प्राणिक व मानसिक भक्तीपेक्षा कसे भिन्न असते ते आपण पाहिले. आज…
(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) चैत्य पुरुष (psychic being) जेव्हा जागृत होतो तेव्हा तुम्ही…