ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

ईश्वरी अवतरणाचा दाब

 

(अगदी बारीकसारीक आध्यात्मिक अनुभवामुळे हुरळून जाणाऱ्या नवोदित साधकांना श्रीमाताजी सांगत आहेत…)

तुम्हाला ईश्वरी अवतरणाचा दाब (pressure) पेलायचा असेल तर तुम्ही खूप सुदृढ, शक्तिशाली असले पाहिजे, नाहीतर तुम्ही विखरून जाल. काही लोकांनी मला असे विचारले, “ईश्वर अजून अवतरित का होत नाही?” तर त्याचे कारण, “अजून तुम्ही (त्याच्या अवतरणासाठी) तयार नाही,” हे आहे. ईश्वराच्या अवतरणाचा एखादा अल्पांश जर तुम्हाला गायला, नाचायला आणि आनंदातिशयाने आरडाओरड करायला लावत असेल तर, तो पूर्णत: अवतरला तर काय होईल?

म्हणूनच आम्ही सांगत असतो की, ज्या लोकांकडे शरीर, प्राण आणि मन यांच्यामध्ये एक भक्कम, सुस्थिर आणि विशाल पाया नसेल त्यांनी ईश्वरी शक्ती खेचू नये. याचे कारण अशा व्यक्ती ते अवतरण पेलू शकणार नाहीत. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, ”ईश्वरी शक्ती खाली ओढण्याचा प्रयत्न करू नका त्याऐवजी, शांती आणि स्थिरता धारण करून त्या शक्तीच्या अवतरणाची प्रतीक्षा करा.”

परंतु ज्यांच्याकडे आवश्यक असा पाया आहे, अधिष्ठान आहे त्यांना आम्ही सांगतो की, ”अभीप्सा बाळगा आणि ईश्वरी शक्ती शक्य तितकी अधिकाधिक मिळविण्याचा प्रयत्न करा.” कारण अशा व्यक्तीच विचलित न होता, ईश्वराकडून अवतरित होणाऱ्या शक्ती ग्रहण करू शकतील.

– श्रीमाताजी (CWM 03 : 11)

 

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

भारतीय शिक्षणापुढील प्राथमिक समस्या

दि. ०५ ऑगस्ट १९६५ (श्रीमाताजींनी श्रीअरविंद-आश्रमाच्या सेंटर ऑफ एज्युकेशनमध्ये ‘फ्री प्रोग्रेस एज्युकेशन’ नावाची नवीन शिक्षणपद्धती…

13 hours ago

सर्वंकष शिक्षण

  दि. १६ जुलै १९६५ भारताकडे आत्म्याचे ज्ञान आहे किंवा होते असे म्हणावे लागेल, परंतु…

2 days ago

भारताचा नकाशा

  दि. २९ जुलै १९६४ (श्रीमाताजींच्या भारताच्या नकाशामध्ये पाकिस्तान, नेपाळ, सिक्किम, भूतान, बांग्लादेश, ब्रह्मदेश आणि…

3 days ago

भारताची खरी नियती

  दि. २६ जानेवारी १९६४ साधक : तुमच्या दिव्य दृष्टीला भारत कसा दिसतो असे जर…

4 days ago

भारतीय नागरिकाचे कर्तव्य

  दि. ०३ फेब्रुवारी १९६३ साधक : सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य काय…

5 days ago

देशभक्तीची भावना आणि योगसाधना

दि. २७ ऑक्टोबर १९६२ देशभक्तीची भावना ही आपल्या योगाशी मिळतीजुळती नाही, असे नाही; उलट, आपल्या…

6 days ago