ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

Categories: संस्मरण

आंतरिक जीवन

(हुता हिंडोचा या साधिकेच्या माध्यमातून श्रीमाताजींनी श्रीअरविंद लिखित ‘सावित्री‘ या महाकाव्याची चित्रे रेखाटून घेतली होती. हुता यांनी सांगितलेली एक आठवण…)

२८ जून १९६८ रोजी श्रीमाताजींनी सावित्रीमधील काही काव्यपंक्तींचे वाचन केले आणि त्याचे विवरण केले; मी ते ध्वनिमुद्रित करून घेतले. त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या जवळ बसवून घेतले आणि मला ध्यान करण्यास सांगितले. मी डोळे मिटते न मिटते तोच, एक असीम शांती माझ्यामध्ये अवतरली आणि माझ्या सर्वांगाला तिने जणू लपेटून घेतले.

काही वेळाने श्रीमाताजींनी डोळे उघडले आणि माझ्याकडे हसून पाहत त्या म्हणाल्या, “तुला मातृमंदिर परिसराच्या मध्यभागी असलेले ते वडाचे झाड माहीत आहे ना? तिथे तू त्या झाडाखाली बसली आहेस आणि त्या झाडाच्या फांद्यांवरून खाली आलेल्या फुलांच्या माळा सर्वत्र तुझ्या आजूबाजूला हलत-डुलत आहेत, असे आत्ता मला ध्यानात दिसले. वरून तुझ्यावर फुलांचा वर्षावसुद्धा होत होता. आणि तू अगदी शांत होतीस.“

श्रीमाताजींचा तो दृष्टान्त मी चित्रामध्ये उतरविला. त्यांनी चित्रामध्ये मला काही किरकोळ फेरफार करायला सांगितले आणि त्यानुसार मी ते बदल केले. माझ्या चित्रामध्ये मी काही खारी, एक हरीण आणि ससासुद्धा काढलेला होता, ते सारे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. ते चित्र पाहून त्या आनंदित झाल्या होत्या. काही काळ चित्त एकाग्र करून नंतर, त्यांनी एका कागदावर पुढील शब्द लिहिले ‘आंतरिक जीवन.‘ श्रीमाताजींनी आंतरिक जीवनाविषयी लिहिले होते की, “व्यक्तीने एकदा आंतरिक जीवनाचे माधुर्य अनुभवले की नंतर मग तिचे इतर कशानेच समाधान होणार नाही.“

हिंदू परंपरेमध्ये वडाच्या झाडाला ‘ज्ञानवृक्ष‘ असे म्हणतात. श्रीमाताजींनी या वृक्षाला ‘ऐक्य‘ असे नाव दिले. या वृक्षाभोवती संगमरवरी आसनं असावीत आणि लोकांनी तिथे बसून शांतपणे ध्यान करावे, अशी इच्छा श्रीमाताजींनी व्यक्त केली होती. आज आपल्याला तेथे तशी व्यवस्था पाहायला मिळते.

– आधारित (The spirit of Auroville 79-81)

अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Share
Published by
अभीप्सा मराठी मासिक

Recent Posts

अंतरात्म्याचा आवाज

  (अंतराम्याला झालेले ज्ञान हेच खरे ज्ञान असते आणि उर्वरित सर्व गोष्टी म्हणजे दिखावा, पूर्वग्रह…

24 hours ago

अंतरात्म्याचा शोध

  (श्रीअरविंद यांनी वेळोवेळी काही वचने लिहिली आहेत. त्यामध्ये खोलवर अर्थ भरलेला असल्याने ती समजण्यास…

2 days ago

ईश्वराबरोबरचे नाते

  चैत्य पुरुषाचा साक्षात्कार व त्याच्याबद्दलची जागृती येणे आणि तो अग्रभागी येणे या गोष्टी मुख्यतः…

3 days ago

चैत्य पुरुष आणि मन, प्राण व शरीर यातील संबंध

  (आंतरात्मिक भक्तीचे स्वरूप प्राणिक व मानसिक भक्तीपेक्षा कसे भिन्न असते ते आपण पाहिले. आज…

4 days ago

भक्तीचे विविध प्रकार

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) चैत्य पुरुष (psychic being) जेव्हा जागृत होतो तेव्हा तुम्ही…

5 days ago

वासनात्मा आणि खरा आत्मा

मनुष्याचे पृष्ठस्तरीय हृदय हे पशुहृदयाप्रमाणेच प्राणसुलभ भावनांचे, विकारांचे असते. पशुहृदयाहून मानवी हृदय अधिक विविधतेने विकसित…

6 days ago