ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

Categories: संस्मरण

विश्व आणि गुरूकिल्ली

श्रीमाताजी : मागे एकदा मी तुमच्याशी, मला माहीत असलेल्या एका गूढवाद्याविषयी बोलले होते. तो स्वतःच्या पद्धतीने हुशार मनुष्य होता. लोक त्याच्याकडे येत असत आणि त्याला विचारत असत, “प्रथम आम्हाला हे सांगा की, हे विश्व अस्तित्वात का आहे?”

तो उत्तर देत असे, “त्याच्याशी तुम्हाला काय करायचे आहे?”

त्यावर लोक म्हणत असत, “पण हे विश्व आत्ता जसे आहे, ते तसेच का आहे?”

त्याचे उत्तर ठरलेले असे. तो म्हणत असे की, “आहे हे असे आहे, त्याने तुम्हाला काय फरक पडतो ?”

मग त्यावर लोकं म्हणत असत, “आम्हाला तरी हे काही समाधानकारक वाटत नाही.“

(हा किस्सा सांगून झाल्यावर श्रीमाताजी पुढे म्हणतात) …तर ज्यांना हे विश्व समाधानकारक वाटत नाही, त्यांना मी असे म्हणेन की, ”गोष्टी जशा आहेत तशाच आहेत. तुम्ही करण्यासारखी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा होण्यासाठी तुम्ही काम करायला सुरूवात करा. ते समाधानकारक वाटावे, ते चांगले व्हावे यासाठीचा मार्ग तुम्ही शोधून काढा. येथे काहीतरी काम करण्यासारखे आहे. काम करा, म्हणजे मग तुम्हाला कळेल की, ते किती रोचक आहे. तुम्ही ज्या द्रव्याने बनला आहात त्या, एका द्रव्याच्या छोट्या समुच्चयाचे तुम्ही प्रतिनिधित्व करता. अंतरंगामध्ये प्रवेश करा आणि गुरूकिल्ली शोधून काढा. तुम्हाला केवळ अंतरंगामध्ये आत खोलवर जायचे आहे. “ते तुमच्या फारच आवाक्याबाहेरचे आहे, ते तुमच्यापेक्षा खूपच विशाल आहे, असे तुम्ही म्हणू शकत नाही. तुमच्या छोट्याशा व्यक्तित्वाच्या अंतरंगात प्रवेश करा म्हणजे मग, सर्व द्वारे खुली करणारी एक गुरु किल्ली तुम्हाला आतमध्ये सापडेल.”

– श्रीमाताजी (CWM 05 : 39-40)

अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Share
Published by
अभीप्सा मराठी मासिक

Recent Posts

अंतरात्म्याचा आवाज

  (अंतराम्याला झालेले ज्ञान हेच खरे ज्ञान असते आणि उर्वरित सर्व गोष्टी म्हणजे दिखावा, पूर्वग्रह…

24 hours ago

अंतरात्म्याचा शोध

  (श्रीअरविंद यांनी वेळोवेळी काही वचने लिहिली आहेत. त्यामध्ये खोलवर अर्थ भरलेला असल्याने ती समजण्यास…

2 days ago

ईश्वराबरोबरचे नाते

  चैत्य पुरुषाचा साक्षात्कार व त्याच्याबद्दलची जागृती येणे आणि तो अग्रभागी येणे या गोष्टी मुख्यतः…

3 days ago

चैत्य पुरुष आणि मन, प्राण व शरीर यातील संबंध

  (आंतरात्मिक भक्तीचे स्वरूप प्राणिक व मानसिक भक्तीपेक्षा कसे भिन्न असते ते आपण पाहिले. आज…

4 days ago

भक्तीचे विविध प्रकार

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) चैत्य पुरुष (psychic being) जेव्हा जागृत होतो तेव्हा तुम्ही…

5 days ago

वासनात्मा आणि खरा आत्मा

मनुष्याचे पृष्ठस्तरीय हृदय हे पशुहृदयाप्रमाणेच प्राणसुलभ भावनांचे, विकारांचे असते. पशुहृदयाहून मानवी हृदय अधिक विविधतेने विकसित…

6 days ago