ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

तेजस्वी शक्तीचे एक केंद्र

आध्यात्मिकता ३१

(भाग ०३)

व्यक्ती जोपर्यंत मानसिक चेतनेमध्ये जीवन जगत असते, – भलेही ते जीवन कितीही उच्च स्तरावरील असले तरी, जेव्हा ती बाहेरून आध्यात्मिक जीवनाकडे पाहते तेव्हा व्यक्ती स्वतःच्या मानसिक क्षमतांनुसार त्या जीवनाचे परीक्षण करते, शोधार्थ धडपडायचे, चुका करायच्या, त्या दुरूस्त करायच्या, थोडेसे प्रगत व्हायचे आणि पुन्हा शोधासाठी धडपडायचे या सवयीनुसार ती त्या जीवनाचे परीक्षण करू पाहते. ती व्यक्ती असा विचार करते की आध्यात्मिक जीवन जगणाऱ्या व्यक्तींनाही अशाच अक्षमतांचा त्रास सहन करावा लागतो पण असा विचार करणे ही एक घोडचूक आहे, असे म्हणावे लागेल.

जेव्हा व्यक्तीमध्ये चेतनेचे प्रतिक्रमण घडून येते तेव्हा या साऱ्या गोष्टी संपुष्टात आलेल्या असतात. आता व्यक्ती शोधासाठी धडपडत नाही, तिला गोष्टी ‘दिसतात’. आता व्यक्ती तर्क करत नाही, अनुमाने काढत नाही, तर तिला गोष्टी ‘ज्ञात’ असतात. आता व्यक्ती चाचपडत बसत नाही, तर ती ‘ध्येयाच्या दिशेने सरळ चालत’ जाते. आणि व्यक्ती जेव्हा अशी पुढे जाते अगदी थोडीशी जरी पुढे गेली तरी व्यक्तीला परम सत्य उमगते, जाणवते, व्यक्ती ते ‘परम सत्य’ जगते; ते परम सत्य हे असते की, एकमेव ‘परमोच्च सत्य’च कार्यरत असते, ‘परम ईश्वर’च मानवी जिवांच्या माध्यमातून संकल्प करतो, तोच जाणतो आणि तोच कार्य करतो. अशावेळी मग त्रुटी राहण्याची शक्यताच कशी असू शकेल? तो जे करतो, ते तो करतो कारण तसे करण्याची ‘त्याची’ इच्छा असते.

आपल्या सदोष दृष्टीला या कृती कदाचित अनाकलनीय असतात पण त्यांना काही अर्थ असतो, त्यांचे काही उद्दिष्ट असते आणि त्या ज्या दिशेने जाणे आवश्यक असते तेथेच त्या नेल्या जातात. व्यक्तीला जर इतरांना आणि या जगाला मदत करण्याची खरी प्रामाणिक इच्छा असेल तर, व्यक्ती त्यातल्या त्यात एक गोष्ट अशी करू शकते की, इतरांनी जसे असावे असे व्यक्तीला वाटते तसे तिने स्वतः बनले पाहिजे – केवळ उदाहरण म्हणून नाही, परंतु, असे केल्याने, व्यक्ती तेजस्वी शक्तीचे एक केंद्र बनू शकते, आणि तिच्या तशा रितीने अस्तित्वात असण्यामुळेच, उर्वरित जगाला ती रूपांतर घडविण्यासाठी भाग पाडू शकते.

( ….समाप्त)

– श्रीमाताजी [CWM 09 : 415-416]

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

मुलांचे संगोपन

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…

14 hours ago

विजयाची खात्री

जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…

2 days ago

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

3 days ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

4 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

5 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

6 days ago