तुम्हीच तुमच्या जीवनाचे स्वामी
तुमच्या जीवनाचे ध्येय आणि तुमचे उद्दिष्ट कधीही विसरू नका. त्या परमशोधाची इच्छा ही नेहमीच तुमच्यामध्ये प्राधान्याने असली पाहिजे. तुमच्या अस्तित्वामध्ये आणि तुम्ही जे काही करता त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ती इच्छा प्रधान असली पाहिजे. तुमच्या अस्तित्वाच्या सर्व गतिविधींवर प्रभुत्व गाजवणाऱ्या एखाद्या भल्यामोठ्या प्रकाशपक्ष्याप्रमाणे ती इच्छा असली पाहिजे. तुमच्या या सातत्यपूर्ण अथक प्रयत्नांमुळे, एक दिवस अचानकपणे […]





