ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

Categories: समर्पण

राजसिक समर्पण

समर्पण – ३१

आपण आपल्या या योगामध्ये, संपूर्ण समर्पणाच्या संकल्पनेपासून, समर्पणाच्या संकल्पापासून, समर्पणाच्या अभीप्सेपासून प्रारंभ करतो, परंतु त्याच वेळी आपण कनिष्ठ प्रकृतीला नकारसुद्धा द्यायचा असतो, आपली चेतना त्या कनिष्ठ प्रकृतीपासून मोकळी करावयाची असते. कनिष्ठ प्रकृतीमध्ये गुंतून पडलेला आपला जीव हा उच्चतर प्रकृतीच्या स्वातंत्र्याप्रत आत्मोन्नती करून,आपण मोकळा करायचा असतो.जर आपण ही दुहेरी प्रक्रिया केली नाही तर, आपण तामसिक आणि त्यामुळे खोटे समर्पण करण्याचा, किंवा कोणताही प्रयत्नच न करण्याचा, कोणतेही तप न करण्याचा आणि पर्यायाने आपली कोणतीही प्रगती न होण्याचा धोका असतो; किंवा आपण ईश्वराप्रत नव्हे तर, स्वयं-रचित अशा कोणत्यातरी मिथ्या संकल्पनेप्रत राजसिक समर्पण करण्याची शक्यता असते अथवा आपण ईश्वराच्या अशा एखाद्या मिथ्या प्रतिमेप्रत राजसिक समर्पण करण्याची शक्यता असते की, जी आपला राजसिक अहंकार वा त्याहूनही एखादी वाईट गोष्ट दडवून ठेवते.

– श्रीअरविंद
(CWSA 29:442)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

स्वत:ला न फसविणे अवघड

  व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…

5 hours ago

प्रामाणिकपणा आणि स्व-समर्थन

  आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…

1 day ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०४

  (भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…

2 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०३

  (भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…

3 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०२

  भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…

4 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०१

  साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…

5 days ago