ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०३

 

(भाग ०३)

अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते त्यावर अधिक चर्चा करण्याची गरज नाही. विचार एक करायचा आणि बोलायचे निराळेच, अमुक एक गोष्ट करत असल्याचा आव आणायचा आणि करायची दुसरीच गोष्ट किंवा एखादी इच्छा नसतानासुद्धा ती आहे, असे दाखवायचे; ही सगळी त्याचीच उदाहरणं आहेत. धादांत खोटे बोलण्याविषयी तर मी बोलतच नाहीये; पण अमुक एक विशिष्ट परिणाम साधावा म्हणून, हेतुपुरस्सर नाटकीपणा करायचा, किंवा अमुक एखाद्या अंतस्थ हेतुने गोडीगुलाबीने बोलायचे हा प्रकारसुद्धा तसाच आहे. असे सर्व प्रकार स्वाभाविकपणे, तुम्ही जसे नाही तसे तुम्हाला वागायला भाग पाडतात आणि अशा प्रकारची विसंगती ही इतकी नजरेत भरण्यासारखी असते की, ती कोणालाही सहज ओळखता येते.

परंतु, अन्य काही गोष्टी अधिक सूक्ष्म असल्यामुळे त्या ओळखायला कठीण असतात. उदाहरणार्थ, जोपर्यंत तुमच्यामध्ये सहानुभूती आणि नावड या गोष्टी असतात तोपर्यंत अगदी स्वाभाविकपणे, जे तुमच्या आवडीचे असते, ज्याविषयी तुम्हाला सहानुभूती वाटत असते त्याविषयीचा तुमचा दृष्टिकोन अनुकूल होतो आणि जी वस्तू किंवा व्यक्ती तुमची नावडती असते तिच्याविषयीचा तुमचा दृष्टिकोन प्रतिकूल होतो आणि तिथे देखील प्रामाणिकपणाचा अभाव असतो. अशा रितीने तुम्ही स्वत:ला फसवत असता पण तुम्ही अप्रामाणिक आहात हे तेव्हा तुमच्या लक्षातसुद्धा येत नाही. तेव्हा, त्या परिस्थितीत तुम्हाला जणू काही मानसिक अप्रामाणिकपणाची साथसंगत मिळालेली असते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 08 : 398-399)

Latest posts by श्रीमाताजी (see all)
श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

सत्याचे आगमन

फेब्रुवारी १९५४ भारताचे आणि जगाचे संरक्षण करण्यासाठी सामंजस्यपूर्ण इच्छाशक्ती आणि आध्यात्मिक ज्ञान यांच्या आधारे घडण…

12 hours ago

देशसेवा

  ऑक्टोबर १९४८ प्रामाणिक, धैर्यवान, सहिष्णू आणि सत्त्वनिष्ठ राहून तुम्ही तुमच्या देशाची सर्वोत्तम सेवा करू…

2 days ago

भारताची अग्निपरीक्षा

  दि.०३.०६.१९४७ (भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड लुईस माऊंटबेटन यांनी ०२ जून १९४७ रोजी रेडिओवरून एक भाषण…

2 days ago

एक महान निर्णायक वळण

  (सन १९१८) सध्याचा काळ असा आहे की जेव्हा, अखिल जगाप्रमाणेच भारतासाठीसुद्धा, त्याची भावी नियती…

6 days ago

आपल्या मोक्षाची पूर्वअट

  (सन १९१०) खरी अडचण ही आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये नसते; तर ती नेहमी आपल्यामध्येच असते. व्यक्तीला…

7 days ago

भारत-माता

  डिसेंबर १९०९ देशभूमी ही आपली माता आहे या दृष्टीचा अभाव असणे हा आपला मुख्य…

1 week ago