Entries by श्रीमाताजी

तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व

ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या अभीप्सेचे (हृदयामध्ये) पोषण करायचे; ती सतत सावध, जागृत, व जिवंत ठेवायची. त्यासाठी एकाग्रतेची – ईश्वरावरील एकाग्रतेची आवश्यकता असते. एकाग्रता करताना त्यामध्ये, ईश्वरी संकल्प व उद्दिष्ट यांच्याप्रत समग्रपणे व नि:शेषतया समर्पित होता यावे, हा दृष्टिकोन असणे आवश्यक असते. हृदयामध्ये लक्ष एकाग्र […]

दिव्य अस्तित्वाचा शोध

  आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे ; मात्र आपले खरे अस्तित्व आपल्या अंतरंगामध्ये असते. हे सर्वोच्च अस्तित्व असते, ते आपले खरे व दिव्य अस्तित्व असते. ते सक्रिय आणि प्रकट व्हावे यासाठी आपण शरीर, प्राण व मन या आपल्या बाह्यवर्ती ‘स्व’च्या अतीत जाणे आवश्यक असते. अंतरंगामध्ये राहून […]

आत्मनिरीक्षण कसे करावे?

  (उत्तरार्ध…) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची सामान्य संवेदना असते. ही अशी संवेदना सहसा नेहमीच आढळून येते. शरीराची वास्तविकता हीच व्यक्तीला तिची स्वतःची वास्तविकता वाटत असते. व्यक्ती जेव्हा आंतरिक प्रगतीसाठी प्रयत्न करते आणि शरीराहूनही अधिक स्थायी असणाऱ्या अशा कोणत्यातरी गोष्टीचा शोध घेण्याचा ती प्रयत्न करते, तेव्हा मग […]

अंतरात्म्याचा शोध

तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती चेतनेपासून मागे होऊन, अंतरंगात खोलवर शिरले पाहिजे. मग आत… आत… आत… खोलवर, खूप खोल, एका अतिशय खोल, अचल आणि शांत विवरामध्ये प्रवेश केला पाहिजे. तिथे गेल्यावर तुम्हाला अतिशय अचल व परिपूर्ण, माधुर्यपूर्ण असे आणि एक प्रकारच्या ऊबदार, स्थिरशांत तत्त्वामुळे समृद्ध […]

अमर्त्यतेची जाणीव

सर्व भावभावनांच्या पलीकडे आपल्या अस्तित्वाच्या निःशब्द आणि अक्षोभ गहनतेमध्ये एक प्रकाश सातत्याने उजळलेला असतो, तो आंतरात्मिक चेतनेचा (psychic consciousness) प्रकाश असतो. त्या प्रकाशाचा शोध घ्या, त्यावर लक्ष एकाग्र करा, तो तुमच्या अंतरंगातच असतो. तुमच्या संकल्प दृढ असेल तर तो प्रकाश तुम्हाला निश्चितपणे गवसेल. ज्या क्षणी तुम्ही त्यामध्ये प्रवेश कराल, त्याच क्षणी तुमच्यामध्ये अमर्त्यतेची जाणीव जागृत […]

खरी शोकांतिका

  स्वत:च्या आत्म्याचा शोध घेण्यात आणि आत्मसत्तेनुसार जीवन जगण्यामध्ये आलेले अपयश ही खरोखरच मनुष्याची एकमेव शोकांतिका आहे आणि तरीही त्याची त्याला खंत वाटत नाही. वास्तविक, स्वत:च्या आत्म्याविषयी, स्वत:च्या चैत्य पुरुषाविषयी (Psychic Being) जागृत न होणे आणि जीवनामध्ये त्याचे मार्गदर्शन पूर्णतया न लाभणे हीच खरेतर एकमेव शोकांतिका आहे. स्वत:च्या आत्म्याचा शोध घेतल्याशिवाय आणि त्याच्या कायद्यानुसार जीवन […]

अक्षय ऊर्जास्रोत

  एक अशा प्रकारचा ऊर्जास्रोत असतो की, ज्याचा एकदा शोध लागला की मग बाह्य परिस्थिती किंवा जीवनाची भौतिक परिस्थिती कशीही असली तरी तो स्रोत कधीच संपुष्टात येत नाही. ही ऊर्जा आध्यात्मिक ऊर्जा असते आणि ती अचेतनेच्या गर्तेमधून, निम्न स्तरातून नव्हे तर, वरून म्हणजे मनुष्यमात्रांचे व या विश्वाचे परमोच्च उगमस्थान असलेल्या ठिकाणाहून, म्हणजे अतिचेतनाच्या सर्व-शक्तिमान आणि […]

अंतरात्म्याशी होणारा संपर्क

(व्यक्तीचा जेव्हा तिच्या अंतरात्म्याशी किंवा चैत्य पुरुषाशी संपर्क झालेला असतो, तेव्हाचे ते क्षण महत्त्वाचे असतात असे श्रीमाताजी सांगत आहेत…) अंतरात्म्याशी होणाऱ्या संपर्काचे हे क्षण म्हणजे बरेचदा जीवनातील एखाद्या निर्णायक वळणाचे क्षण असतात. अशा वेळी व्यक्तीचे एक पाऊल पुढे पडलेले असते, चेतनेच्या दृष्टीने तिची प्रगती झालेली असते. आणि बरेचदा त्याचा संबंध संकटाशी किंवा एखाद्या अत्यंत बिकट […]

ईश्वराचे साधन होण्यासाठी…

  (ईश्वराचे माध्यम झाल्याचा अनुभव कसा असतो, ते श्रीमाताजींनी विशद केले. त्यानंतर साधक आणि त्यांच्यामध्ये पुढीलप्रमाणे संवाद झाला आहे… ) साधक : या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे? श्रीमाताजी : तुम्ही त्यासाठी अभीप्सा बाळगली पाहिजे. ती अवस्था प्राप्त व्हावी असे तुम्हाला वाटले पाहिजे. त्यासाठी तुम्ही अधिकाधिक निःस्वार्थी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःला विसरणे किंवा […]

खरी आणि विशुद्ध निश्चल-नीरवता

(”ईश्वराकडून जे काही तुम्हाला प्राप्त झाले होते त्यावर लक्ष केंद्रित न करता, तुम्ही ते व्यर्थ जागी खर्च केलेत आणि त्यामुळे तुम्ही ते गमावून बसलात,” असे श्रीमाताजींनी एका साधकाला सांगितले. ते ऐकल्यावर तो साधक चिंतनमग्न झाला. तेव्हाचा त्याचा तो अनुभव तो साधक पुन्हा श्रीमाताजींना सांगत आहे…) साधक : तुमचे उत्तर ऐकल्यावर मी गंभीर झालो आणि मला […]