Entries by श्रीमाताजी

सृष्टीनिर्मितीचे प्रयोजन

  ही जी सृष्टी आहे ती काही ईश्वरा‌ला परक्या असणाऱ्या एखाद्या गोष्टीपासून निर्माण केली गेली नाहीये. तर त्या ईश्वरा‌ने स्वतःमधूनच या सृष्टीची निर्मिती केली आहे. जणू काही तो स्वतःच स्वतःकडे पाहत असावा अशा पद्धतीने म्हणजे, तो स्वतः काय आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी त्याने स्वतःला वस्तुरूपात आणले आहे. एकाग्रतेच्या आंतरिक अक्रिय अवस्थेमध्ये राहण्याऐवजी, म्हणजे जेथे […]

शब्दातीत ईश्वरी ऐश्वर्य

(श्रीमाताजीकृत प्रार्थना…) हे ईश्वरा, तुझ्या दिव्य कायद्या‌चे आणि तुझ्या वैभवा‌च्या भव्यतेचे वर्णन शब्दांत कसे व्यक्त करता येईल? तुझ्या चेतने‌च्या परिपूर्णत्वाचे आणि तुझ्या प्रेमा‌च्या अनंत आनंदाचे वर्णन कोणत्या शब्दात करता येईल? तुझ्या शब्दातीत शांती‌चे वर्णन आम्ही शब्दांत कसे काय करू शकणार? तुझ्या निश्चल-नीरवते‌चे महिमान आणि तुझ्या सर्वशक्तिमान सत्या‌चे ऐश्वर्य अभिव्यक्त करू शकतील असे कोणते शब्द आहेत? […]

चिरतारुण्याचे रहस्य

चेतना विकसित करणे हे जीवनाचे मुख्य उद्दिष्ट आहे असा जर विचार केला तर, अनेक समस्यांवरील उत्तरे सापडतील. प्रगती हे आपल्या जीवनाचे उद्दिष्ट बनविणे हा वृद्ध न होण्याचा एक सर्वोत्तम मार्ग आहे. * प्रत्येक क्षणी पुनर्जीवित कसे व्हायचे हे जाणणे हे चिरतारुण्याचे रहस्य आहे. * निरूपयोगीपणाने खर्च केलेली वर्षंच तुम्हाला वृद्ध बनवितात. ज्या वर्षी तुम्ही कोणतीही […]

तेव्हा तुम्ही तरुण असता…

  तुमचा भावी काळ जेव्हा तुम्हाला जणू अनंत शक्यतांनी उजळलेल्या आकर्षक सूर्यासारखा वाटत असतो; आणि त्या शक्यता जेव्हा तुम्हाला खुणावत असतात तेव्हा तुम्ही तरुण असता. मग या पृथ्वीतलावर तुम्ही किती वर्षे व्यतीत केली आहेत याला महत्त्व नसते, तुम्ही तरुण असता आणि भावी काळात प्रत्यक्षात येऊ शकतील अशा शक्यतांची संपदा तुमच्यापाशी असल्यामुळे तुम्ही समृद्ध असता. परंतु […]

वार्धक्य? नव्हे, चिरतारुण्य !

  प्रगती करण्याची व विकसित होण्याची क्षमता नसणे ही गोष्ट नुसत्या वाढत जाणाऱ्या वयापेक्षादेखील जास्त भयानक असते आणि त्यालाच खऱ्या अर्थाने ‘वृद्धत्व’ म्हणता येईल. ज्या क्षणी तुम्ही ही वाटचाल करणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही प्रगती करणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही (आलेल्या अनुभवातून) बोध घेणे अथवा प्रगल्भ होणे थांबविता, […]

दुर्दैवी परिस्थिती वाट्याला आली तर…

(कंटाळा आला तर त्याचा प्रगतीसाठी कसा उपयोग करून घेतला पाहिजे हे आपण कालच्या भागात पाहिले. त्याचा हा उत्तरार्ध…) जीवनाकडून जेव्हा तुम्हाला एखादा जबरदस्त दणका बसतो, ज्याला लोकं दुर्दैव असं म्हणतात, त्या परिस्थितीत व्यक्ती प्रथम काय करते? तर, ती परिस्थिती विसरण्याचा व्यक्ती प्रयत्न करते. वाट्याला आलेल्या परिस्थितीचा विसर पडावा म्हणून ती हर तऱ्हेच्या गोष्टी करत राहते. […]

कंटाळ्यावरील उपाय

  व्यक्ती तरुण असो किंवा वृद्ध असो, तिने जर प्रगती केली नाही तर तिला कंटाळा येतो. प्रगती करण्यासाठीच आपण या पृथ्वीवर आलो आहोत. प्रगतीविना हे जीवन किती कंटाळवाणे होऊन जाईल! बरेचदा जीवन एकसुरी, नीरस असते. त्यामध्ये काही मजाच नसते. ते बरेचदा सुंदरही नसते. परंतु तुम्ही त्या जीवनाकडे जर प्रगती करण्याचे क्षेत्र म्हणून पाहिलेत तर मग […]

एक अक्षय्य ऊर्जास्रोत – भाग ०२

  (आपण कालच्या भागात अन्नाव्यतिरिक्त उपलब्ध असणाऱ्या एका ऊर्जास्रोताचा विचार केला. आज आता अविनाशी असणाऱ्या दुसऱ्या ऊर्जास्रोताचा विचार करू या.) आणखी एक अशा प्रकारचा ऊर्जास्रोत असतो की, ज्याचा एकदा शोध लागला की मग बाह्य परिस्थिती किंवा जीवनाची भौतिक परिस्थिती कशीही असली तरी तो स्रोत कधीच संपुष्टात येत नाही. ही ऊर्जा आध्यात्मिक ऊर्जा असते आणि ती […]

एक अनोखा ऊर्जास्रोत

  (पूर्वार्ध) जोपर्यंत माणसं आणि हे जग आत्ता जसं आहे तसंच राहील तोपर्यंत, ऊर्जा मिळविण्यासाठी अन्न हा एक अगदी अपरिहार्य असा घटक असणार आहे. ऊर्जा मिळविण्याचे इतर मार्गदेखील योगशास्त्राला ज्ञात आहेत आणि त्यापैकी दोन महत्त्वाच्या मार्गांचा विचार आपण येथे करणार आहोत. पार्थिव जडभौतिक जगतामध्ये असलेल्या ऊर्जा-साठ्याच्या संपर्कात यायचे आणि या अक्षय ऊर्जास्रोतामधून मुक्तपणे ऊर्जा संपादन […]

तारुण्य आणि वार्धक्य

  तारुण्य हे, व्यक्ती किती वयाची आहे यावर अवलंबून नसते, तर ते प्रगती करण्याच्या आणि विकसित होण्याच्या तिच्या क्षमतेवर अवलंबून असते. प्रगती करणे म्हणजे व्यक्तीमध्ये असलेल्या क्षमता तिने सातत्याने अधिकाधिक परिपूर्ण करत नेणे आणि विकसित होत जाणे म्हणजे स्वतःच्या क्षमता व स्वतःचे सामर्थ्य सतत वाढवत नेणे. व्यक्तीचे वय वाढले आहे म्हणजे ती आता वृद्ध झाली […]