Entries by श्रीअरविंद

साधना, योग आणि रूपांतरण – २९५

साधना, योग आणि रूपांतरण – २९५ अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण बहुधा जुन्या स्मृती या अवचेतनामधून (Subconscient) पृष्ठभागावर येतात. जेव्हा अशा स्मृती जाग्या होतात तेव्हा, त्यांचे विलयन (dissolve) करण्यासाठी व त्या काढून टाकण्यासाठीच पृष्ठभागावर आल्या आहेत हे ओळखून त्यांची (योग्य रीतीने) हाताळणी केली पाहिजे. (अवचेतनाच्या प्रभावामुळे व्यक्ती गतकाळाशी संबद्ध राहात असते. ही कर्माची यंत्रणा असते.) […]

साधना, योग आणि रूपांतरण – २९४

साधना, योग आणि रूपांतरण – २९४ अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण (एका साधकाला अवचेतनामधून वर उफाळून येणाऱ्या गोष्टींमुळे, साधनेमध्ये व्यत्यय येत आहे. त्या साधकाला श्रीअरविंद यांनी केलेले हे मार्गदर्शन…) हे खरं आहे की, अजून काहीतरी अवचेतनामधून (subconscient) उफाळून वर येईल, पण जे तिथे अजूनही शिल्लक राहिलेले आहे तेच वर येईल. आत्ता ज्यास नकार दिला जात […]

साधना, योग आणि रूपांतरण – २९३

साधना, योग आणि रूपांतरण – २९३ अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण एखाद्या वाद्यवादकाला ज्याप्रमाणे प्रथम त्याच्या मनाच्या व प्राणाच्या सौंदर्यविषयक आकलनाच्या आणि संकल्पाच्या साहाय्याने, त्याच्या संगीताचे योग्य तत्त्व कोणते आणि त्याचा प्रत्यक्ष उपयोग कसा करायचा हे शिकावे लागते आणि नंतर त्याचे उपयोजन कसे करायचे हे त्याच्या बोटांना शिकवावे लागते; एवढे झाल्यानंतर मग त्याच्या बोटांमधील अवचेतन […]

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

साधना, योग आणि रूपांतरण – २९२ अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण (एका साधकाला स्वप्नामध्ये अश्लील दृष्य दिसत असत, तसेच त्याला साधनेमध्ये कामवासनेच्या विकाराचादेखील बराच अडथळा जाणवत असे. त्याच्या या समस्येवर श्रीअरविंदांनी पत्राद्वारे दिलेले उत्तर…) अश्लील दृष्य वगैरेच्या बाबतीत सांगायचे तर, ज्यामध्ये अशा प्रकारच्या अनेकानेक विचित्र गोष्टी असतात अशा अवचेतन (subconscient) प्रांतामधूनच या गोष्टी तुमच्या पृष्ठभागावर […]

परिपूर्ण रूपांतरण

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण अवचेतनामधील (subconscient) जडत्व दूर करण्यासाठी शरीराचे साहाय्य होऊ शकते याचे कारण असे की, अवचेतन हे शरीराच्या लगेच खाली असते. त्यामुळे प्रकाशित, प्रबुद्ध शरीर हे अवचेतनावर थेटपणे आणि संपूर्णपणे कार्य करू शकते आणि मन व प्राणदेखील करू शकणार नाहीत अशा रीतीने ते कार्य करू शकते. तसेच या थेट कार्यामुळे मन व […]

परिसरीय चेतना आणि अवचेतन

साधना, योग आणि रूपांतरण – २९० अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण इच्छावासना, लालसा या शरीराच्या जुन्या सवयी असतात, त्या वैश्विक प्रकृतीकडून शरीराकडे आलेल्या असतात आणि शरीराने त्या स्वीकारलेल्या असतात आणि त्यांना जणू काही स्वतःचा आणि स्वतःच्या जीवनाचा एक भाग बनवून टाकलेले असते. जागृतावस्थेतील चेतनेकडून जेव्हा या गोष्टींना नकार दिला जातो तेव्हा त्या अवचेतनामध्ये (subconscient) किंवा […]

स्वप्ने आणि अवचेतनाची शुद्धी

साधना, योग आणि रूपांतरण – २८९ अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण (श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…) तुम्हाला जे स्वप्न पडलं होतं ते म्हणजे खरंतर, तुमच्या (subconscient) अवचेतनामधून वर आलेल्या गतकालीन रचना होत्या किंवा त्यांचे ठसे होते. आपण जीवनामध्ये जे जे काही करतो, आपल्याला जे जाणवते किंवा ज्याचा आपण अनुभव घेतो, त्या सगळ्यांचा काही एक […]

शारीर-चेतनेचा गुप्त आधार

साधना, योग आणि रूपांतरण – २८८ अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण (श्रीअरविंद आणि श्रीमाताजी अवचेतनावर कार्य करत होते. त्याचा संदर्भ येथे आहे.) अवचेतनामधील (subconscient) साधनेचे हे कार्य व्यक्तिगत स्वरूपाचे नसून, ते सार्वत्रिक स्वरूपाचे असते. पण निश्चितच त्याचा येथील (श्रीअरविंद-आश्रमातील) प्रत्येकावर काही ना काही प्रमाणात परिणाम होत आहे. अवचेतनामध्ये चेतना व प्रकाश उतरविला नाही तर त्यामध्ये […]

साधनेमधील अवचेतनाचा अडथळा

साधना, योग आणि रूपांतरण – २८७ अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण आंतरिक अस्तित्व हे अवचेतनावर (subconscient) अवलंबून नसते. परंतु बाह्यवर्ती अस्तित्व मात्र जन्मानुजन्मं अवचेतनावर अवलंबून राहत आले आहे. आणि त्यामुळे बाह्यवर्ती अस्तित्व आणि शारीर-चेतनेची अवचेतनाला प्रतिसाद देण्याची सवय, या गोष्टी साधनेच्या प्रगतीमध्ये एक भयंकर मोठा अडथळा ठरू शकतात आणि बऱ्याच जणांच्या बाबतीत तो तसा अडथळा […]

अवचेतनाचा प्रांत

साधना, योग आणि रूपांतरण – २८६ अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण अवचेतनाचा प्रांत (subconscient) हा अंधकारमय आणि अज्ञानमय प्रांत असतो आणि त्यामुळे तेथे प्रकृतीच्या अंधकारमय गतिप्रवृत्तींची ताकद अधिक प्रबळ असणे, हे स्वाभाविक आहे. कनिष्ठ प्राणापासून (lower vital) खाली असणाऱ्या प्रकृतीच्या इतर सर्व कनिष्ठ भागांच्या बाबतीतही हे तितकेच खरं आहे. परंतु अगदी क्वचितच, या भागाकडून चांगल्या […]