भारताचे जीवितकार्य – प्रास्ताविक
अखिल सृष्टीसाठी असलेल्या दिव्य योजनेमध्ये भारताला मध्यवर्ती भूमिका बजावावी लागणार आहे, हे श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांना ज्ञात होते. परंतु हे घडून येण्यासाठी, म्हणजे भारत जगाला काही गुरूपदेश करू शकेल इतक्या उच्च स्थानी पोहोचण्यासाठी, आधी भारताने स्वत:च्या आत्म्याचा पुनर्शोध घेतला पाहिजे तसेच भारताचे गतवैभव, त्याची गतकालीन प्रज्ञा आणि शक्ती त्याने पुन्हा एकदा आत्मसात करण्याची आवश्यकता आहे, हे देखील त्यांनी सांगितले आहे.
आज संपूर्ण जग एका संक्रमणकाळातून जात आहे. त्या व्यापक परिप्रेक्ष्यातून पाहता, भारताच्या भूत, वर्तमान आणि भविष्याविषयी श्रीअरविंद आणि श्रीमाताजींच्या ‘दिव्य दृष्टी’ला नेमके काय दिसले होते ते पाहणे उद्बोधक ठरावे, असे आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘भारताचे जीवितकार्य’ या मालिकेद्वारे आपण त्याचा विचार करणार आहोत.
संपादक, ‘अभीप्सा’ मासिक
- भारताचे जीवितकार्य – प्रास्ताविक - October 7, 2026
- कुमारी मार्गारेट वुड्रो विल्सन यांनी श्रीअरविंद यांना लिहिलेले पत्र - October 2, 2026
- अंतरीचा शोध – प्रास्ताविक - September 6, 2026





