तुमच्या जीवनाचे ध्येय आणि तुमचे उद्दिष्ट कधीही विसरू नका. त्या परमशोधाची इच्छा ही नेहमीच तुमच्यामध्ये प्राधान्याने असली पाहिजे. तुमच्या अस्तित्वामध्ये आणि तुम्ही जे काही करता त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ती इच्छा प्रधान असली पाहिजे. तुमच्या अस्तित्वाच्या सर्व गतिविधींवर प्रभुत्व गाजवणाऱ्या एखाद्या भल्यामोठ्या प्रकाशपक्ष्याप्रमाणे ती इच्छा असली पाहिजे.
तुमच्या या सातत्यपूर्ण अथक प्रयत्नांमुळे, एक दिवस अचानकपणे आंतरिक द्वार खुले होईल आणि तुमच्यामध्ये एका लखलखीत, प्रकाशमान दीप्तीचा उदय होईल. त्यातून तुम्हाला तुमच्या अमर्त्यतेची खात्री पटेल. तुम्ही नेहमीच अस्तित्वात होतात आणि पुढेही असणार आहात; केवळ बाह्य रूपे नाहीशी होतात आणि तुम्ही वस्तुत: जे काही आहात त्याच्याशी तुलना केल्यास, ही बाह्य रूपे म्हणजे जणू टाकून दिलेली जीर्ण वस्त्रे असतात, याचा मूर्तिमंत अनुभव तुम्हाला येईल.
आणि तेव्हा मग, सर्व बंधनातून मुक्त झालेले तुम्ही कणखरपणे उभे राहाल. प्रकृतीने तुमच्यावर परिस्थितीचे जे ओझे लादलेले असते त्या ओझ्याखाली चिरडून जायचे नसेल तर, तुम्हाला मोठ्या कष्टाने ते ओझे वागवत पुढे चालावेच लागते, ते ओझे सहन करावेच लागते. आता मात्र तसे करावे न लागता, तुम्ही सरळ, खंबीरपणे मार्गक्रमण करू शकाल; आता तुम्ही तुमच्या नियतीबाबत सचेत झालेले असाल, आता तुम्ही तुमच्या जीवनाचे स्वामी असाल.
– श्रीमाताजी (CWM 12 : 34-35)
दि. १३ ऑक्टोबर १९६५ साधक : एकंदरीत पाहिले तर सर्वसाधारणपणे सद्यस्थितीत जग हे एक…
दि. २९ सप्टेंबर १९६५ (श्रीअरविंद यांनी दि. ०४ एप्रिल १९५० रोजी लिहिलेल्या पत्रामधील एक…
दि. १६ सप्टेंबर १९६५ (भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना श्रीमाताजींनी दिलेला संदेश)…
दि. ०५ ऑगस्ट १९६५ (श्रीमाताजींनी श्रीअरविंद-आश्रमाच्या सेंटर ऑफ एज्युकेशनमध्ये ‘फ्री प्रोग्रेस एज्युकेशन’ नावाची नवीन शिक्षणपद्धती…
दि. १६ जुलै १९६५ भारताकडे आत्म्याचे ज्ञान आहे किंवा होते असे म्हणावे लागेल, परंतु…
दि. २९ जुलै १९६४ (श्रीमाताजींच्या भारताच्या नकाशामध्ये पाकिस्तान, नेपाळ, सिक्किम, भूतान, बांग्लादेश, ब्रह्मदेश आणि…