ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

पूर्णयोगाची साधना करायची तर…

 

(मला पूर्णयोगाची साधना करायची आहे त्यासाठी मला संन्यास घ्यावा लागेल का, असा प्रश्न एका व्यक्तीने श्रीअरविंद यांना विचारला असावा असे दिसते. त्यावर श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

व्यक्तीने संन्यासी असण्याची आवश्यकता नाही. स्वतःच्या पृष्ठवर्ती चेतनेमध्ये राहण्याऐवजी व्यक्ती जर अंतरंगामध्ये, तिच्या आंतरिक अस्तित्वामध्ये राहायला शिकू शकली आणि पृष्ठवर्ती मनामुळे व प्राणशक्तीमुळे झाकल्या गेलेल्या आत्म्याचा किंवा स्वतःच्या खऱ्या व्यक्तित्वाचा शोध घेऊ शकली आणि स्वत:चे अस्तित्व अतिचेतन वास्तविकतेप्रत (superconscient Reality) जर ती खुले करू शकली तर तेवढे पुरेसे असते. पण व्यक्ती पूर्णपणे प्रामाणिक असल्याखेरीज आणि तिचे प्रयत्न एकाच ध्येयासाठी एकदिश झालेले असल्याखेरीज तिला उपरोक्त गोष्टीमध्ये यश मिळू शकणार नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 380)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

मस्तकामध्ये एकाग्रता करणे

  एकाग्रतेचा एक मार्ग म्हणजे मस्तकामध्ये, मानसिक केंद्रामध्ये करायची एकाग्रता. त्यामुळे जर पृष्ठस्तरीय मनामध्ये शांतता…

7 hours ago

पूर्णयोगातील दुहेरी प्रक्रिया

  आमच्या पूर्णयोगामध्ये आरोहण आणि अवरोहण अशी दुहेरी प्रक्रिया असते. यामध्ये व्यक्ती चेतनेच्या उच्च व…

1 day ago

उच्चतर चेतनेचे अवतरण

  (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) तुमच्या अंतरंगामधून ज्या कल्पना आणि जाणिवांचा उदय होत असल्याचे तुम्ही लिहिले…

2 days ago

चेतनेचे आरोहण आणि अवरोहण

  निम्नतर चेतना ही, उच्चतर चेतनेशी जोडली जाण्यासाठी तिच्या दिशेने आरोहण (ascend) करते आणि उच्चतर…

3 days ago

श्रीमाताजींचा कृपाशीर्वाद

  साधक : श्रीमाताजींच्या कृपाशीर्वादामुळे, व्यक्तीमध्ये स्थिरचित्तता व समत्व यांचे वरून अवतरण होते का? श्रीअरविंद…

4 days ago

एकाग्रता कोणत्या केंद्रावर करावी?

  व्यक्तीला हृदय-केंद्र, आज्ञाचक्र, मस्तकाच्या वरच्या बाजूस असणारे केंद्र या तीनपैकी ज्या केंद्रावर चित्त एकाग्र…

5 days ago