साधना, योग आणि रूपांतरण – २०६
(आंतरात्मिक रूपांतरणासाठी ‘चैत्य पुरुष’ खुला होऊन तो अग्रभागी येणे आवश्यक असते. तो संपूर्णपणे प्रकट व्हावा यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात हे श्रीअरविंदांनी येथे सांगितले आहे.)
साधनेमध्ये होणाऱ्या प्राणिक आवेगांच्या गुंतागुंतीतून साधक जेव्हा मुक्त होईल आणि तो जेव्हा श्रीमाताजींप्रति साधेसुधे आणि प्रामाणिक आत्मार्पण करण्यास सक्षम होईल तेव्हाच त्या साधकातील ‘चैत्य पुरुष’ (psychic being) संपूर्णत: खुला होईल.
तेथे जर कोणताही अहंकारी पीळ असेल किंवा हेतुमध्ये अप्रामाणिकता असेल, प्राणिक मागण्यांच्या दबावाखाली येऊन योगसाधना केली जात असेल, किंवा पूर्णपणे वा अंशत: कोणत्यातरी आध्यात्मिक वा इतर आकांक्षा पूर्ण करण्यासाठी साधना केली जात असेल; अभिमान, प्रौढी, किंवा सत्तापिपासा, पद मिळविण्यासाठी किंवा इतरांवर प्रभाव पडावा म्हणून किंवा ‘योग’-शक्तीच्या साहाय्याने कोणतीतरी प्राणिक इच्छा भागवण्याची उर्मी म्हणून साधना केली जात असेल तर, चैत्य अस्तित्व खुले होणार नाही. आणि ते जर खुले झालेच तर अंशत:च खुले होईल किंवा फक्त काही काळासाठीच खुले होईल आणि परत बंदिस्त होऊन जाईल कारण ते प्राणिक कृतींनी झाकले जाईल. चैत्य अग्नी, आंतरात्मिक अग्नी प्राणिक धुरामुळे घुसमटून, विझून जातो. तसेच अंतरात्म्याला मागे ठेवून, मन जर फक्त योगसाधनेमध्येच अधिक रमत असेल किंवा भक्ती वा साधनेतील इतर क्रिया या चैत्य रूप धारण करण्याऐवजी अधिक प्राणिक बनत असतील, तरीदेखील तशीच अ-क्षमता निर्माण होते.
शुद्धता, साधासरळ प्रामाणिकपणा आणि कोणत्याही ढोंगाविना वा मागणीविना, भेसळयुक्त नसलेली अहंकारशून्य आत्मार्पण-क्षमता या चैत्य पुरुषाच्या संपूर्ण प्रकटीकरणासाठी असणाऱ्या आवश्यक अटी आहेत.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 349)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…