ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधना, योग आणि रूपांतरण – १९७

साधना, योग आणि रूपांतरण – १९७

‘साधना, योग आणि रूपांतरण’ या मालिकेमध्ये आजवर आपण साधना आणि योग या भागांचा विचार पूर्ण केला आहे. ‘साधना’ या विभागामध्ये ध्यान, कर्म, भक्ती यांच्याद्वारे साधना कशी केली जाते हे आपण पाहिले. तर ‘योग’ या विभागामध्ये, आपण ‘पूर्णयोग’ म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये कोणती इत्यादी गोष्टी जाणून घेतल्या. आता आपण या मालिकेमधील अंतिम विभागाकडे म्हणजे ‘रूपांतरणा’कडे वळत आहोत.

‘रूपांतरण’ हे पूर्णयोगाचे केंद्रवर्ती उद्दिष्ट आहे, हे आता एव्हाना आपल्याला माहीत झाले आहे. परंतु रूपांतरण म्हणजे नेमके काय, हे सहसा आपल्याला माहीत नसते. एखाद्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये योगसाधनेनंतर बदल होतो म्हणजे तिचे रूपांतरण झाले असे सहसा मानले जाते. उदाहरणार्थ, आधी जी व्यक्ती रागीट असते ती दीर्घकालीन साधनेनंतर शांत स्वभावाची होते यालाच रूपांतरण असे समजण्याची गल्लत केली जाते. परंतु स्वभावामध्ये परिवर्तन किंवा व्यक्तित्वामध्ये झालेला छोटामोठा बदल म्हणजे रूपांतरण नव्हे.

रूपांतरणाचा श्रीअरविंदांना अभिप्रेत असणारा अर्थ अधिक गभीर आहे, खोलवरचा आहे. तो अर्थ नेमका काय आहे, रूपांतरणाचे महत्त्व काय आहे, हे रूपांतरण केव्हा व कसे घडून येते, त्याचे प्रकार किती व कोणते यासारख्या मुद्द्यांचा विचार आपल्याला येथून पुढील भागांमध्ये करायचा आहे.

प्रथमतः आपण ‘आंतरात्मिक’ रूपांतरण, ‘आध्यात्मिक’ रूपांतरण आणि ‘अतिमानसिक’ रूपांतरण यांचा क्रमशः विचार करणार आहोत आणि त्यानंतर आपण आपल्या ‘प्रकृती’च्या रूपांतरणाचा म्हणजे ‘मन’, ‘प्राण’ आणि ‘शरीर’ यांच्या रूपांतरणाचा विचार करणार आहोत.

संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक

Latest posts by अभीप्सा मराठी मासिक (see all)
अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Recent Posts

स्वत:ला न फसविणे अवघड

  व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…

7 hours ago

प्रामाणिकपणा आणि स्व-समर्थन

  आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…

1 day ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०४

  (भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…

2 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०३

  (भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…

3 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०२

  भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…

4 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०१

  साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…

5 days ago