ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

मीरा अल्फासा (श्रीमाताजी) दि. २४ एप्रिल १९२० रोजी या कायमस्वरूपी वास्तव्यासाठी पाँडिचेरी येथे परतल्या.

पुढे एकदा कधीतरी त्यांचा अनुभव सांगताना त्या म्हणतात, ”मी जेव्हा जपानहून परत येत होते (१९२० साली) तेव्हा एक घटना घडली. मी समुद्रामध्ये बोटीवर होते आणि असे काही घडेल अशी अपेक्षाही नव्हती. (मी माझ्या आंतरिक जीवनामध्ये व्यस्त होते, परंतु शरीराने मी बोटीवर राहात होते.) तेव्हा एकदम, एकाएकी, पाँडिचेरीपासून समुद्रामध्ये दोन मैलावर असताना, हवेतील वातावरण अचानकपणे बदलले आणि मला जाणवले की, आम्ही श्रीअरविंदांच्या प्रभावक्षेत्रामध्ये प्रवेश करत आहोत. तो अगदी भौतिक, सघन असा अनुभव होता.

पुढे ‘सत्प्रेम’ या एका साधकाशी बोलताना त्या म्हणतात, ”जेव्हा मी जपानवरून परतले तेव्हा आम्ही दोघांनी (श्रीअरविंद आणि मी) एकत्रितपणे कार्य सुरु केले; त्यांनी अगोदरच मनोमय जगतामध्ये अतिमानसिक प्रकाश उतरविलेला होता आणि ते मनाचे रूपांतरण करण्याच्या प्रयत्नात होते. श्रीअरविंद मला म्हणाले, “हे खूपच विलक्षण आहे, हे कधीही न संपणारे कार्य आहे. वास्तविक सर्व काही करून झाले आहे तरीही काहीच पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही आणि त्यामुळे पुन्हापुन्हा परत एकदा तेच सगळे करावे लागत आहे.” (क्रमश:)

अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Recent Posts

चैत्य पुरुष म्हणजे काय?

अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…

12 hours ago

तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व

ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…

20 hours ago

चैत्य पुरुष खुला होणे

जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…

3 days ago

दिव्य अस्तित्वाचा शोध

  आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…

4 days ago

आत्मनिरीक्षण कसे करावे?

  (उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…

5 days ago

अंतरात्म्याचा शोध

तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…

6 days ago