ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

दिव्य चेतनेचे माध्यम म्हणून कार्य करू पाहणाऱ्या योगी अरविंद आणि मीरा व पॉल रिचर्ड्स या त्रयीने मिळून ‘आर्य’ नावाचे मासिक काढावयाचे ठरविले. १५ ऑगस्ट १९१४ रोजी ‘आर्य’ या तत्त्वज्ञानात्मक मासिकाच्या प्रकाशनाला आरंभ केला. त्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था लावण्याची जबाबदारी मीरा यांनी आपल्या खांद्यावर घेतली. वर्गणीदारांची यादी त्यांनी स्वत: लिहून काढली. त्या जमाखर्च ठेवू लागल्या. ‘आर्य’च्या फ्रेंच आवृत्तीसाठी पॉल रिचर्डस् हे अरविंदांचे लिखाण फ्रेंचमध्ये अनुवादित करत. त्या कामातही मीरा त्यांना मदत करू लागल्या….

नंतर अरविंदांचे बहुतेक सगळे मुख्य लिखाण, म्हणजे Isha Upanishad, Essays on the Gita, Life Divine, The Synthesis of Yoga हे ‘आर्य’ या नियतकालिकामध्ये क्रमशः प्रकाशित होत असे. योगसाधना करत असताना त्यांच्यामध्ये ज्या आंतरिक ज्ञानाचा उदय झाला ते ज्ञान या ग्रंथांमध्ये शब्दबद्ध झाले आहे.

त्यांचे इतर लिखाण हे भारतीय सभ्यता व संस्कृतीचे महत्त्व आणि तिचा आत्मा, वेदांचा खरा अर्थ, मानवी समाजाची प्रगती, काव्याचा विकास आणि त्याचे स्वरूप, मानवी वंशाच्या एकात्मतेची शक्यता या विषयांशी संबंधित आहे. इंग्लंडमध्ये व बडोद्यात असताना आणि नंतर राजकीय चळवळीच्या कालावधीमध्ये आणि पाँडिचेरीच्या वास्तव्यामधील पहिल्या काही वर्षांमध्ये त्यात आणखी काही कवितांची भर पडली, अशा सर्व कविता त्यांनी याच सुमारास प्रकाशित करण्यास सुरुवात केली.

मात्र दि. २२ फेब्रुवारी १९१५ पॉल व मीरा फ्रान्सला जाण्यासाठी निघावे लागले; निमित्त होते पहिल्या महायुद्धाचे. आता दर महिन्याला ६४ पाने लिहिण्याची जबाबदारी एकट्या अरविंदांवर येऊन पडली होती. (क्रमश:)

अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Recent Posts

चैत्य पुरुष म्हणजे काय?

अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…

12 hours ago

तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व

ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…

20 hours ago

चैत्य पुरुष खुला होणे

जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…

3 days ago

दिव्य अस्तित्वाचा शोध

  आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…

4 days ago

आत्मनिरीक्षण कसे करावे?

  (उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…

5 days ago

अंतरात्म्याचा शोध

तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…

6 days ago