Entries by श्रीअरविंद

योग्य वृत्तीने केलेले कर्म

साधना, योग आणि रूपांतरण – १०८ मन स्थिर करण्यासाठी व आध्यात्मिक अनुभूती येण्यासाठी, प्रकृतीचे शुद्धीकरण होणे आणि तिची तयारी होणे आवश्यक असते. यासाठी कधीकधी अनेक वर्षेसुद्धा लागतात. योग्य वृत्तीने केलेले कर्म हा त्यासाठीचा सर्वांत सोपा मार्ग आहे. इच्छा किंवा अहंकार विरहित कर्म; इच्छा, मागणी किंवा अहंकाराची कोणतीही स्पंदने निर्माण झाली की त्याला लगेच नकार देत […]

योगसाक्षात्काराची सुरुवात

साधना, योग आणि रूपांतरण – १०७ (श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…) …कर्म करत असताना ध्यान करता कामा नये, कारण त्यामुळे तुमचे कामातील लक्ष विचलित होते, मात्र ज्याला तुम्ही ते कर्म अर्पण करणार आहात त्या एकमेवाद्वितीय ‘ईश्वरा’चे स्मरण तुमच्यामध्ये कायम असले पाहिजे. ही झाली केवळ एक पहिली प्रक्रिया; कारण, पृष्ठवर्ती मन कर्म करत असताना, ‘दिव्य […]

खऱ्या चेतनेसह कर्म करणे

साधना, योग आणि रूपांतरण – १०६ तुम्ही ज्या सर्व अडचणींचे वर्णन करत आहात त्या बहुतेक सर्वच माणसांच्या बाबतीत अगदी स्वाभाविक असतात. एखादी व्यक्ती ध्यानाला शांतपणे बसलेली असते तेव्हा ‘ईश्वरा’चे स्मरण राखणे आणि ‘ईश्वरी उपस्थिती’ची जाणीव ठेवणे हे तुलनेने सोपे असते; पण व्यक्तीला कामामध्ये व्यग्र राहावे लागत असेल तर तसे करणे तिला अधिक कठीण असते. कर्मामधील […]

कर्माचे योगांतर्गत लाभ

साधना, योग आणि रूपांतरण – १०५ श्रीमाताजींसाठी जे कोणी पूर्ण प्रामाणिकपणे कार्य करतात त्यांच्या योग्य चेतनेची तयारी त्या कर्मामधूनच होत जाते. अगदी ते ध्यानाला बसले नाहीत किंवा त्यांनी कोणती एखादी योगसाधना केली नाही तरीही त्यांच्या चेतनेची तयारी होत असते. ध्यान कसे करावे हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जर कर्म करत असताना तसेच सदासर्वकाळ प्रामाणिक […]

पूर्णयोगामध्ये आवश्यक असणारे कर्म

साधना, योग आणि रूपांतरण – १०४ मी नेहमीच असे सांगत आलो आहे की, साधना म्हणून करण्यात आलेले कर्म – करण्यात आलेले कर्म म्हणजे ‘ईश्वरा’कडून आलेला ऊर्जेचा प्रवाह या भूमिकेतून केलेले कर्म, पुन्हा त्या ‘ईश्वरा’ला अर्पण करणे किंवा ‘ईश्वरा’साठी केलेले कर्म किंवा भक्तिभावाने केलेले कर्म हे साधनेचे एक प्रभावी माध्यम असते आणि अशा प्रकारचे कर्म हे […]

साधना, योग आणि रूपांतरण – १०३

साधना, योग आणि रूपांतरण – १०३ तुम्ही ‘ध्यान’ कशाला म्हणता? डोळे मिटणे आणि मन एकाग्र करणे याला तुम्ही ‘ध्यान’ म्हणता? खरी चेतना अवतरित करण्यासाठी तिला आवाहन करण्याची ही केवळ एक पद्धत आहे. खऱ्या चेतनेशी जोडले जाणे आणि तिचे अवतरण जाणवणे, हीच गोष्ट फक्त महत्त्वाची असते आणि जर ते अवतरण कोणत्याही पारंपरिक पद्धतीविना होत असेल, जसे […]

रूपांतरणासाठी कर्माची आवश्यकता

साधना, योग आणि रूपांतरण – १०२ चेतना ‘ईश्वरा’प्रत खुली करणे आणि प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवून आणणे हे साधनेचे उद्दिष्ट असते. ध्यान किंवा निदिध्यासन हा एक साधन आहे मात्र केवळ एक साधन, भक्ती हे दुसरे एक साधन आहे, तर कर्म हे आणखी एक साधन आहे. साक्षात्काराच्या दिशेने अवलंबण्यात आलेले पहिले साधन म्हणून योग्यांकडून ‘चित्तशुद्धीची साधना’ केली जात […]

निर्गुण सच्चिदानंदाचा साक्षात्कार

साधना, योग आणि रूपांतरण – १०० पूर्णयोगाचा जो साधक ‘अवैयक्तिक, निर्गुण ब्रह्मा’पाशीच थांबतो तो त्यानंतर मात्र ‘पूर्णयोगाचा साधक’ असू शकत नाही. ‘अवैयक्तिक, निर्गुण साक्षात्कार’ हा स्वयमेव शांत ‘आत्म्याचा’, विशुद्ध ‘सत् चित् – आनंदा’चा साक्षात्कार असतो, ज्यामध्ये ‘सत्यमया’ची, ‘चैतन्यमया’ची, ‘आनंदमया’ची कोणतीही जाणीव नसते. हा साक्षात्कार ‘निर्वाणा’ कडे घेऊन जातो. आत्मसाक्षात्कार आणि निर्गुण सच्चिदानंदाचा साक्षात्कार ही जरी […]

साक्षात्कार आणि रूपांतरण

साधना, योग आणि रूपांतरण – ९९ ज्या विस्तीर्णतेमध्ये, नितांत स्थिर-प्रशांततेमध्ये आणि निरवतेमध्ये विलीन झाल्याची जाणीव तुम्हाला होत आहे त्यालाच ‘आत्मा’ किंवा ‘शांत-ब्रह्म’ असे संबोधले जाते. या आत्म्याचा किंवा शांत-ब्रह्माचा साक्षात्कार करून घेणे आणि त्यामध्ये जीवन व्यतीत करणे हेच अनेक योगमार्गांचे संपूर्ण ध्येय असते. परंतु ‘ईश्वर’-साक्षात्काराची आणि जिवाचे उच्चतर किंवा दिव्य ‘चेतने’मध्ये वृद्धिंगत होत जाणे, ज्याला […]

अतिमानसिक साक्षात्कार

साधना, योग आणि रूपांतरण – ९८ ‘अधिमानस’ (overmind) किंवा ‘अतिमानसा’च्या (supermind) विकसनाच्या कितीतरी आधी ‘चैतन्या’चा साक्षात्कार होतो. प्रत्येक काळातल्या शेकडो साधकांना आजवर उच्चतर मानसिक पातळ्यांवर (बुद्धेः परत:) ‘आत्म’साक्षात्कार झालेला आहे पण त्यांना अतिमानसिक साक्षात्कार झालेला नाही. व्यक्तीला ‘आत्म्या’चा किंवा ‘चैतन्याचा किंवा ‘ईश्वरा’चा मानसिक, प्राणिक किंवा अगदी शारीरिक पातळीवरही ‘आंशिक’ साक्षात्कार होऊ शकतो आणि व्यक्ती जेव्हा […]