Entries by श्रीअरविंद

भारताचे पुनरुत्थान – १६

भारताचे पुनरुत्थान – १६ ‘कर्मयोगिन्’या नियतकालिकामधून… कलकत्ता : दि. १९ जून १९०९ मानवतेसाठी भारताच्या उभारणीमध्ये साहाय्यभूत होणे हे आमचे ध्येय आहे. हाच आमच्या राष्ट्रीयतेचा आत्मा आहे आणि त्याचेच आम्ही आग्रहाने प्रतिपादन करतो आणि त्याचेच अनुसरण करतो. मानवतेला आमचे असे सांगणे आहे की, “आता अशी वेळ आली आहे की तुम्ही एक मोठे पाऊल उचलले पाहिजे आणि […]

भारताचे पुनरुत्थान – १५

भारताचे पुनरुत्थान – १५ (इ. स. १९१८ साली ‘राष्ट्रीय शिक्षण सप्ताहा’निमित्त श्री. अरविंद घोष यांनी दिलेला संदेश) हा असा काळ आहे की, जेव्हा अखिल जगाप्रमाणेच भारतासाठीसुद्धा, त्याची भावी नियती आणि त्याची पावले कोणत्या दिशेने वळण घेणार आहेत हे येणाऱ्या शतकासाठी म्हणून दमदारपणाने निर्धारित केले जात आहे. आणि हे निर्धारण कोणत्या एखाद्या सामान्य शतकासाठीचे नाही तर, […]

भारताचे पुनरुत्थान – १४

भारताचे पुनरुत्थान – १४ उत्तरार्ध इच्छाशक्ती ही सर्वशक्तिमान असते परंतु ती ‘ईश्वरी इच्छा’ असली पाहिजे; म्हणजे ती निःस्वार्थ, स्थिरचित्त आणि परिणामांबाबत निश्चिंत असली पाहिजे. येशू ख्रिस्ताने म्हटले होते की, “तुमच्याकडे मोहरीच्या दाण्याएवढी जरी श्रद्धा असेल तरी तुम्ही एखाद्या पर्वतासमोर उभे राहून त्याला आवाहन करू शकता आणि तुम्ही तसे केल्यावर तो खरोखरच तुमच्यापाशी येईल.” येथे ‘श्रद्धा’ […]

भारताचे पुनरुत्थान – १३

भारताचे पुनरुत्थान – १३ पूर्वार्ध लेखनकाळ : इ.स.१९१० खरी अडचण ही आपल्या अवतीभोवती नसते; तर ती नेहमी आपल्या स्वत:मध्येच असते. व्यक्तीला अजेय बनविण्यासाठी संकल्पशक्ती, निरपेक्ष वृत्ती (Disinterestedness) आणि श्रद्धा या तीन गोष्टींची आवश्यकता असते. स्वतःला बंधमुक्त करून घेण्याची आपली इच्छा असू शकते, तसा संकल्पही केलेला असू शकतो पण पुरेशा श्रद्धेचा अभाव असू शकतो. आपल्यामध्ये स्वतःच्या […]

भारताचे पुनरुत्थान – १२

भारताचे पुनरुत्थान – १२ ‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून… कलकत्ता : दि. १६ मार्च १९०८ मानवतेला पुन्हा एकदा मानवी स्वातंत्र्य, मानवी समता, मानवी बंधुता यांच्या खऱ्या उगमस्रोताकडे वळविणे हे भारताचे जीवितकार्य आहे. मनुष्य जेव्हा आत्मस्वातंत्र्य अनुभवतो तेव्हा इतर सर्व स्वातंत्र्य त्याच्या सेवेला हजर असतात; कारण ईश्वर हा ‘मुक्त’ असतो आणि तो कशानेही बांधला जाऊ शकत नाही. […]

भारताचे पुनरुत्थान – ११

भारताचे पुनरुत्थान – ११ ‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून… कलकत्ता : दि. ०५ मार्च १९०८ भारताला आता जर का एका महान सामाजिक क्रांतीची आवश्यकता असेल तर ती याच कारणासाठी की, भारताचा प्राचीन व अविचल आत्मा ज्यामधून अभिव्यक्त होऊ शकत नाही अशा रूपांशी आपण अजूनही जखडून राहिलो तर, त्यामुळे स्वराज्याचा आदर्श सिद्धीस जाऊ शकणार नाही. भारतमातेने भूतकाळात […]

भारताचे पुनरुत्थान – १०

भारताचे पुनरुत्थान – १० ‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून… कलकत्ता : दि. २२ फेब्रुवारी १९०८ मनुष्याच्या अंतरंगामध्ये ईश्वराचे वास्तव्य असते (याचे प्रत्यंतर येणे) म्हणजे संपूर्ण साक्षात्कार आणि तोच समग्र धर्म आहे. जेव्हा भारताला (आद्य) शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य यांच्याकडून मिळालेल्या शिकवणुकीचे स्मरण होईल; श्रीरामकृष्ण (परमहंस) कोणते सत्य प्रकट करण्यासाठी आले होते याची जेव्हा भारताला जाणीव होईल तेव्हा […]

भारताचे पुनरुत्थान – ०९

भारताचे पुनरुत्थान – ०९ ‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून… कलकत्ता : दि. २१ फेब्रुवारी १९०८ जगाचे भवितव्य हे भारतावर अवलंबून आहे. जेव्हा कधी भारत त्याच्या निद्रेमधून जागा होतो तेव्हा तो झळाळणारे काही अद्भुत प्रकाशकिरण जगाला प्रदान करतो आणि ते प्रकाशकिरण अनेकानेक राष्ट्रांना प्रकाशित करण्यासाठी पुरेसे असतात. भारताला एखादा विचार करण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो मात्र तोच […]

भारताचे पुनरुत्थान – ०८

भारताचे पुनरुत्थान – ०८ (श्री. अरविंद घोष यांनी ३१ जानेवारी १९०८ रोजी नागपूर येथे केलेल्या भाषणातील अंशभाग) राष्ट्राचा आत्मसन्मान हाच आपला धर्म आणि आत्मयज्ञ हीच आपली एकमेव कृती किंवा हेच आपले एकमेव कर्तव्य! आपल्यामधील दैवी गुण प्रकट व्हावेत यासाठी आपण पुरेसा वाव दिला पाहिजे. क्षुल्लक भावनांचा त्याग केला पाहिजे. मरणाचा प्रसंग आला तरी घाबरता कामा […]

भारताचे पुनरुत्थान – ०७

भारताचे पुनरुत्थान – ०७ (श्री. अरविंद घोष यांनी मुंबईमध्ये दि. १९ जानेवारी १९०८ रोजी केलेल्या भाषणातील हा मजकूर…) ‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून… कलकत्ता : दि. २३ फेब्रुवारी १९०८ सध्या भारतामध्ये स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणविणारा एक पंथ आहे, हा पंथ तुमच्याकडे (महाराष्ट्रामध्ये) बंगालमधून आलेला आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी या पंथाचा स्वीकार केलेला आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला […]