Entries by अभीप्सा मराठी मासिक

महायोगी श्रीअरविंद – १५

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ श्रीअरविंदांमध्ये १९४८ ते १९४९ च्या दरम्यान आजारपणाची काही लक्षणं दिसून आली. मध्यंतरीच्या काळात ती दिसेनाशी झाली होती पण कालांतराने म्हणजे १९५० च्या मध्यावर ती पुन्हा एकदा दिसू लागली. आणि दि. ०५ डिसेंबर १९५० रोजी पहाटे ०१ वाजून २६ मिनिटांनी श्रीअरविंदांनी देह ठेवला. श्रीअरविंद यांचा देह समाधि-स्थानी ठेवण्याची सारी व्यवस्था […]

महायोगी श्रीअरविंद – १४

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ श्रीअरविंद एकांतवासात गेले तेव्हापासून, म्हणजे सन १९२६ पासून ते १९५० पर्यंतच्या कालावधीतील त्यांचे एकही छायाचित्र उपलब्ध नाही. कारण जेव्हा त्यांचे छायाचित्र काढण्याची परवानगी मागण्यात आली होती तेव्हा त्यांनी त्यास नकार दिला होता आणि टिप्पणी केली होती : “बऱ्याच लोकांनी यापूर्वी देखील असा प्रस्ताव मांडला होता.” छायाचित्रांची ही प्रतीक्षा एप्रिल […]

महायोगी श्रीअरविंद – १३

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ ‘श्रीअरविंद आश्रमा’तर्फे फेब्रुवारी १९४९ मध्ये दोन नियतकालिके प्रकाशित होऊ लागली. एक म्हणजे Bulletin of Physical Education (शारीरिक शिक्षण विभागाचे वार्तापत्र), हे त्रैमासिक आणि दुसरे पाक्षिक मदर इंडिया. ‘बुलेटिन’ हा श्रीअरविंद आश्रमाच्या क्रीडा विभागाचा एक अविभाज्य भाग आहे. या क्रीडा विभागात आश्रमातील आबालवृद्ध सहभागी होतात. त्याची स्थापना श्रीमाताजींनी केली होती […]

महायोगी श्रीअरविंद – १२

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ श्रीअरविंदांचा एकांतवासाचा काळ हा त्यांच्या भरघोस साहित्यनिर्मितीचा कालखंड होता. श्रीअरविंद १९३० सालच्या सुमारास, साधकांना उद्देशून प्रचंड मोठ्या प्रमाणात पत्रलेखन करत होते पण त्याचबरोबर ते विपुल प्रमाणात काव्यनिर्मिती आणि गद्यलेखनसुद्धा करत होते. या कालखंडामध्ये त्यांनी अनेक कविता, विशेषतः सुनीतं लिहिली आहेत, आणि पाँडिचेरीला प्रारंभीच्या दिवसांपासून ज्या ‘सावित्री’ महाकाव्याच्या लेखनाची सुरूवात […]

महायोगी श्रीअरविंद – ११

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ भारतामध्ये स्वातंत्र्यासाठी संघर्ष चालूच राहिला. फेब्रुवारी १९४६ साली, बंगाल आणि इतर प्रांतांमध्ये उसळलेल्या हिंदु-मुस्लीम दंग्यांमुळे ज्याची जटिलता अधिकच वाढली होती. भारताच्या स्वातंत्र्याविषयीच्या वाढत्या मागणीला दिलेला प्रतिसाद म्हणून, हा देश सोडून जाण्याचा इरादा असल्याचे ब्रिटिश सरकारने जाहीर केले. दि. ०१ जुलै १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्याचे विधेयक संसदेमध्ये पारित करण्यात आले; […]

महायोगी श्रीअरविंद – १०

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ १९४२ साली जेव्हा दुसरे महायुद्ध भारताच्या दिशेने अधिकाधिक सरकू लागले तेव्हा आश्रमापासून लांब राहत असलेले साधकही, श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या थेट संरक्षणाच्या छत्रछायेखाली पाँडिचेरीला येऊ इच्छित होते. अनेक साधकांना तशी परवानगीही देण्यात आली होती. काही साधकांनी तर येताना आपल्याबरोबर स्वतःच्या सर्व कुटुंबीयांनाच आश्रमात आणले. तोपर्यंत आश्रमातील लहान मुलांची संख्या […]

महायोगी श्रीअरविंद – ०९

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ श्रीअरविंद यांनी क्रिप्स यांच्या प्रस्तावाला संमती दिली होती कारण तो प्रस्ताव स्वीकारल्याने भारत आणि ब्रिटन यांना आसुरी शक्तींच्या विरोधात एकत्रितपणे उभे राहणे शक्य झाले असते आणि क्रिप्स यांची योजना स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल म्हणून उपयोगात आणता आली असती. दि. ३१ मार्च १९४२ रोजी श्रीअरविंदांनी ब्रिटिश मुत्सद्याला पुढील संदेश […]

महायोगी श्रीअरविंद – ०८

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ श्रीअरविंदांनी सुरुवातीला स्वतःला (दुसऱ्या) महायुद्धाशी सक्रियपणे जोडून घेतलेले नव्हते. पण हिटलर जेव्हा त्याच्या विरोधात असणाऱ्या सर्व शक्तींना चिरडून टाकणार आणि या जगावर नाझींचे वर्चस्व प्रस्थापित होणार, असे दिसू लागले तेव्हा मग, त्यांनी हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. त्यांनी जाहीरपणे मित्रराष्ट्रांची (चीन, रशिया, इंग्लंड व अमेरिका) (Allies) बाजू घेतली, निधी गोळा […]

महायोगी श्रीअरविंद – ०७

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ आता येथील आश्रमीय जीवन म्हणजे साधकांची साधना, त्यांचे कर्म, आणि त्याहून अधिक म्हणजे श्रीअरविंद आणि श्रीमाताजींची साधना या साऱ्या गोष्टी एका लयीमध्ये सुरू होत्या… अगदी २४ नोव्हेंबर १९३८ च्या दर्शनदिनाच्या पूर्वसंध्येपर्यंत सारे काही सुरळीत चालू होते. श्री. ए. बी. पुराणी (श्रीअरविंद यांचे निकटवर्ती अनुयायी) यांच्या शब्दांत सांगायचे तर, “दि. […]

महायोगी श्रीअरविंद – ०६

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ श्रीअरविंदांनी डिसेंबर १९३८ मध्ये परत एकदा सांगितले की, ”साधना जेव्हा जडभौतिकामध्ये (physical) आणि अवचेतनेमध्ये (subconscient) खाली उतरली तेव्हा गोष्टी खूपच अवघड झाल्या. मला स्वतःला त्यासाठी दोन वर्षे संघर्ष करावा लागला कारण अवचेतन हे अतिशय जड असते, ते एखाद्या दगडासारखे जड असते. माझे मन ऊर्ध्वदिशेने जागृत असूनसुद्धा ते स्वतःचा कोणताही […]