लहान मुलांना भीती का वाटते? कारण ती दुर्बल असतात. त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या मोठ्या माणसांपेक्षा शारीरिकदृष्ट्या ती दुर्बल असतात आणि सहसा ती प्राणिक व मानसिकदृष्ट्या देखील कमकुवत असतात. दुर्बलतेच्या भावनेतून भीती उद्भवते. तथापि, भीतीपासून सुटका करून घेण्याचा एक मार्ग असतो.
ईश्वरी कृपेवर श्रद्धा ठेवणे आणि सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये तिने तुमचे संरक्षण करावे म्हणून तुम्ही तिच्यावर विसंबून असणे हा तो मार्ग होय. तुमच्या आत्म्याशी म्हणजे तुमच्या अस्तित्वाच्या सत्याशी असणारा संपर्क तुम्ही वाढवत नेलात तर आणि तुम्ही जो विचार कराल, तुम्ही जे काही बोलाल, तुम्ही जे काही कराल त्या सर्व गोष्टी म्हणजे अंतरंगात असणाऱ्या सत्याची अभिव्यक्ती ठरली पाहिजे असा प्रयत्न जर तुम्ही नेहमीच करत राहिलात तर, तुम्ही जसजसे मोठे होत जाल तसतसे तुम्ही या भीतीमधून बाहेर पडाल.
तुम्ही जेव्हा त्या सत्यामध्येच जाणीवपूर्वक निवास करू लागाल तेव्हा तुमच्या अस्तित्वाच्या कोणत्याही भागातून (शरीराने, प्राणाने किंवा मनाने) तुम्ही कोणत्याही गोष्टीला घाबरणार नाही. कारण तेव्हा तुम्ही या जगाचे संचालन करणाऱ्या वैश्विक सत्याशीच एकात्म पावलेले असाल.
श्रीमाताजी (CWM 12 : 125)
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…
सर्व भावभावनांच्या पलीकडे आपल्या अस्तित्वाच्या निःशब्द आणि अक्षोभ गहनतेमध्ये एक प्रकाश सातत्याने उजळलेला असतो, तो…
स्वत:च्या आत्म्याचा शोध घेण्यात आणि आत्मसत्तेनुसार जीवन जगण्यामध्ये आलेले अपयश ही खरोखरच मनुष्याची एकमेव…
पृथ्वीवरील समग्र जीवसृष्टीमध्ये केवळ मानवाला एक आगळीवेगळी क्षमता परमेश्वराने बहाल केली आहे. स्वतःला वेगळे…
एक अशा प्रकारचा ऊर्जास्रोत असतो की, ज्याचा एकदा शोध लागला की मग बाह्य परिस्थिती…