अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण
अवचेतनामधील (subconscient) जडत्व दूर करण्यासाठी शरीराचे साहाय्य होऊ शकते याचे कारण असे की, अवचेतन हे शरीराच्या लगेच खाली असते. त्यामुळे प्रकाशित, प्रबुद्ध शरीर हे अवचेतनावर थेटपणे आणि संपूर्णपणे कार्य करू शकते आणि मन व प्राणदेखील करू शकणार नाहीत अशा रीतीने ते कार्य करू शकते. तसेच या थेट कार्यामुळे मन व प्राण मुक्त होण्यासदेखील साहाय्य होऊ शकते.
*
जेव्हा मन, प्राण व शरीर हे संपूर्णपणे दिव्य होतील आणि त्यांचे अतिमानसिकीकरण (supramentalised) घडून येईल तेव्हा ते ‘परिपूर्ण रूपांतरण’ असेल आणि त्या दिशेने घेऊन जाणारी प्रक्रिया हीच रूपांतरणाची खरी प्रक्रिया होय.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 598) (CWSA 28 : 297)
*
केवळ मन आणि प्राणानेच नव्हे तर, शरीराने सुद्धा त्याच्या सर्व पेशींसहित दिव्य रूपांतरणाची आस बाळगली पाहिजे.
– श्रीमाताजी (CWM 15 : 89)
श्रीमाताजी आणि समीपता – १५ माणसं ज्याला ‘प्रेम’ असे संबोधतात तशा प्रकारची सामान्य प्राणिक भावना…
श्रीमाताजी आणि समीपता – १४ तुम्हाला जर सदोदित श्रीमाताजींच्या संपर्कात राहायचे असेल तर निराशेमधून, औदासिन्यातून…
श्रीमाताजी आणि समीपता – १३ साधक : एखादी व्यक्ती जर स्वतःच्या अंत:करणामध्ये डोकावून पाहील तर…
श्रीमाताजी आणि समीपता – १२ साधक : एकमेव श्रीमाताजींमध्ये विलीन होण्याची आणि प्रत्येकाशी असलेले माझे…
श्रीमाताजी आणि समीपता – ११ साधक : मी माझ्या खोलीत एकटा होतो तेव्हा खूप खुश…
श्रीमाताजी आणि समीपता – १० व्यक्ती जोपर्यंत अंतरंगामध्ये जीवन जगत नाही तोपर्यंत व्यक्तीला चिरकाळ टिकेल…