ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

शारीर-मनाचे मुख्य दोष व त्यांपासून सुटका

साधना, योग आणि रूपांतरण – २४७

मनाचे रूपांतरण

शारीर-मन (physical mind) सर्व तऱ्हेचे प्रश्न उपस्थित करत राहते आणि त्याला योग्य उत्तर समजू शकत नाही किंवा ते योग्य उत्तर देऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या या छोट्याशा शारीर-मनाच्या आधारे शंका-कुशंका घेणे, प्रश्न उपस्थित करणे बंद केलेत आणि तुमच्या अंतरंगामध्ये असलेल्या सखोल व व्यापक चेतनेला बाहेर येण्यास आणि तिचा विकास करण्यास वाव दिलात तरच तुम्हाला खरे ज्ञान मिळू शकेल आणि योग्य आकलन होऊ शकेल. त्यानंतर तुम्हाला आपोआपच खरे उत्तर आणि खरे मार्गदर्शन मिळेल. या आंतरिक चेतनेच्या विकसनाकडे लक्ष पुरविण्याऐवजी तुम्ही तुमच्या बाह्यवर्ती मनाला आणि त्याच्या कल्पनांना, त्याच्या आकलनाला अवाजवी महत्त्व देत आहात, तुमच्याकडून ही चूक होत आहे.
*
शारीर-मनाचे स्वरूपच असे असते की ते अतिभौतिक (supraphysical) गोष्टींवर विश्वास ठेवत नाही किंवा तशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टींचा स्वीकार करत नाही. शारीर-मन जोपर्यंत (उच्चतर ज्ञान-प्रकाशाने) उजळून निघत नाही आणि तो प्रकाशच त्याला अतिभौतिक गोष्टींवर विश्वास ठेवण्यास भाग पाडत नाही तोपर्यंत ते विश्वास ठेवत नाही. या शारीर-मनाशी तुम्ही स्वतःला एकरूप करू नका किंवा हे शारीर-मन म्हणजेच तुम्ही आहात असेही समजू नका, तर ते मन म्हणजे ‘प्रकृती’च्या अंधकारमय कार्यप्रणालीचा एक भाग आहे असे समजा. आणि या मनाला त्या अतिभौतिक गोष्टींवर विश्वास ठेवणे भाग पाडले जात नाही तोपर्यंत शारीर-मनामध्ये प्रकाश अवतरित व्हावा यासाठी आवाहन करत राहा.
*
शारीर-मनाला अंतरात्म्याकडून (psychic) गोष्टींकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन व योग्य मार्ग मिळाल्यामुळे, शारीर-मनावर अंतरात्म्याचा प्रचंड प्रभाव पडू शकतो. आणि त्यामुळे शारीर-मन भावनिक अस्तित्वाला त्याच्या अभीप्सेमध्ये, प्रेमामध्ये आणि समर्पणामध्ये आधार पुरवते. गोष्टींच्या फक्त बाह्य पैलूंकडे बघण्याऐवजी, आणि त्यांच्या मिथ्या अनुमानांवर आणि वरकरणी दृश्यांवर विसंबून राहण्याऐवजी आता शारीर-मनाला स्वतःलाच गोष्टींच्या आंतरिक सत्यामध्ये स्वारस्य वाटू लागते, त्या आंतरिक सत्यामधून त्याला त्याविषयीची अंतर्दृष्टी प्राप्त होते आणि त्याची श्रद्धा वाढीस लागते. संकुचितपणा आणि शंका हे शारीर-मनाचे जे मुख्य दोष असतात, त्यांच्यापासून सोडवणूक करण्यासाठीसुद्धा शारीर-मनाला अंतरात्म्याचे साहाय्य लाभते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 52, 35, 38)

श्रीअरविंदश्रीअरविंद
श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

पायाभूत स्थिरीकरण

साधना, योग आणि रूपांतरण – २८१ शरीराचे रूपांतरण तुमच्या साधनेसाठी पहिली आवश्यक गोष्ट कोणती असेल…

14 minutes ago

आवश्यक असणारे परिवर्तन

साधना, योग आणि रूपांतरण – २८० शरीराचे रूपांतरण (शरीराच्या एखाद्या भागाचे) रूपांतरण घडविताना, अडचणींना सामोरे…

1 day ago

कनिष्ठ शारीर-प्रकृतीवर कार्य

साधना, योग आणि रूपांतरण – २७९ शरीराचे रूपांतरण (श्रीअरविंद एका साधकाला लिहीत आहेत...) साधनेच्या वाटचालीदरम्यान…

2 days ago

योगचेतनेची पुनर्प्राप्ती

साधना, योग आणि रूपांतरण – २७८ शरीराचे रूपांतरण (श्रीअरविंद एका साधकाला लिहीत आहेत...) तुम्ही तुमच्या…

3 days ago

शारीर-चेतनेचा संथ प्रतिसाद व त्यावरील उपाय

साधना, योग आणि रूपांतरण – २७७ शरीराचे रूपांतरण (श्रीअरविंद एका साधकाला लिहीत आहेत...) दीर्घ काळ…

4 days ago

शारीर-साधनेचे सूत्र

साधना, योग आणि रूपांतरण – २७६ शरीराचे रूपांतरण शारीर-साधनेमध्ये पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो. १) जडभौतिकाच्या…

5 days ago