साधना, योग आणि रूपांतरण – २०७
श्रीमाताजींवर चित्ताची एकाग्रता आणि त्यांच्याप्रति आत्मार्पण हे चैत्य पुरुष (psychic being) खुले करण्याचे थेट मार्ग आहेत. भक्तीमध्ये वाढ झाली असल्याचे तुम्हाला जे जाणवते, ती चैत्य विकसनाची पहिली खूण आहे.
श्रीमाताजींच्या उपस्थितीची वा त्यांच्या शक्तीची जाणीव होणे किंवा त्या तुम्हाला साहाय्य करत आहेत, समर्थ करत आहेत याचे स्मरण होणे ही पुढची खूण आहे.
सरतेशेवटी, अंतरंगातील आत्मा हा अभीप्सेमध्ये सक्रिय व्हायला सुरुवात होईल. आणि मनाला योग्य विचारांकडे वळण्यासाठी, प्राणाला योग्य गतिप्रवृत्ती व भावभावना यांच्याकडे वळण्यासाठी चैत्य बोधाकडून (psychic perception) मार्गदर्शन मिळू लागेल. ज्या गोष्टी बाजूला सारण्याची आवश्यकता असेल त्या गोष्टी दाखवून दिल्या जातील आणि त्यांना नकारही दिला जाईल आणि अशा प्रकारे व्यक्तीचे समग्र अस्तित्व, त्याच्या सर्व गतीविधींसहित त्या एकमेवाद्वितीय ‘ईश्वरा’कडेच वळविले जाईल.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 321)
साधना, योग आणि रूपांतरण – २२६ व्यक्ती (योगसाधना करून देखील) जर स्वतःच्या प्रकृतीमध्ये कोणतेही परिवर्तन…
साधना, योग आणि रूपांतरण – २२५ साधक : फक्त आंतरिक चेतनेमध्ये परिवर्तन झाले तर बाह्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२४ अर्थातच, आत्तापर्यंत, ज्यांनी कोणी हे सचेत रूपांतरण (transformation) साध्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२३ (‘रूपांतरणा’बाबत श्रीमाताजींनी अगोदर केलेल्या विवेचनातील काही भाग वाचून दाखविला…
साधना, योग आणि रूपांतरण – २२२ आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व…
साधना, योग आणि रूपांतरण – २२१ उत्तरार्ध चेतनेमध्ये अंशतः झालेल्या परिवर्तनामुळे, एकेकाळी ज्या गोष्टी तुम्हाला…