साधना, योग आणि रूपांतरण – २०३
तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या हृदयामध्ये तुम्ही चैत्य अग्नी विकसित केला पाहिजे आणि चैत्य पुरुष अग्रस्थानी यावा ही अभीप्सा तुमच्या साधनेची अग्रणी झाली पाहिजे. जेव्हा चैत्य पुरुष (psychic being) अग्रभागी येईल तेव्हा, तो तुम्हाला (तुमच्या) ‘अहंकाराच्या अलक्षित गाठी’ दाखवून देईल आणि त्या सैल करेल किंवा चैत्य अग्नीमध्ये त्या जाळून टाकेल. आंतरात्मिक किंवा चैत्य विकास आणि मानसिक, प्राणिक व शारीरिक चेतनेचे आंतरात्मिक परिवर्तन (psychic change) ही गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची असते. कारण, त्यामुळे उच्चतर चेतनेचे अवतरण आणि आध्यात्मिक रूपांतरण (spiritual transformation) सुरक्षित आणि सुकर होते. त्याविना अतिमानस (supramental) हे कायमच खूप दूर राहील. सिद्धी, शक्ती इ. गोष्टींना त्यांचे त्यांचे स्थान असते पण उपरोक्त गोष्टी झाल्या नाहीत तर त्यांचे स्थान अगदीच गौण असते.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 381)
साधना, योग आणि रूपांतरण – २२६ व्यक्ती (योगसाधना करून देखील) जर स्वतःच्या प्रकृतीमध्ये कोणतेही परिवर्तन…
साधना, योग आणि रूपांतरण – २२५ साधक : फक्त आंतरिक चेतनेमध्ये परिवर्तन झाले तर बाह्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२४ अर्थातच, आत्तापर्यंत, ज्यांनी कोणी हे सचेत रूपांतरण (transformation) साध्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२३ (‘रूपांतरणा’बाबत श्रीमाताजींनी अगोदर केलेल्या विवेचनातील काही भाग वाचून दाखविला…
साधना, योग आणि रूपांतरण – २२२ आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व…
साधना, योग आणि रूपांतरण – २२१ उत्तरार्ध चेतनेमध्ये अंशतः झालेल्या परिवर्तनामुळे, एकेकाळी ज्या गोष्टी तुम्हाला…