ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

(ऑगस्ट १९०९)

शाश्वत धर्माचा प्रसार हे आमचे उद्दिष्ट आहे आणि त्या शाश्वत धर्मावर आधारित वंशधर्माचे आणि युगधर्माचे पालन करणे हे आमचे उद्दिष्ट आहे….

….आम्ही आमच्या धर्माच्या मार्गापासून ढळलेलो आहोत, आमच्या ध्येयापासून दूर झालेलो आहोत; प्रमादपूर्णतेचे, घोडचुकांचे, धादांत भ्रमाचे, धार्मिक गोंधळाचे बळी ठरलेले आपण, ‘आर्य’ शिक्षण आणि त्याच्या नियामक नीतीतत्त्वांपासून वंचित ठरलो आहोत. ‘आर्य’ वंशकुळातील असूनसुद्धा, जेत्यांच्या वर्चस्वाने आणि दुःखवेदनांचे बळी ठरल्यामुळे, आपण कनिष्ठतेचा कायदा मान्य केला आहे आणि त्यामुळे त्याच्या पाठोपाठ येणारे दास्यत्वदेखील आपण मान्य केले आहे. आपण तगून राहावे, आपला टिकाव लागावा असे वाटत असेल तर आणि या कायम स्वरूपी नरकवासामधून आपली सुटका व्हावी अशी किंचितशी जरी इच्छा आपल्या मनात असेल तर, राष्ट्राची सेवा करणे हेच आपले प्रथम कर्तव्य आहे. आणि हे करण्याचा एक मार्ग आहे तो म्हणजे आर्य चारित्र्याची पुनर्घडण. त्यातून घडणारे ह्या मातृभूमीचे भावी सुपुत्र हे ज्ञानवंत, सत्यनिष्ठ, मानवतावादी, बंधुभावाने प्रेरित झालेले, धैर्यवान, विनम्र असतील. संपूर्ण राष्ट्राला, विशेषत: या देशातील तरुणांना, पुरेसे शिक्षण, उच्च आदर्श आणि ज्यामधून हे आर्य आदर्श उदयाला येऊ शकतील असा कार्याचा मार्ग प्रदान करणे हे आपल्यासमोरील पहिले उद्दिष्ट असले पाहिजे. आणि असे करण्यामध्ये जोवर आम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत शाश्वत धर्माचा प्रचारप्रसार करणे म्हणजे नापीक जमिनीमध्ये बी पेरण्यासारखे आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 191-192)

श्रीअरविंद
AddThis Website Tools
श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

श्रीमाताजी आणि समीपता – ११

श्रीमाताजी आणि समीपता – ११ साधक : मी माझ्या खोलीत एकटा होतो तेव्हा खूप खुश…

5 days ago

श्रीमाताजी आणि समीपता – १०

श्रीमाताजी आणि समीपता – १० व्यक्ती जोपर्यंत अंतरंगामध्ये जीवन जगत नाही तोपर्यंत व्यक्तीला चिरकाळ टिकेल…

1 week ago

श्रीमाताजी आणि समीपता – ०९

श्रीमाताजी आणि समीपता – ०९ पूर्णयोगाच्या साधनेसाठी सर्वाधिक आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे अविचलता आणि शांती,…

1 week ago

श्रीमाताजी आणि समीपता – ०८

श्रीमाताजी आणि समीपता – ०८ साधक : श्रीमाताजींबरोबर असलेले कोणते नाते हे सर्वात खरे आणि…

1 week ago

श्रीमाताजी आणि समीपता – ०७

श्रीमाताजी आणि समीपता – ०७ भौतिकदृष्ट्या ज्या व्यक्ती श्रीमाताजींच्या निकट आहेत केवळ त्याच व्यक्ती त्यांना…

2 weeks ago

श्रीमाताजी आणि समीपता – ०६

श्रीमाताजी आणि समीपता – ०६ (एका साधकाला मार्गदर्शन करणारे श्रीअरविंद लिखित पत्र...) “श्रीमाताजींपासून लपवावीशी वाटेल…

2 weeks ago