Entries by श्रीमाताजी

जीवन जगण्याचे शास्त्र – २१

जीवन जगण्याचे शास्त्र – २१ जो सशक्त असतो तो नेहमीच अविचल, दृढ असतो. दुर्बलतेमुळे अस्वस्थता येते. * साधक : शांती (peace), अविचलता (quietness) आणि स्थिरता (calm) ग्रहण करण्यासाठी मी काय केले पाहिजे? श्रीमाताजी : या गोष्टी तुमच्या केवळ एखाद्या भागाला हव्याशा वाटणे पुरेसे नाही तर, त्यांची तुम्हाला अगदी संपूर्णतया आणि प्रामाणिकपणे गरज जाणवली पाहिजे. * […]

जीवन जगण्याचे शास्त्र – २०

जीवन जगण्याचे शास्त्र – २० (मानसिक आणि प्राणिक अविचलता म्हणजे काय ते कालच्या भागात आपण समजावून घेतले. आता हा त्याचा पुढील भाग…) तुम्ही जडता अथवा सुस्त निष्क्रियता या गोष्टींना स्थिरशांती (calm) समजण्याची गल्लत कधीही करू नका. अविचलता (Quietude) ही अत्यंत सकारात्मक स्थिती असते. संघर्ष नाही म्हणजे आता शांती आहे असा येथे अर्थ नसून, ती खऱ्या […]

जीवन जगण्याचे शास्त्र – १९

जीवन जगण्याचे शास्त्र – १९ (पूर्वार्ध) (श्रीमाताजी येथे मनाच्या आणि प्राणाच्या अविचलतेसंबंधी मार्गदर्शन करत आहेत.) साधक : माताजी, तुम्ही आम्हाला जेव्हा सांगता की, ‘आम्ही शांतस्थिर असलेच पाहिजे,’ तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय असतो? श्रीमाताजी : मी जेव्हा एखाद्या व्यक्तीला ‘शांतस्थिर (calm) राहा,’ असे सांगते, तेव्हा त्याचे व्यक्तिपरत्वे भिन्नभिन्न अर्थ असतात. परंतु पहिली अगदी आवश्यक असणारी […]

जीवन जगण्याचे शास्त्र – १४

जीवन जगण्याचे शास्त्र – १४ तुमच्यामधील निराशाजनक विचारांना आळा घालण्याचा करता येईल तेवढा जास्तीतजास्त प्रयत्न करा आणि स्वेच्छापूर्वक आशावादी बना. * आपण नेहमीच योग्य ती गोष्ट करू या म्हणजे मग आपण नेहमीच शांत आणि आनंदी राहू शकू. * खरोखरच, विशुद्ध आणि निरपेक्ष प्रेमाएवढी दुसरी कोणतीच गोष्ट अधिक आनंददायी नसते. – श्रीमाताजी (CWM 12 : 141), […]

जीवन जगण्याचे शास्त्र – ११

जीवन जगण्याचे शास्त्र – ११ (आपल्या अवतीभोवतीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये व्यक्तीला आनंदाचा अनुभव कसा येतो, हे आपण अगोदरच्या भागात पाहिले. श्रीमाताजी पुढे म्हणतात…) मात्र या आनंदाचा अनुभव मनुष्यमात्रांमध्ये येणे हे काहीसे अधिक कठीण असते. कारण या आनंदाचा बोध घेण्याच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या मानसिक आणि प्राणिक रचना आडव्या येतात आणि त्या हे क्षेत्र बिघडवून टाकतात. तेथे त्यांच्यामध्ये असलेला […]

जीवन जगण्याचे शास्त्र – १०

जीवन जगण्याचे शास्त्र – १० (मागील भागापासून पुढे…) वासनांवर विजय मिळविण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ लागल्यावर, मग एक वेळ अशी येते की, व्यक्ती परिपक्व होऊ लागलेली असते. तेव्हा व्यक्तीला प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक हालचालीमध्ये, प्रत्येक स्पंदनामध्ये, अवतीभोवतीच्या प्रत्येक वस्तुमध्ये एक प्रकारचा आनंद, अस्तित्वाचा आनंद अनुभवायला मिळतो. केवळ माणसांमध्ये आणि सचेत जिवांमध्येच नव्हे तर, वस्तुंमध्ये, गोष्टींमध्येसुद्धा तो अनुभवायला […]

जीवन जगण्याचे शास्त्र – ०९

जीवन जगण्याचे शास्त्र – ०९ मनुष्य आणि ईश्वर यांच्या भेटीचा अर्थ नेहमीच, मनुष्यामध्ये ईश्वरत्वाचा प्रवेश आणि समावेश तसेच मनुष्याचा दिव्यत्वामध्ये आत्मोदय असा होतो. परंतु हा उदय विलयनाच्या स्वरूपाचा नसतो. (या जगामध्ये ज्या सगळ्या घडामोडी घडत असतात) त्या शोधाची, धडपडीची, दुःखभोगाची, परमानंदाची परिपूर्ती निर्वाण ही असूच शकत नाही. निर्वाण हाच जर या लीलेचा अंत असता, तर […]

जीवन जगण्याचे शास्त्र – ०८

जीवन जगण्याचे शास्त्र – ०८ सामान्य आनंदाचा उगम प्राणामध्ये असतो; तो आनंद अशुद्ध असतो आणि परिस्थितीवर अवलंबून असतो. (मात्र) खऱ्या आनंदाचा उगम ईश्वरत्वामध्ये असतो; तो विशुद्ध आणि परिपूर्ण असतो. * साधेपणाने राहायचे, साधी सदिच्छा बाळगायची; फार लक्षणीय असे काही करण्याची गरज नसते मात्र सर्वोत्तम असे जे करता येणे शक्य असेल ते ते करायचे आणि ते […]

जीवन जगण्याचे शास्त्र – ०७

जीवन जगण्याचे शास्त्र – ०७ साधक : कधीकधी मला असे वाटते की, मी माझ्या सर्व दैनंदिन गोष्टी (उदाहरणार्थ मैदानावर खेळणे, वाद्यवादन, अभ्यास इत्यादी) सोडून द्याव्यात आणि सर्व वेळ फक्त (तुम्ही नेमून दिलेल्या) कामावरच लक्ष केंद्रित करावे. पण माझ्या तर्कबुद्धीला हे पटत नाही. माझ्या मनात ही अशी कल्पना कोठून आणि का येते? श्रीमाताजी : येथे तुमची […]

जीवन जगण्याचे शास्त्र – ०६

जीवन जगण्याचे शास्त्र – ०६ (व्यक्तित्व विभागलेले असताना कशी स्थिती असते, ते आपण कालच्या भागात पाहिले. प्रामाणिकपणासाठी काम करणे कसे आवश्यक आहे तेही श्रीमाताजींनी अधोरेखित केले. आता ते कसे करायचे यासंबंधी त्या मार्गदर्शन करत आहेत.) तुमच्या व्यक्तित्वामधील एखादा भाग तुम्हाला (तुमच्या ध्येयाच्या) विरुद्ध दिशेने खेचत आहे, असे जेव्हा तुमच्या लक्षात येते तेव्हा तुम्ही त्याला काळजीपूर्वक […]