बुद्धीचे खरे कार्य
विचारशलाका २२ बुद्धी, तर्कबुद्धी (Reason) ही सामान्य जीवनाच्या तर्कसंगत क्षेत्राशी संबंधित असलेल्या गोष्टींचेच मूल्यमापन करू शकते. आणि श्रीअरविंदांनी म्हटल्याप्रमाणे, मानवी जीवनातील प्राणिक आणि मानसिक कृतींचे, गतिविधींचे संयोजन आणि नियंत्रण करणे, हेच बुद्धीचे खरे कार्य असते. समजा, जर एखाद्या व्यक्तीमध्ये प्राणिक असमतोल (vital disorder) असेल, विकार असतील, आवेग, वासना आणि तत्सम इतर गोष्टी असतील आणि […]





