Entries by श्रीमाताजी

नैराश्यापासून सुटका – ३३

नैराश्यापासून सुटका – ३३ (व्यक्तीमध्ये मनोरचना करण्याचे आणि त्या प्रत्यक्षात उतरविण्याचे सामर्थ्य कसे असते, ते श्रीमाताजींनी सविस्तर सांगितले आहे. परंतु मनोरचना करण्याचे उत्तम सामर्थ्य असणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व जर विखुरलेले असेल, त्यामध्ये परस्परविरोधी इच्छा-आकांक्षा असतील तर कसे नुकसान होते, तसेच कल्पनाशक्तीवर नियंत्रण कसे ठेवता येते, ते त्या इथे सांगत आहेत…) मला अशी काही लोकं माहीत आहेत […]

नैराश्यापासून सुटका – ३२

नैराश्यापासून सुटका – ३२ (प्रत्येक व्यक्ती नकळतपणे वातावरणामध्ये स्वत:च्या मनोरचना पाठवत असते. त्या मनोरचनांचे विश्व कसे असते याचे वर्णन कालच्या भागात आपण विचारात घेतले. त्याचा हा उत्तरार्ध…) आपण स्वतः विचार करत असताना, स्वतःकडे पाहणे आणि (मनोरचना प्रत्यक्षात कशा येतात यासंबंधी) घटना पाहणे, स्वतःला आविष्कृत करू पाहणाऱ्या या छोट्याछोट्या जिवंत आकृत्यांचे वातावरणामध्ये सातत्याने जे प्रक्षेपण चालू […]

नैराश्यापासून सुटका – ३१

नैराश्यापासून सुटका – ३१ आपण सदासर्वकाळ मनोमय प्रतिमा, मनोरचना (formation) निर्माण करत असतो. आपल्याही नकळतपणे आपण अशा प्रकारच्या प्रतिमा वातावरणामध्ये पाठवत असतो. मग त्या प्रतिमा, त्या मनोरचना वातावरणात इतस्तत: फिरत राहतात. त्या एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातात, त्या मनोरचनांना त्यांचे सहचर भेटतात, कधीकधी त्या एकत्रित येतात आणि आनंदाने एकत्र राहू लागतात. कधीकधी त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण […]

नैराश्यापासून सुटका – ०५

नैराश्यापासून सुटका – ०५ सत्कृत्य करणे; न्यायाने, सरळपणाने, प्रामाणिकपणाने वागणे हा शांत व समाधानी जीवन जगण्याचा आणि स्वत:च्या चिंता, काळज्या कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे. अगदी पूर्ण स्वार्थी हेतुने पाहिले तरीसुद्धा ही गोष्ट खरी असल्याचे दिसते. याशिवाय खरोखरच, एखादी व्यक्ती जर नि:स्वार्थी, निरपेक्ष असेल आणि कोणत्याही वैयक्तिक आशाआकांक्षा वा अहंकारापासून मुक्त असेल तर, ती व्यक्ती […]

नैराश्यापासून सुटका – ०२

नैराश्यापासून सुटका – ०२ तुम्ही कधीच एकाकी नसता, हे कधीही विसरू नका. ‘ईश्वर’ तुमच्या सोबत असून तो तुम्हाला साहाय्य करत आहे, मार्गदर्शन करत आहे. ‘तो’ असा सोबती आहे की जो कधीच साथसंगत सोडत नाही; ‘तो’ असा मित्र आहे, ज्याचे प्रेम तुम्हाला सामर्थ्यवान बनविते आणि समाधान देते. तुम्हाला जितका जास्त एकाकीपणा जाणवेल, तेवढे तुम्ही त्या ईश्वराच्या […]

जीवन जगण्याचे शास्त्र – ३०

जीवन जगण्याचे शास्त्र – ३० साधक : अभीप्सेचा अग्नी कधीही विझू नये यासाठी मी काय केले पाहिजे? श्रीमाताजी : व्यक्ती जेव्हा तिच्या सर्व अडीअडचणी, तिच्या इच्छावासना, तिच्या सर्व अपूर्णता यांचे त्या अग्नीमध्ये हवन करत राहते तेव्हा त्यामुळे, तो अग्नी तेवत राहतो. अभीप्सेचा हा अग्नी प्रज्वलित राहावा म्हणून सकाळ-संध्याकाळ मला अंतःकरणपूर्वक प्रार्थना करा आणि त्या अग्निमधील […]

जीवन जगण्याचे शास्त्र – २७

जीवन जगण्याचे शास्त्र – २७ प्रत्येक क्षणाला तुम्ही तुमच्या अभीप्सारूपी संकल्पाची भेट (ईश्वराला) देऊ शकता. “हे प्रभो, सारे काही तुझ्या इच्छेप्रमाणे घडू दे” अशा शब्दांतच ती अभीप्सा शब्दबद्ध होत नाही तर, “जी सर्वोत्तम गोष्ट आहे ती मला शक्य तितक्या चांगल्या रितीने करता येऊ दे,” अशा शब्दात ती अभीप्सा अगदी सहजस्वाभाविक रितीने अभिव्यक्त होते. सर्वोत्तम गोष्ट […]

जीवन जगण्याचे शास्त्र – २५

जीवन जगण्याचे शास्त्र – २५ धीटपणा, धैर्य आणि चिकाटी हे आवश्यक असे पहिले गुण आहेत. तुम्हाला याची जाणीव असली पाहिजे की, तुम्ही जे जाणले पाहिजे त्याच्या तुलनेत तुम्ही जे जाणता ते म्हणजे काहीच नाही; तुम्ही जे करणे आवश्यक आहे त्याच्या तुलनेत तुम्ही जे करू शकता ते म्हणजे काहीच नाही आणि तुम्ही जे बनले पाहिजे त्याच्या […]

जीवन जगण्याचे शास्त्र – २४

जीवन जगण्याचे शास्त्र – २४ साधक : “सर्व कर्मं म्हणजे अनुभवाची पाठशाळा असते,” असे श्रीअरविंदांनी का म्हटले आहे? श्रीमाताजी : तुम्ही जर कोणतेही कर्मच केले नाही, तर तुम्हाला कोणताच अनुभव येणार नाही. समग्र जीवन हे अनुभवाचे क्षेत्र आहे. तुम्ही केलेली प्रत्येक हालचाल, तुमच्या मनात उमटलेला प्रत्येक विचारतरंग, तुम्ही केलेले प्रत्येक कर्म हा एक अनुभव असू […]

जीवन जगण्याचे शास्त्र – २२

जीवन जगण्याचे शास्त्र – २२ अविचलता (quietness) म्हणजे तामसिकता नव्हे. वास्तविक अविचल स्थितीमध्येच योग्य गोष्टी केल्या जाऊ शकतात. कोणत्याही गोष्टीमुळे विचलित न होता, प्रत्येक गोष्टीचे अवलोकन करणे आणि कोणत्याही गोष्टीमुळे विचलित न होता, कर्म करणे याला मी ‘अविचलता’ म्हणते. * अविचलतेमध्ये एक स्थिरशांत (calm) आणि एकाग्र एकवटलेली अशी ताकद असते, ती इतकी अविचल असते की, […]