Entries by श्रीअरविंद

महाशक्तीची चार शक्तिरूपे

आपल्या सामर्थ्याला नेहमी दिव्य शक्तीवरील श्रद्धेचा आधार असला पाहिजे. आणि जेव्हा त्या दिव्य शक्तीचा आविष्कार होतो त्यावेळी आपली श्रद्धा सर्वांगीण आणि परिपूर्ण असली पाहिजे किंवा झाली पाहिजे. सनातन काळापासून अखिल-सृष्टी निर्माण करत असलेल्या आणि आत्म्याच्या सर्वशक्तिमानतेने सुसज्ज असणाऱ्या अशा विश्वदेवतेला, जागृत चैतन्यमय विश्वशक्तीला अशक्य असे काहीच नाही. अखिल ज्ञानभांडार, सारी शक्तिसामर्थ्य, सर्व प्रकारचे यश आणि […]

महाशक्तीच्या स्वरूपाचे आकलन

जर तुम्ही मानवी प्रकृतीचे रूपांतरण गतिमान दिव्य प्रकृतीमध्ये करू इच्छित असाल तर, कोणतीही उणीव न ठेवता, किंवा कोणताही प्रतिकार, विरोध न करता, स्वत:ला माताजींच्या व त्यांच्या शक्तींच्या हाती सोपवा आणि त्यांना तुमच्यामध्ये त्यांचे कार्य, कोणत्याही अडथळ्याविना करू द्या. जाणीव, लवचीकता आणि हातचे काहीही राखून न ठेवता केलेले समर्पण ह्या तीन गोष्टी तुमच्याकडे असणेच आवश्यक आहे. […]

परम माता आणि तिची चार व्यक्तिमत्त्वं

ज्यांची आपण श्रीमाताजी म्हणून आराधना करतो, त्या म्हणजे अखिल अस्तित्वावर प्रभुत्व असणारी ईश्वराची चित्शक्ती आहेत. ती चित्शक्ती ‘एक’ असूनही इतकी ‘अनेकअंगी’ आहे की, तिच्या गतिविधींचे अनुसरण करणे हे अत्यंत चपळ मनाला किंवा सर्वस्वी मुक्त आणि अत्यंत विशाल बुद्धिलाही अशक्य असते. श्रीमाताजी ह्या परमेश्वराची चेतना आणि शक्ती असून, त्या त्यांनी निर्माण केलेल्या निर्मितीपासून, सृष्टीपासून खूपच दूर […]

ईश्वरी साहाय्यासाठी धावा

विचलित न होणे, स्थिर आणि सश्रद्ध असणे हा खचितच योग्य दृष्टिकोन आहे. परंतु त्याचबरोबर, श्रीमाताजी आपले जे संगोपन करत असतात त्यापासून कोणत्याही कारणास्तव विन्मुख न राहणे आणि श्रीमाताजींकडून मिळणाऱ्या साहाय्याचा स्वीकार करणे हे देखील तितकेच आवश्यक आहे. व्यक्तीने स्वत:ची अक्षमता, प्रतिसाद देण्याची अक्षमता यांविषयीच्या कल्पनांमध्ये गुंतून राहणे; स्वतःचे दोष, अपयश ह्या गोष्टी अती उगाळत राहणे […]

श्रीमाताजींचे शक्तिकार्य

जर का कशाची आवश्यकता आहे, तर ती आहे प्रयत्न-सातत्याची! प्रकृतीची प्रक्रिया आणि श्रीमाताजींच्या शक्तीचे कार्य संकटकाळामध्ये देखील चालू आहे आणि जे जे आवश्यक आहे ते ते त्या करत राहतील, हे ओळखून नाऊमेद न होता, आपण मार्गक्रमण करत राहणे आवश्यक आहे. आपल्या क्षमताअक्षमतेस येथे महत्त्व नाही. येथे कोणीच मनुष्य असा नाही की, जो प्रकृतिशः सक्षम आहे. […]

श्रीमाताजींंप्रत वळणे

जो कोणी श्रीमाताजींप्रत वळलेला आहे तो माझा योग आचरत आहे. केवळ स्वबळावर, पूर्णयोग करता येईल वा पूर्णयोगाची सर्व अंगे पूर्णत्वाला नेता येतील असे समजणे ही फार मोठी चूक आहे. कोणताही मनुष्य असे करू शकत नाही. मग, व्यक्तीने काय करावयास हवे? तर स्वत:ला श्रीमाताजींच्या हाती सोपवून द्यावयास हवे आणि सेवा, भक्ती, अभीप्सा यांद्वारे त्यांच्याप्रत खुले व्हावयास […]

बाह्य परिस्थिती आणि आंतरिक संकल्पक शक्ती

(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधील हा अंशभाग) तुम्ही बाह्य गोष्टींवर फार अवलंबून असता कामा नये; कारण तुमच्या अशा प्रवृत्तीमुळेच तुम्ही परिस्थितीला एवढे अवास्तव महत्त्व देता. परिस्थिती साहाय्य किंवा अडथळा करू शकत नाही, असे माझे म्हणणे नाही – परंतु परिस्थिती ही केवळ परिस्थिती असते, ती काही आपल्यामध्ये असणारी मूलभूत गोष्ट नाही आणि त्या परिस्थितीचे साहाय्य किंवा […]

साधना – (उत्तरार्ध)

साधनेची दुसरी बाजू ही प्रकृती, मन, प्राण आणि शारीरिक जीवनाशी व त्यांच्या गतिविधींशी संबंधित आहे. येथे तत्त्व हे आहे की, प्रकृती ही आंतरिक साक्षात्काराशी मिळतीजुळती असली पाहिजे म्हणजे, व्यक्तीचे दोन विसंगत भागात विभाजन व्हायला नको. आणि यासाठी, अनेक साधना किंवा प्रक्रिया आहेत. समर्पण साधना : त्यातील एक साधना म्हणजे, स्वतःच्या सर्व गतिविधी ह्या ईश्वरार्पण करायच्या […]

साधना – (पूर्वार्ध)

साधक : मानसिक प्रयत्नांचे, जिवंत अशा आध्यात्मिक अनुभूतीमध्ये परिवर्तन कसे कारावयाचे, त्यासाठी कोणती साधना करावयाची ? श्रीअरविंद : तुमच्या अंतरंगात असणाऱ्या तुमच्या चेतनेवर एकाग्रता करण्याचा सराव करणे, ही पहिली आवश्यक गोष्ट आहे. सामान्य मानवी मनाच्या गतिविधी पृष्ठस्तरीय असल्यामुळे, खरा आत्मा झाकला जातो. परंतु या पृष्ठस्तरीय भागाच्या मागील बाजूस, अंतरंगामध्ये दुसरी एक गुप्त असणारी चेतना असते. […]

चैत्य पुरुषाचे साधनेमधील योगदान

चैत्य पुरुषाचे साधनेमधील योगदान पुढीलप्रमाणे : १) चैत्य पुरुषाचे साधनेमधील योगदान म्हणजे प्रेम आणि भक्ती होय, पण प्राणिक प्रेम नव्हे, अपेक्षा बाळगणारे, अहंकारी प्रेम नव्हे तर, कोणत्याही अटी, दावे नसलेले, स्वयंभू असे प्रेम. २) अंतरंगातील दिव्य मातेशी संपर्क किंवा दिव्य मातेची उपस्थिती. ३) अंतरंगातून मिळणारे अचूक मार्गदर्शन. ४) चैत्य पुरुषाच्या प्रभावाचे व मार्गदर्शनाचे अनुसरण केल्याने […]