Entries by श्रीअरविंद

देव-कार्याचे सामर्थ्य

समर्पण – ५० परिपूर्ण असा आत्म-समर्पणाचा दृष्टिकोन अगदी थोड्या प्रमाणात जरी प्रस्थापित करता आला तरी, योग-क्रियांची सारी आवश्यकता अपरिहार्यपणे संपुष्टात येते. कारण तेव्हा आपल्या अंतर्यामीचा ‘देव’ स्वतःच साधक आणि सिद्ध बनतो आणि त्याची दिव्य शक्ती आपल्यामध्ये कार्य करते,… अगदी सर्वाधिक शक्तिशाली राजयोगांतर्गत संयम, सर्वाधिक विकसित प्राणायाम, अत्यंत कठोर ध्यान, अतीव आनंददायी ‘भक्ती’, आत्म-त्यागाची कृती; या […]

आंतरात्मिक संतुलन

समर्पण – ४६ व्यक्तिगत प्रयत्न हे उत्तरोत्तर ‘दिव्य शक्ती’च्या क्रियेमध्ये रूपांतरित केले पाहिजेत. जर तुम्हाला दिव्य शक्तीची जाणीव होत असेल तर, तुमच्या प्रयत्नांना त्या दिव्य शक्तीने अधिकाधिक संचालित करावे, तिने ते प्रयत्न हाती घ्यावेत आणि (तिने ते प्रयत्न हाती घेतल्यानंतर,) ते प्रयत्न तुमचे न राहता, ते श्रीमाताजींचे व्हावेत यासाठी, त्या दिव्य शक्तीने त्या प्रयत्नांचे रूपांतर […]

समर्पणातील प्राणिक अडथळ्यांचे स्वरूप

समर्पण – ४५ (श्रीअरविंद एका साधकाला लिहिलेल्या पत्रात समर्पणामध्ये येणाऱ्या प्राणिक अडथळ्यांचे स्वरूप स्पष्ट करत आहेत.) तुमच्या प्रतिक्रियेचे जे वर्णन तुम्ही केलेत त्यावर उत्तर देताना, ती ‘प्राणिक मागणी’ (Vital demand) आहे असे मी म्हटले होते. कारण शुद्ध आंतरात्मिक किंवा आध्यात्मिक आत्मदानामध्ये अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नसतात; त्यामध्ये तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे, नैराश्य किंवा आशाभंग नसतो, “मी ईश्वरासाठी […]

प्रामाणिक, खरेखुरे आणि समग्र समर्पण

समर्पण – ४४ साधनेमध्ये तुम्हाला प्रगती करण्याची इच्छा असेल तर तुम्ही ज्या शरणागतीविषयी आणि समर्पणाविषयी बोलत आहात ते समर्पण प्रामाणिक, खरेखुरे आणि समग्र असले पाहिजे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या इच्छांची तुमच्या आध्यात्मिक अभीप्सेमध्ये सरमिसळ करत राहाल तोपर्यंत हे होणे शक्य नाही. जोपर्यंत तुम्ही कुटुंब, मुलंबाळं किंवा कोणत्यातरी वस्तुशी किंवा कोणाही व्यक्तीबाबतची प्राणिक आसक्ती पोसत राहाल तोपर्यंत […]

सत्त्वगुणाचा धोका

समर्पण – ४१ सत्त्वगुणाचा धोका तेव्हा असतो जेव्हा साधक त्याच्या तर्कबुद्धीच्या एकांगी निष्कर्षाला चिकटून राहतो, किंवा साधनेच्या एखाद्या विशिष्ट क्रियेला, योगामधील एखाद्या विशिष्ट सिद्धीच्या आनंदाला चिकटून बसतो; कदाचित शुद्धतेच्या जाणिवेशी किंवा कोणतीतरी एखादी विशिष्ट शक्ती प्राप्त झाल्यामुळे किंवा ईश्वराशी संपर्क झाल्याच्या आनंदाशी किंवा मुक्तीच्या जाणिवेशी, मुमुक्षत्वाच्या जाणिवेशी, कोणत्यातरी एकाच गोष्टीशी बद्ध होतो आणि मग त्याला […]

तमोगुणाचा दुहेरी धोका

समर्पण – ४० तमोगुणाचा धोका दुहेरी असतो, प्रथमतः जेव्हा पुरुष त्याच्यामधील तमसाशी स्वतःला एकात्म समजतो आणि असा विचार करू लागतो की, ”मी दुर्बल आहे, पापी आहे, दुःखीकष्टी आहे, अज्ञानी आहे, मी कोणत्याच गोष्टीसाठी लायक नाही, या अमुक माणसापेक्षा मी गौण आहे, त्या तमुक माणसापेक्षा मी गौण आहे, मी अधम आहे, माझ्याद्वारे तो देव तरी काय […]

आत्म-समर्पणाचे प्रमुख शत्रू

समर्पण – ३९ महान आणि संपूर्ण मुक्तीसाठी तुम्ही निस्पृह, निर्द्वंद्व आणि निरहंकारी असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्याही गोष्टींची अभिलाषा असता कामा नये, तुम्ही त्यांच्या लोभाने ओढले जाता कामा नये; द्वंद्वांचे जे सगळे संस्कार असतात त्यापासून तुम्ही मुक्त असला पाहिजेत, आणि तुम्ही अहंकारापासून मुक्त असला पाहिजेत; कारण ह्या तीन गोष्टी म्हणजे आत्म-समर्पणाचे प्रमुख शत्रू असतात. […]

दिव्यकृपेचा थेट हस्तक्षेप

समर्पण – ३७ दोन शक्यता असतात, पहिली म्हणजे व्यक्तिगत प्रयत्नाच्या आधारे शुद्धिकरण, जिला बराच दीर्घ कालावधी लागतो आणि दुसरी शक्यता म्हणजे दिव्यकृपेचा थेट हस्तक्षेप, साधारणत: हिची क्रिया अधिक जलद असते. ह्या दुसऱ्या शक्यतेसाठी संपूर्ण समर्पणाची आणि आत्मदानाची आवश्यकता असते. आणि त्यासाठीही पुन्हा सर्वसाधारणपणे आवश्यकता असते ती बऱ्यापैकी अचंचल राहू शकेल अशा मनाची. असे मन की […]

स्वतःच्या प्रकृतीमध्येच समर्पणाला विरोध

समर्पण – ३६ उद्भवणाऱ्या साऱ्या अडीअडचणी या खुद्द प्रकृतीमध्येच असतील तर, त्यांनी पृष्ठभागावर यावे आणि स्वतःला आविष्कृत करावे हे अटळ आहे. समर्पण ही काही सोपी गोष्ट नाही, त्याला प्रकृतीच्या एका मोठ्या भागाकडून विरोध केला जातो. जर मनाने समर्पणाची इच्छा धरली तर, हे सारे आंतरिक अडथळे येऊन स्वतःचे अस्तित्व दाखविणार हे उघडच आहे; अशा वेळी साधकाने […]

सातत्यपूर्ण नकार आणि अथक अभीप्सा

समर्पण – ३४ देवावर श्रद्धा, विश्वास, दिव्य शक्तीप्रत आत्मदान आणि समर्पण या आवश्यक आणि अनिवार्य गोष्टी आहेत. पण देवावरील विश्वास हा, कनिष्ठ प्रकृतीच्या आवेगांप्रत शरणागती, दुर्बलता, निरुत्साह यांचा बहाणा बनता कामा नये. दिव्य सत्याच्या मार्गामध्ये जे काही आड येईल त्या सर्वांना सातत्याने नकार दिला पाहिजे; तो नकार आणि अथक अभीप्सा यांच्या सोबत त्या विश्वासाने मार्गक्रमण […]