Entries by श्रीअरविंद

,

प्राणायाम

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १० हठयोग ज्या गतिशील ऊर्जेमुळे हे ब्रह्मांड चालत राहाते त्या प्राणिक शक्तीवर प्रभुत्व म्हणजे ‘प्राणायाम’. प्राणाचे किंवा प्राणिक शक्तीचे, मानवी शरीरातील सर्वाधिक लक्षात येणारे कार्य म्हणजे श्वासोच्छ्वास, जो सामान्य माणसांना जीवनासाठी आणि हालचालींसाठी आवश्यक असतो. हठयोगी त्यावर विजय मिळवितो आणि स्वतःला त्यापासून वेगळे राखतो. परंतु या एवढ्या एकाच प्राणिक क्रियेवर त्याचे […]

,

चार शारीरिक सिद्धी

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०९ हठयोग लघिमा, अणिमा, गरिमा आणि महिमा या चार शारीरिक सिद्धींचा विकास करून, त्यायोगे शारीरिक प्रकृतीवर विजय प्राप्त करून घेणे, हे हठयोगाचे दुसरे उद्दिष्ट असते. ‘लघिमे’च्या योगे मनुष्य, त्याचे प्राकृतिक तत्त्व असल्याप्रमाणे वाऱ्यावर स्वार होऊन, हवेमध्ये विहार करू शकतो. परिपूर्ण ‘अणिमे’च्या योगे, व्यक्ती सूक्ष्म देहाची प्रकृती ही स्थूल देहामध्ये उतरवू शकते. […]

,

हठयोग

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०८ हठयोगाचे उद्दिष्ट शुद्ध हठयोग हा शरीराच्या माध्यमातून परिपूर्णत्व गाठण्याचे साधन आहे. त्याच्या प्रक्रिया ह्या शारीरिक, तणावयुक्त, अवाढव्य, जटिल आणि अवघड असतात. आसन, प्राणायाम आणि शरीराची शुद्धी या गोष्टी त्याच्या केंद्रस्थानी असतात. आधुनिक किंवा मिश्रित हठयोगामध्ये आसनांची संख्या मर्यादित झाली आहे; पण तरीसुद्धा ती आसने पुष्कळ आणि वेदनादायी आहेत. प्राचीन किंवा […]

अज्ञानावर मात

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०७ विश्व हा भ्रम आहे, विश्व मिथ्या आहे या मताशी मी सहमत नाही. ब्रह्म हे जसे विश्वातीत केवलतत्त्वामध्ये आहे तसेच ते येथेही आहे. जे अज्ञान आपल्याला अंध बनविते आणि आपल्या अस्तित्वाचे सत्य स्वरूप ओळखण्यास तसेच, या विश्वामध्ये असणाऱ्या व विश्वाच्या अतीतही असणाऱ्या ब्रह्माचा साक्षात्कार करून घेण्यास प्रतिरोध करते अशा अज्ञानावर मात […]

परम प्रयोजन

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०६ कोणतीही आंतरात्मिक साधना जी आपल्याला अंशतः किंवा पूर्णतः चेतनेच्या आध्यात्मिक अवस्थेमध्ये घेऊन जाते; आंतरात्मिक सत्याविषयी किंवा परमोच्च सत्याविषयी कोणताही सहजस्फूर्त असा किंवा पद्धतशीर असा दृष्टिकोन ; ईश्वराशी ऐक्याची किंवा सायुज्याची कोणतीही अवस्था; मानवजातीमध्ये सार्वत्रिक असणाऱ्या स्वाभाविक जाणिवेपेक्षा अधिक व्यापक, अधिक सखोल किंवा अधिक उच्चतर अशा जाणिवेमध्ये प्रवेश या साऱ्या गोष्टी […]

पूर्ण योग

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०५   योग म्हणजे ऐक्य. मानवी आत्म्याचे सर्वोच्च आत्म्याशी ऐक्य आणि मानवजातीच्या सद्यस्थितीतील प्रकृतीचे शाश्वत, परम किंवा ईश्वरी प्रकृतीशी ऐक्य, हे योगाचे समग्र उद्दिष्ट आहे. जेवढे हे ऐक्य महान, तेवढा तो योग महान आणि जेवढे हे ऐक्य परिपूर्ण, तेवढा तो योग परिपूर्ण. ….जो योग जगतातील ईश्वराचा स्वीकार करतो, जो योग सर्व […]

योगाचा खरा अर्थ

  पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०४ योग हे असे एक साधन आहे की, ज्याद्वारे आंतरिक साधनेच्या माध्यमातून व्यक्ती वस्तुमात्रांमागील सत्याशी एकत्व पावण्याप्रत येऊन पोहोचते; त्याद्वारे आपल्याला, बहिर्वर्ती आणि व्यक्त जाणिवेकडून आंतरिक आणि सत्य जाणिवेप्रत घेऊन जाण्यात येते. योग-चेतना (Yoga Consciousness) ही बाह्य, व्यक्त विश्वाचे ज्ञान वगळत नाही तर उलट, ती विश्वाकडे अंतर्दृष्टीने पाहते, ती त्याकडे […]

आत्मपरिपूर्णत्व हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०३   आत्मविलोपन (self-annulment) नव्हे, तर आत्मपरिपूर्णत्व (self-perfection) हेच आपल्या योगाचे उद्दिष्ट आहे. योग्याला वाटचाल करण्यासाठी दोन मार्ग योजलेले आहेत. एक मार्ग म्हणजे या विश्वापासून सुटका करून घेणे आणि दुसरा मार्ग म्हणजे या विश्वामध्येच परिपूर्णत्व प्राप्त करून घेणे. पहिला मार्ग हा वैराग्याद्वारे येतो आणि दुसरा मार्ग हा तपस्येद्वारे सिद्ध होतो. जेव्हा […]

अंतिम ज्ञान

  पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०२ जो बंधनांपासून मोकळा असतो, तो बंधमुक्त असतो, तो मुक्त असतो. परंतु मुक्तीची आस हेच एक स्वयमेव असे अखेरचे बंधन आहे; जीव परिपूर्णतया मुक्त होण्यापूर्वी त्याने ह्या बंधनाचा देखील त्याग केला पाहिजे. कोणीच बद्ध नसतो, कोणीच मुक्तीचा इच्छुक नसतो, तर आत्मा हा कायमच आणि परिपूर्णपणे मुक्तच असतो, बंधन हा भ्रम […]

पृथ्वीवरील अंतिम उत्क्रांती

मी आंतरिक सत्य, प्रकाश, सुमेळ आणि शांती यांचे काहीएक तत्त्व, पृथ्वीचेतनेमध्ये आणू पाहत आहे. उर्ध्वस्थित असलेले ते मला दिसत आहे आणि ते काय आहे हे मला माहीत आहे. जाणिवेमध्ये उतरू पाहणारी त्याची तेज:प्रभा मी सातत्याने अनुभवत आहे. आज मानवाची प्रकृती अर्धप्रकाश, अर्धअंधकार अशा दशेत आहे; त्याने त्याच दशेमध्ये राहण्यापेक्षा, मानवाने समग्र अस्तित्वच, त्या सत्य-तत्त्वाने स्वत:च्या […]