Entries by श्रीअरविंद

अभीप्सा, नकार आणि समर्पण

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २९ (अभीप्सा, नकार आणि समर्पण या त्रयीला पूर्णयोगामध्ये योगसूत्राचे स्थान आहे.) विश्वामध्ये जे जे काही केले जाते, त्या सर्व कृतींमागे ईश्वरच त्याच्या शक्तिद्वारा विद्यमान असतो पण तो त्याच्या योगमायेने झाकला गेलेला असतो आणि कनिष्ठ प्रकृतीमध्ये तो जे कार्य करतो ते ‘जिवा’च्या अहंकाराद्वारा करत असतो. योगामध्येदेखील ईश्वर हाच ‘साधक’ आणि ‘साधना’ही असतो; त्याचीच […]

पूर्णयोग आणि अन्य योग

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २७ सर्वसाधारणपणे आजवरचा योग हा आध्यात्मिक मनाच्या पलीकडे जात नाही – अनेकांना मस्तकाच्या शिखरावर ब्रह्माशी ऐक्य जाणवते, पण त्यांना मस्तकाच्याही वर असलेल्या चेतनेची जाणीव नसते. त्याच प्रमाणे सामान्य योगामध्ये व्यक्तीला ब्रह्मरंध्राप्रत होणार्याह जागृत आंतरिक चेतनेच्या (कुंडलिनी) आरोहणाची संवेदना असते; (या ब्रह्मरंधामध्ये प्रकृती ब्रह्म- चेतनेशी युक्त होते.) मात्र त्यांना ‘अवतरणा’चा (descent) अनुभव येत […]

,

रूपांतरणाचा योग

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २३ आमचा योग हा रूपांतरणाचा योग आहे; हे रूपांतरण म्हणजे संपूर्ण चेतनेचे रूपांतर आहे; तसेच ते संपूर्ण प्रकृतीचे, तिच्या मस्तकापासून ते पायापर्यंत, तिच्या अगदी गुप्त आंतरिक घटकांपासून, ते तिच्या अगदी दृश्य बहिर्वर्ती हालचालींपर्यंतच्या प्रत्येक भागाचे रूपांतर आहे. हा बदल काही केवळ नैतिक नाही किंवा ते धार्मिक परिवर्तन नव्हे, किंवा संतत्व वा संन्यासमार्गी […]

पूर्णयोगाचे ध्येय

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २२ केवळ अतिमानव बनण्याच्या कल्पनेने या योगाकडे वळणे ही प्राणिक अहंकाराची कृती ठरेल आणि त्यामुळे या योगाचे मूळ उद्दिष्टच निष्फळ ठरेल. जी माणसे त्यांच्या सर्व क्रियाकलापांसमोर हे उद्दिष्ट ठेवतात त्यांना अपरिहार्यपणे आध्यात्मिक आणि अन्य दु:खं सहन करावी लागतात. विभक्तकारी अहंकाराचे दिव्य चेतनेमध्ये विलयन करून, त्या द्वारे दिव्य चेतनेमध्ये प्रथम प्रवेश करणे (त्या […]

आंतरात्मिक हाक

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २१ योगाच्या ध्येयाप्रत पोहोचणे नेहमीच कठीण असते, पण या योगात ते इतर कोणत्याही योगापेक्षा अधिक कठीण आहे आणि ज्यांना या योगाची हाक आलेली आहे, ज्यांची कोणत्याही गोष्टीला तोंड देण्याची आणि कोणताही धोका पत्करण्याची, अगदी अपयशाचा धोका पत्करण्याचीही तयारी आणि क्षमता आहे, तसेच संपूर्ण नि:स्वार्थीपणा, वासनाशून्यता आणि समर्पण यांच्या दिशेने प्रगती करण्याचा ज्यांचा […]

पूर्णयोगाची नवीनता

माझा ‘योग’ हा त्याच्या सर्व सिद्धान्तांसहित अगदी पूर्णतः नवीन आहे, असे मी कधीही म्हटलेले नाही. मी याला ‘पूर्णयोग’ असे नाव दिले आहे. आणि या शब्दांचा अर्थ असा की, यामध्ये अनेक योगांची तत्त्व व प्रक्रिया समाविष्ट केल्या आहेत. त्याचे नावीन्य त्याच्या ध्येयात, उद्दिष्टात आणि पद्धतीतील समग्रतेत आहे. I have never said that my Yoga was something […]

पूर्णयोगातील आवश्यक पायऱ्या

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १९ आत्म्याचा साक्षात्कार आणि विश्वपुरुषाचा साक्षात्कार या आपल्या योगातील आवश्यक पायऱ्या आहेत; (विश्वपुरुषाच्या साक्षात्काराविना आत्म्याचा साक्षात्कार अपूर्ण असतो.) इतर योगांची तेथे परिसमाप्ती होते, परंतु हीच जणू आपल्या योगाची सुरुवात असते; म्हणजे हाच तो टप्पा असतो जेथे (पूर्ण)योगाच्या वैशिष्ट्यपूर्ण साक्षात्काराचा आरंभ होऊ शकतो. – श्रीअरविंद (CWSA 32 : 334)

,

अस्तित्वाची परिपूर्ण परिपूर्ती

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १६ आपल्या समग्र अस्तित्वाने त्याच्या सर्व घटकांसहित आणि आपल्या अस्तित्वाने सर्वथा, ‘दिव्य सद्वस्तु’च्या समग्र चेतनेमध्ये प्रविष्ट होणे आणि आपल्या जीवात्म्याने व तत्त्वाने आपण वास्तविक जे आहोत, त्या ‘दिव्य सद्वस्तु’चे साधन आणि आविष्करण बनावे म्हणून, आपल्या वर्तमान अज्ञानी आणि मर्यादित प्रकृतीचे दिव्य प्रकृतीमध्ये परिवर्तन घडविणे, हीच आपल्या अस्तित्वाची परिपूर्ण परिपूर्ती आहे आणि हाच […]

,

ध्यान, कर्म, भक्ती आणि पूर्णयोग

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १५ ईश्वराप्रत जाण्याचा ध्यान हा एक मार्ग आहे, तो महान मार्ग आहे; पण तो जवळचा मार्ग आहे, असे म्हणता येणार नाही. कारण तो खूप उच्च स्तरावर घेऊन जाणारा असला, तरीही तो बहुतेकांसाठी खूप लांबचा आणि अवघड मार्ग असतो. जर त्यामुळे (ईश्वराचे)अवतरण घडून आले नाही तर, तो जवळचा मार्ग आहे असे कदापिही म्हणता […]

,

आध्यात्मिक क्रांती

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १३ मानवाने आध्यात्मिकीकरणासाठी एकदा जरी संमती दिली तरी हे अवघे विश्व बदलून जाईल परंतु मानवाची शारीरिक, प्राणिक आणि मानसिक प्रकृती ही या उच्चतर कायद्याबाबत बंडखोर असते. मानवाला स्वत:च्या अपूर्णतेविषयीच प्रेम असते. आत्मा हे आपल्या अस्तित्वाचे सत्य आहे; अपूर्ण दशेमध्ये असताना मन, प्राण आणि शरीर हे त्याचे केवळ मुखवटे असतात, पण तेच त्यांच्या […]