Entries by श्रीअरविंद

योग आणि मानवी नातेसंबंध – ३४

आंतरिक एकाकीपण हे केवळ ईश्वराशी एकरूप होण्याच्या आंतरिक अनुभूतीतूनच दूर होऊ शकते. कोणतेही मानवी संबंध ती पोकळी भरून काढू शकत नाहीत. त्याच प्रकारे, आध्यात्मिक जीवनासाठी, इतरांशी असलेला सुसंवाद हा मानसिक आणि प्राणिक संबंधांवर आधारित असता कामा नये तर, दिव्य चेतना आणि ईश्वराशी ऐक्य यांच्यावर आधारित असला पाहिजे. जेव्हा व्यक्तीला ईश्वर गवसतो आणि व्यक्ती ईश्वरामध्ये इतरांना […]

योग आणि मानवी नातेसंबंध – ३३

साधक एकमेकांपासून पूर्णतः अलिप्त असले पाहिजेत आणि त्यांच्यात विळ्याभोपळ्याचे नाते असले पाहिजे, ही जी पूर्वापार चालत आलेली कल्पना आहे, तिचा त्याग केलाच पाहिजे. ‘निर्वाण’ हे ध्येय मानणाऱ्या परंपरागत समजुतीमधून ही कल्पना उदयाला आली असावी; परंतु ‘निर्वाण’ हे येथील उद्दिष्ट नाही. संघर्ष नव्हे, तर सुसंवाद हा योगमय जीवनाचा धर्म असतो. जीवनामध्ये ‘ईश्वरा’ची परिपूर्ती हे येथील ध्येय […]

योग आणि मानवी नातेसंबंध – ३२

(आश्रमात वास्तव्यास येऊ पाहणाऱ्या एका साधकास उद्देशून श्रीअरविंदांनी लिहिलेले पत्र…) तुम्हाला या योगाचे (पूर्णयोगाचे) तत्त्व समजलेले दिसत नाही. पूर्वीचा योग सर्वस्व त्यागाची अपेक्षा करत असे; त्यामध्ये या भौतिक जीवनाच्या त्यागाचादेखील समावेश असे. हा योग (पूर्णयोग) मात्र त्या ऐवजी एका नवीन आणि रूपांतरित जीवनाला आपले लक्ष्य मानतो. हा योग मन, प्राण आणि शरीर यांमधील इच्छा आणि […]

योग आणि मानवी नातेसंबंध – ३१

लोकांमध्ये मिसळणे, हास्यविनोद करणे, चेष्टामस्करी करणे हा एक प्रकारचा प्राणिक विस्तार असतो, ते प्राणिक सामर्थ्य नव्हे – हा विस्तार खर्चिकसुद्धा असतो. कारण जेव्हा अशा प्रकारचे एकमेकांमध्ये मिसळणे घडून येते तेव्हा, प्राणिकदृष्ट्या जे सुदृढ असतात त्यांना त्यापासून बळ मिळते; परंतु प्राणिकदृष्ट्या जे दुर्बल असतात ते त्यांच्यामध्ये असलेले सामर्थ्य खर्च करतात आणि अधिकच दुर्बल बनतात. – श्रीअरविंद […]

योग आणि मानवी नातेसंबंध – ३०

इतरांविषयीची विषमतेची भावना, पसंती-नापसंती या गोष्टी मानवाच्या प्राणिक प्रकृतीमध्ये जणू भिनल्यासारख्या आहेत. याचे कारण काहीजण आपल्या स्वतःच्या प्राणिक स्वभावाशी (vital temperament) सुसंवाद राखतात आणि इतरजण मात्र तसे करत नाहीत; तसेच जेव्हा एखाद्याचा प्राणिक अहंकार (vital ego) दुखावला जातो किंवा माणसांनी कसे वागले पाहिजे याबाबतीत त्याच्या असलेल्या कल्पनांनुसार जेव्हा माणसं वागत नाहीत किंवा गोष्टी त्याच्या पसंतीनुसार […]

योग आणि मानवी नातेसंबंध – २६

मी याआधीही सांगितले आहे की, भांडणतंटे, एखाद्याशी संबंध तोडून टाकणे हा साधनेचा भाग असू शकत नाही; ज्या संघर्षाविषयी आणि मतभेदांविषयी तुम्ही बोलत आहात ते म्हणजे बाह्य जगामध्ये, प्राणिक अहंकार (vital ego) जसे परस्परांना भिडतात, तसलाच प्रकार आहे. …एका साधकाचे दुसऱ्या साधकाशी जे संबंध असतात त्या नात्यामध्ये सुसंवाद, सदिच्छा, सहिष्णुता, समता या आवश्यक अशा आदर्श गोष्टी […]

योग आणि मानवी नातेसंबंध – २५

भांडणतंटे आणि संघर्ष हे योगाची बैठक नसल्याचे लक्षण आहे आणि ज्यांना खरोखरच योगसाधना करण्याची प्रामाणिक इच्छा आहे त्यांनी या गोष्टींच्या वर उठायला शिकले पाहिजे. कलह, वादंग वा भांडणाचे कोणतेही कारण नसताना संघर्ष न करणे हे अगदीच सोपे आहे; पण जेव्हा असे कोणतेतरी कारण असते आणि दुसरी बाजू अगदी असह्य असते किंवा अविवेकी असते तेव्हा व्यक्तीला […]

योग आणि मानवी नातेसंबंध – २४

मला भांडणे मंजूर नाहीत, हे तुम्ही कधीही विसरता कामा नये आणि दोन्ही बाजू या सारख्याच चुकीच्या असतात, हे तुम्ही कायम लक्षात घेतले पाहिजे. आपल्या भावना, अग्रक्रम, पसंती-नापसंती, आपले आवेग यांवर काबू राखणे ही येथील (आश्रमातील) अनिवार्य अशी शिस्त आहे. * व्यक्तीने भांडणाला स्वतःहून सुरुवात केली नसली तरी भांडण करणे हे नेहमीच चुकीचे असते. * जेव्हा […]

योग आणि मानवी नातेसंबंध – २३

सहानुभूतीपूर्वक आणि निःपक्षपातीपणे इतरांच्या वर्तनाचे निरीक्षण करणे, ते न्याहाळणे यामध्ये काही अपाय नसतो – मात्र उगाचच टिका करत राहणे, दोष शोधणे आणि इतरांची निंदानालस्ती करणे (बहुतांशी वेळा चुकीच्या पद्धतीने) यामुळे त्या व्यक्तीसाठी आणि इतरांसाठी देखील वाईट वातावरण तयार होते. आणि हा कठोरपणा आणि एवढी ठाशीव निंदानालस्ती कशासाठी? प्रत्येक व्यक्तीमध्ये तिचे स्वतःचे दोष नसतात का? मग […]

योग आणि मानवी नातेसंबंध – २१

एक प्रकारच्या आत्मीयतेच्या, सहमतीच्या भावनेने एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबरोबर जोडली जाते किंवा त्यामुळे माणसं एकमेकांकडे आकर्षित होतात किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या प्रकृतीमधील एखाद्या घटकाचे व दुसऱ्या व्यक्तीच्या एखाद्या घटकाचे परस्परांमध्ये आकर्षण असते आणि त्यामुळे दोन व्यक्ती परस्परांशी जोडल्या जातात. सुरुवातीला व्यक्तीला हे फक्त जाणवते; दुसऱ्या व्यक्तीच्या प्रकृतीमधील जे काही सुखद आहे किंवा चांगले आहे ते […]