Entries by श्रीअरविंद

पूर्णयोगाची नवीनता

माझा ‘योग’ हा त्याच्या सर्व सिद्धान्तांसहित अगदी पूर्णतः नवीन आहे, असे मी कधीही म्हटलेले नाही. मी याला ‘पूर्णयोग’ असे नाव दिले आहे. आणि या शब्दांचा अर्थ असा की, यामध्ये अनेक योगांची तत्त्व व प्रक्रिया समाविष्ट केल्या आहेत. त्याचे नावीन्य त्याच्या ध्येयात, उद्दिष्टात आणि पद्धतीतील समग्रतेत आहे. I have never said that my Yoga was something […]

पूर्णयोगातील आवश्यक पायऱ्या

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १९ आत्म्याचा साक्षात्कार आणि विश्वपुरुषाचा साक्षात्कार या आपल्या योगातील आवश्यक पायऱ्या आहेत; (विश्वपुरुषाच्या साक्षात्काराविना आत्म्याचा साक्षात्कार अपूर्ण असतो.) इतर योगांची तेथे परिसमाप्ती होते, परंतु हीच जणू आपल्या योगाची सुरुवात असते; म्हणजे हाच तो टप्पा असतो जेथे (पूर्ण)योगाच्या वैशिष्ट्यपूर्ण साक्षात्काराचा आरंभ होऊ शकतो. – श्रीअरविंद (CWSA 32 : 334)

,

अस्तित्वाची परिपूर्ण परिपूर्ती

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १६ आपल्या समग्र अस्तित्वाने त्याच्या सर्व घटकांसहित आणि आपल्या अस्तित्वाने सर्वथा, ‘दिव्य सद्वस्तु’च्या समग्र चेतनेमध्ये प्रविष्ट होणे आणि आपल्या जीवात्म्याने व तत्त्वाने आपण वास्तविक जे आहोत, त्या ‘दिव्य सद्वस्तु’चे साधन आणि आविष्करण बनावे म्हणून, आपल्या वर्तमान अज्ञानी आणि मर्यादित प्रकृतीचे दिव्य प्रकृतीमध्ये परिवर्तन घडविणे, हीच आपल्या अस्तित्वाची परिपूर्ण परिपूर्ती आहे आणि हाच […]

,

ध्यान, कर्म, भक्ती आणि पूर्णयोग

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १५ ईश्वराप्रत जाण्याचा ध्यान हा एक मार्ग आहे, तो महान मार्ग आहे; पण तो जवळचा मार्ग आहे, असे म्हणता येणार नाही. कारण तो खूप उच्च स्तरावर घेऊन जाणारा असला, तरीही तो बहुतेकांसाठी खूप लांबचा आणि अवघड मार्ग असतो. जर त्यामुळे (ईश्वराचे)अवतरण घडून आले नाही तर, तो जवळचा मार्ग आहे असे कदापिही म्हणता […]

,

आध्यात्मिक क्रांती

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १३ मानवाने आध्यात्मिकीकरणासाठी एकदा जरी संमती दिली तरी हे अवघे विश्व बदलून जाईल परंतु मानवाची शारीरिक, प्राणिक आणि मानसिक प्रकृती ही या उच्चतर कायद्याबाबत बंडखोर असते. मानवाला स्वत:च्या अपूर्णतेविषयीच प्रेम असते. आत्मा हे आपल्या अस्तित्वाचे सत्य आहे; अपूर्ण दशेमध्ये असताना मन, प्राण आणि शरीर हे त्याचे केवळ मुखवटे असतात, पण तेच त्यांच्या […]

,

दिव्य जीवनासाठी योग

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १० तुम्हाला योगाची प्रत्यक्ष हाक आलेली असू शकते आणि तुम्ही योगासाठी पात्रदेखील असू शकता, परंतु योगाचे विविध मार्ग आहेत आणि प्रत्येकाचे ध्येय व उद्दिष्ट भिन्न भिन्न असते. इच्छा-वासनांवरील जय तसेच जीवनातील सामान्य नातेसंबंध बाजूला ठेवणे आणि अनिश्चिततेकडून चिरस्थायी निश्चिततेप्रत वाटचाल करण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी सर्व योगांमध्ये समानच असतात. व्यक्ती स्वप्न आणि […]

,

पूर्णयोगाची पद्धत

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०७ व्यक्ती त्या ईश्वरी प्रभावाप्रत स्वतःला खुली करू शकते किंवा नाही यावरच पूर्णयोगामध्ये सारे काही अवलंबून असते. अभीप्सेमध्ये जर प्रामाणिकता असेल, आणि कितीही अडथळे आले तरी, उच्चतर चेतनेप्रत पोहोचण्याची धीरयुक्त इच्छा असेल तर, कोणत्या ना कोणत्या प्रकारे खुलेपण निश्चित येते. यासाठी जास्त वेळ लागेल की कमी ते मन, हृदय आणि शरीराची तयारी […]

,

पूर्णयोगाचे तत्त्व

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०६ ईश्वरी प्रभावाप्रत स्वत:ला खुले करणे हे या (पूर्ण)योगाचे संपूर्ण तत्त्व आहे. हा प्रभाव तुमच्या मस्तकाच्या वरती असतो आणि एकदा का तुम्हाला त्याची जाणीव झाली की, त्याने तुमच्यामध्ये प्रवेश करावा म्हणून तुम्ही केवळ त्यास आवाहन करायचे असते. ते ईश्वरीतत्त्व तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये शांतीच्या, प्रकाशाच्या, कार्यकारी शक्तीच्या रूपाने अवतरते; आनंदरूपाने अवतरते; साकार किंवा […]

,

पूर्णयोगाचे त्रिविध ध्येय

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०५ चेतना (consciousness) ईश्वराप्रत खुली करणे, अधिकाधिक आंतरिक चेतनेमध्ये निवास करत, तेथून बाह्य जीवनावर कार्य करणे, आंतरतम असणाऱ्या चैत्य पुरुषाला (psychic) पुढे आणणे आणि त्याच्या शक्तीने अस्तित्वाचे शुद्धीकरण आणि परिवर्तन घडविणे; ज्यामुळे ते अस्तित्व रूपांतरासाठी सज्ज होऊ शकेल आणि दिव्य ज्ञान, दिव्य संकल्प आणि दिव्य प्रेम यांच्याशी एकत्व पावू शकेल, हे या […]

,

पूर्णयोग आणि आत्मउन्मीलन

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०४ येथे योगाचा जो मार्ग आचरला जातो त्या मार्गाचे (पूर्णयोगाचे) इतर योगांपेक्षा काहीएक भिन्न प्रयोजन आहे. कारण सर्वसामान्य अज्ञानी विश्व-चेतनेमधून बाहेर पडून, दिव्य चेतनेमध्ये उन्नत होणे हे केवळ या योगाचे ध्येय नाही, तर मन, प्राण आणि शरीर यांच्या अज्ञानामध्ये दिव्य चेतनेची अतिमानसिक शक्ती उतरविणे; मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण करणे, इहलोकामध्ये […]