प्रतिकूल परिस्थिती आणि समत्व
(ओढवलेल्या परिस्थितीमध्ये जे काही घडत आहे, त्याने नाउमेद न होता, उलट त्या परिस्थितीचा साधनेसाठी कसा लाभ करून घेता येईल, ह्याचा विचार करण्यास येथे श्रीअरविंद सांगत आहेत.) …असे म्हणता येईल की, वैश्विक शक्तींचा खेळ, विश्वामधील संकल्प हा नेहमीच, कार्याच्या व साधनेच्या थेट दिशेशी सुसंवादी आणि कार्य व साधना सुरळीत घडण्यासाठी अनुकूल कार्य करत असल्याचे दृश्य स्वरूपात […]







