Entries by श्रीअरविंद

अमर्त्यत्वाचा शोध ३८

अतिमानस आणि अमर्त्यत्व अतिमानसिकीकरणाचे (supramentalisation) जे सर्व संभाव्य परिणाम आहेत त्यांपैकी एक परिणाम म्हणजे अमर्त्यत्व, परंतु हा काही अनिवार्य असा परिणाम नाही आणि जीवन आत्ता जसे आहे तसेच ते अगणित काळ चालू राहील किंवा ते शाश्वत टिकून राहील, असा याचा अर्थ नाही. अनेक जण असा विचार करतात की, ते त्यांच्या साऱ्या मानवी इच्छावासनांसहित आत्ता ते […]

अमर्त्यत्वाचा शोध ३५

आसक्ती आणि अमर्त्यत्व देहाविषयी आसक्ती असेल तर, अमर्त्यत्व येऊ शकणार नाही, म्हणून आपल्या अस्तित्वातील जो भाग देहाबरोबर तादात्म्य पावलेला नाही केवळ अशा अमर्त्य भागामध्ये जीवन जगण्यामुळेच आणि पेशींमध्ये त्याची चेतना आणि शक्ती उतरविल्यामुळेच हे अमर्त्यत्व प्राप्त होऊ शकेल. अर्थातच मी योगिक साधनांविषयी बोलतो आहे. आता शास्त्रज्ञ असे मानतात की, (किमान सैद्धांतिकरित्या तरी) मृत्युवर मात करता […]

अमर्त्यत्वाचा शोध ३४

शारीरिक अमर्त्यत्वाचे सार चेतनेमधील परिवर्तन ही आवश्यक गोष्ट आहे आणि त्याशिवाय कोणतीही शारीरिक सिद्धी मिळणे शक्य नाही. शरीर जर आहे तसेच राहिले, ते जर मृत्युचे, रोगाचे, क्षय, वेदना, अचेतनता आणि अज्ञानाच्या साऱ्या परिणामांचे गुलाम बनून राहिले, तर अतिमानसिक परिवर्तनाचे पूर्णत्व शक्य नाही. ह्या गोष्टी जर राहणारच असतील तर अतिमानसाच्या अवतरणाची (Descent of the Supramental) काहीच […]

अमर्त्यत्वाचा शोध २९

अमर्त्यत्वासंबंधी गीतेची शिकवण मृत्यु अशी कोणती गोष्टच अस्तित्वात नाही, कारण, शरीर नष्ट होते पण शरीर म्हणजे काही मनुष्य नव्हे. जे अस्तित्वविहीन (nonexistent) आहे ते कधीही अस्तित्वात येऊ शकत नाही, तद्वतच जे वस्तुतः अस्तित्वात आहे, त्याचे अस्तित्व कधीही लोप पावू शकत नाही; ते ज्या माध्यमांतून प्रकट होते त्या माध्यमांची रूपे बदलू शकतात परंतु त्याचे अस्तित्व मात्र […]

अमर्त्यत्वाचा शोध २८

अमर्त्यत्वासंबंधी गीतेची शिकवण आपण सारे एकच आत्मा आहोत, आपण तो ईश्वर आहोत, आपल्या आकलनापलीकडे असणारे अद्भुत असे म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो, त्याच्याविषयी बोलतो, त्याच्याविषयी ऐकतो. आपण कितीही धडपड केली, शोध घेतला, ज्ञानी माणसांकडून ज्ञान ग्रहण केले आणि ज्ञान प्राप्त झाले असे घोषित केले तरीही कोणत्याच मानवी मनाला त्या परमतत्त्वाचे (Absolute) कधीच आकलन झालेले नाही. शरीराचा […]

अमर्त्यत्वाचा शोध २७

अमर्त्यत्वासंबंधी वैदिक शिकवण मनुष्य भौतिक विश्वात राहतो, तो मरणाधीन असतो आणि मर्त्य अस्तित्वाच्या ‘पुष्कळशा असत्या’च्या तो अधीन असतो. या मरणाच्या अतीत होण्यासाठी, अमर्त्यांपैकी एक होण्यासाठी, त्याने असत्याकडून सत्याकडे वळले पाहिजे; त्याने प्रकाशाकडे वळले पाहिजे आणि अंधकाराच्या शक्तींशी लढून त्यावर विजय मिळविला पाहिजे. ईश्वरी शक्तींच्या सख्यत्वाने आणि त्यांचे साहाय्य घेऊन मनुष्य या गोष्टी करतो; ईश्वरी शक्तींच्या […]

अमर्त्यत्वाचा शोध १३

मृत्युला त्याचे स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्व नाही, तर मृत्यू म्हणजे शरीरामध्ये असणाऱ्या ऱ्हासकारक तत्त्वाचा केवळ परिणाम आहे. आणि ते तत्त्व आधीपासूनच तेथे अस्तित्वात असते – ते जडभौतिक प्रकृतीचाच एक भाग आहे. परंतु त्याच बरोबर, मृत्यू अटळ आहे, असेही नाही. एखाद्याकडे जर आवश्यक ती चेतना आणि ती शक्ती असेल तर, शरीराचा -हास आणि मृत्यू अटळ नाहीत. […]

अमर्त्यत्वाचा शोध १२

देहधारी जीव, आज आहे त्याच शरीरामध्ये कोणत्याही बदलाच्या आवश्यकतेशिवाय प्रगती करू शकेल, इतपत आजवर विकसित झालेला नाहीये; आणि त्यामुळेच मृत्यूचे अस्तित्व आहे. तसेच खुद्द हे शरीरदेखील अजून पुरेसे जागृत झालेले नाही. मन आणि प्राण आणि शरीर जर स्वतःच अधिक सचेत व अधिक लवचीक असते तर मृत्युची आवश्यकताच नव्हती. – श्रीअरविंद (CWSA 28 : 313-314)

अमर्त्यत्वाचा शोध ०८

जडभौतिक शरीरामध्ये मनुष्यप्राणी स्वगृही व सुरक्षित असतो; देह हा त्याचे सुरक्षाकवच असते. काही लोक असे असतात ज्यांच्यामध्ये स्वतःच्या शरीराविषयी तिरस्कार भरलेला असतो व ते असा विचार करतात की, त्यांच्या मृत्युनंतर गोष्टी अधिक चांगल्या व अधिक सोप्या होतील. परंतु वास्तविकता अशी आहे की, शरीर हे तुमचे आश्रयस्थान असते, गडकोट असतो. तुम्ही जेव्हा शरीरात निवास करीत असता […]

अमर्त्यत्वाचा शोध ०७

मृत्युनंतर काही कालावधी असा असतो की जेव्हा जीवात्मा प्राणिक जगतामधून (vital world) जातो आणि तेथे काही काळ राहतो. या संक्रमणाचा केवळ पहिला भागच काहीसा भयंकर वा वेदनादायी, यातनामय असू शकतो. देहामध्ये असताना त्याच्या ज्या प्राणिक वासना आणि सहजप्रवृत्ती होत्या, त्यातील शिल्लक राहिलेल्या गोष्टींवर, विशिष्ट अशा परिस्थितीत, उरलेल्या काळात तो काम करतो. ज्या क्षणी तो या […]