सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – १९
मन स्थिर करण्यासाठी व आध्यात्मिक अनुभूती मिळविण्यासाठी, प्रकृतीचे शुद्धिकरण होणे आणि तिची तयारी होणे आवश्यक असते. यासाठी कधीकधी अनेक वर्षेसुद्धा लागतात. योग्य वृत्तीने केलेले कर्म हा त्यासाठीचा सर्वांत सोपा मार्ग आहे. (योग्य वृत्तीने केलेले कर्म म्हणजे कोणते कर्म?) – असे कर्म की जे इच्छाविरहित किंवा अहंकारविरहित असते – इच्छा, मागणी किंवा अहंकाराची कोणतीही स्पंदने निर्माण […]






