Entries by श्रीअरविंद

दिव्य जीवन

दिव्य पूर्णता ही आपल्या नेहमीच ऊर्ध्वस्थित असते. परंतु, मनुष्याची चेतना व त्याच्या कृती दिव्य बनणे आणि अंतरंगातून व बाह्यतः देखील त्याने दिव्य जीवन जगणे हाच ‘आध्यात्मिकते’चा अर्थ आहे. ‘आध्यात्मिकता’ या शब्दाला देण्यात आलेले इतर सर्व दुय्यम अर्थ म्हणजे अर्धवट चाचपडणे आहे किंवा विडंबन आहे. – श्रीअरविंद [CWSA 25 : 262-263]

जीवनाचा स्वीकार

मनुष्याच्या खऱ्या, अगदी आंतरतम, उच्चतम आणि विशालतम अशा ‘स्व’च्या आणि ‘आत्म्या’च्या चेतनेवर आधारलेले, एक नूतन आणि महत्तर आंतरिक जीवन हा ‘आध्यात्मिकते’चा अर्थ आहे. हे असे जीवन असते की, ज्यायोगे मनुष्य त्याचे समग्र अस्तित्व एका वेगळ्या भूमिकेतून स्वीकारतो. समग्र अस्तित्व हे त्याच्या आत्म्याचे या विश्वामधील एक प्रगमनशील (progressive) आविष्करण आहे, अशा भूमिकेतून तो ते स्वीकारतो. आणि […]

आध्यात्मिकता

मन आणि प्राण यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठतर अशा कोणत्यातरी गोष्टीचे अभिज्ञान (recognition) होणे; आपल्या सामान्य मानसिक आणि प्राणिक प्रकृतीच्या अतीत असणाऱ्या विशुद्ध, महान, दिव्य चेतनेप्रत अभीप्सा असणे; आपल्या कनिष्ठ घटकांच्या क्षुद्रतेमधून आणि त्यांच्या बंधनातून बाहेर पडून, आपल्या अंतरंगामध्ये गुप्त रूपाने वसत असलेल्या महत्तर गोष्टीच्या दिशेने, मनुष्यामधील अंतरात्म्याचा उदय आणि त्याचे उन्नयन होणे म्हणजे ‘आध्यात्मिकता’! – श्रीअरविंद […]

आध्यात्मिकता म्हणजे…

‘आध्यात्मिकता’ म्हणजे उच्च दर्जाची बुद्धिमत्ता नव्हे, आदर्शवादही नव्हे, मनाचा तो नैतिक कलही नव्हे किंवा नैतिक शुद्धता आणि तपस्यादेखील नव्हे; आध्यात्मिकता म्हणजे धार्मिकता नव्हे किंवा एक आवेशयुक्त आणि उदात्त भावनिक उत्कटताही नव्हे, किंवा वरील सर्व उत्तम गोष्टींचा समुच्चयही नव्हे. आध्यात्मिक उपलब्धी आणि अनुभूती म्हणजे एक मानसिक विश्वास, पंथ किंवा श्रद्धा, एक भावनिक आस, धार्मिक किंवा नैतिक […]

आध्यात्मिकतेचा अर्थ

अहंकाराव्यतिरिक्त आणखी एका चेतनेविषयी जेव्हा तुम्हाला जाणीव होऊ लागते आणि त्या चेतनेमध्ये तुम्ही जीवन जगायला सुरूवात करता किंवा अधिकाधिक रीतीने तुम्ही त्या चेतनेच्या प्रभावात जीवन जगू लागता तेव्हा ती ‘आध्यात्मिकता’ असते. ही चेतना व्यापक, अनंत, स्वयंभू, अहंकारविरहित अशी असते, या चेतनेला चैतन्य (‘आत्मा, ब्रह्म, ईश्वर’) या नावांनी ओळखले जाते, आणि हाच अनिवार्यपणे ‘आध्यात्मिकते’चा अर्थ असला […]

चेतनेचे परिवर्तन

सामान्य मानवी जीवन हे सर्वसामान्य मानवी चेतनेचे असे जीवन असते की जे, स्वत:च्या खऱ्या ‘स्व’ पासून तसेच ‘ईश्वरा’ पासून विभक्त झालेले असते आणि मन, प्राण, शरीर यांच्या सामान्य सवयींद्वारे, म्हणजेच अज्ञानाच्या नियमांद्वारे या जीवनाचे नेतृत्व केले जाते. …या उलट, आध्यात्मिक जीवन चेतनेच्या परिवर्तनाद्वारे थेटपणे वाटचाल करत असते. स्वत:च्या खऱ्या ‘स्व’ पासून आणि ‘ईश्वरा’पासून विभक्त झालेल्या, […]

,

चेतनेचे केंद्र

(आपल्यामधील) चेतना स्वत:ला कोठे ठेवते आणि ती स्वत:ला कोठे केंद्रित करते यावर सारे काही अवलंबून आहे. चेतना जर स्वत: अहंकाराशी संबंधित राहील किंवा अहंकारामध्ये स्वत:ला ठेवेल तर तुम्ही अहंकाराशी एकरूप होऊन जाता. चेतना जर मनाशी संबंधित राहील किंवा तेथे स्वत:ला ठेवेल तर ती मनाशी आणि त्याच्या क्रियांशी, तत्सम गोष्टींशी एकात्म पावेल. चेतना जर बाह्य गोष्टींवरच […]

, ,

आंतरिक चेतना

माणसामध्ये नेहमीच दोन भिन्न प्रकारच्या चेतना असतात, एक बहिर्वर्ती चेतना – ज्यामध्ये तो जीवन जगत असतो आणि दुसरी आंतरिक, झाकलेली चेतना की ज्याविषयी त्याला काहीच माहीत नसते. जेव्हा व्यक्ती साधना करू लागते तेव्हा, ही आंतरिक चेतना खुली होऊ लागते आणि व्यक्ती अंतरंगामध्ये जाऊन, तेथे सर्व प्रकारचे अनुभव घेऊ शकते. व्यक्तीची साधना जसजशी प्रगत होऊ लागते […]

,

बहिर्वर्ती चेतना आणि आंतरिक चेतना

आपण आपल्या चेतनेच्या पृष्ठभागावरच जीवन जगत असल्याने, आपल्याला केवळ या पृष्ठवर्ती चेतनेचेच भान असते. ही पृष्ठवर्ती चेतना (माणसामधील सर्वसाधारण जाग्रत मन) म्हणजेच आपण आहोत, समग्रत्वाने आपण आहोत असे आपल्याला वाटत असते, कारण आपण केवळ त्या पृष्ठवर्ती भागावरच जाग्रत असल्याने आपल्याला फक्त त्याचीच जाणीव असते. पण अंतरंगामध्ये, आंतरिक अस्तित्व आणि बाह्यवर्ती अस्तित्व यांच्या दरम्यान गूढतेची किंवा […]

इहलोक आणि परलोक

श्रीअरविंदांच्या जन्मापर्यंत, अध्यात्म आणि धर्म हे भूतकाळातील व्यक्तिमत्त्वांभोवती, विभूतींभोवती केंद्रित झालेले होते, आणि ‘पृथ्वीवरील जीवनास नकार’ या उद्दिष्टाकडे ते निर्देश करीत असत. तेव्हा, तुम्हाला दोन पर्यायामधून एकाची निवड करावी लागे : सुखदुःख, आनंद व दु:खभोग यांच्या रहाटगाड्यामध्ये फिरत असलेले, आणि तुम्ही योग्य आचरण केले नाहीत तर, नरकवासाची धमकी देणारे ‘इहलोका’तील जीवन हा एक पर्याय आणि […]