मानवी अस्तित्वाचा संपूर्ण अर्थ
मनुष्यप्राणी, सामान्यतः जसे जीवन जगतो त्या त्याच्या जीवनाची घडण अर्ध-स्थिर, अर्ध-तरल अशा अतिशय अपरिपूर्णतेने शासित झालेल्या विचारांच्या, बोधाच्या, संवेदनांच्या, भावनांच्या, इच्छावासनांच्या, उपभोगांच्या, कृतींच्या गोळाबेरजेतून झालेली असते. या सर्व गोष्टी बहुतांशी रूढ झालेल्या आणि स्वतःहून पुनरावृत्त होणाऱ्या असतात. त्यातील काही गोष्टीच फक्त गतिशील आणि स्व-विकसित होणाऱ्या असतात, पण (कशाही असल्या तरी) त्या सर्वच्या सर्व गोष्टी […]






