Entries by श्रीअरविंद

पूर्ण समाधी अवस्था

साधना, योग आणि रूपांतरण – ७१ (आपण आजवर ‘साधना, योग आणि रूपांतरण’ या मालिकेमध्ये ध्यान म्हणजे काय, एकाग्रता म्हणजे काय, त्याच्या विविध पद्धती कोणत्या, ध्यानामध्ये येणाऱ्या अडथळ्यांवर कशी मात करावी इत्यादी गोष्टी समजून घेतल्या. आता ध्यानाची परिणती ज्या ‘समाधी’मध्ये होत असते त्या समाधी-अवस्थेसंबंधी काही जाणून घेऊया.) समाधी अवस्थेमध्ये असताना, आंतरिक मन, प्राण आणि देह ही […]

ध्यानाच्या वेळी झोप लागण्याच्या प्रवृत्तीबाबत…

साधना, योग आणि रूपांतरण – ७० अगदी पूर्ण शांतपणे बसावेसे वाटणे आणि निद्रेचा अंमल जाणवणे या गोष्टींचे आळस हे कारण नसते. आणि ही समजूत तुम्ही डोक्यातून पूर्णपणे काढून टाका. अविचल, शांत राहावे आणि अंतरंगामध्ये प्रवेश करावा याकडे तुमचा कल वळत आहे, हे त्याचे कारण आहे. साधना जेव्हा काहीशा उत्कटतेने सुरू होते तेव्हा बऱ्याचदा काही काळ […]

ध्यानातील एक अडचण – निद्रा

साधना, योग आणि रूपांतरण – ६९ एखादी व्यक्ती जेव्हा ध्यान करण्याचा प्रयत्न करू लागते तेव्हा अंतरंगामध्ये शिरण्यासाठी, जाग्रत चेतनेचा विलय करण्यासाठी आणि अंतरंगामध्ये, सखोल अशा आंतरिक चेतनेमध्ये जागृत होण्यासाठी तिला एक प्रकारचा दबाव जाणवत असतो. परंतु हा दबाव म्हणजे निद्रिस्त होण्यासाठीचा दबाव आहे अशी समजूत मन सुरुवातीला करून घेते कारण मनाला निद्रा ही एकाच प्रकारची […]

अंतर्मुख आणि बहिर्मुख रितेपण

साधना, योग आणि रूपांतरण – ६८ काल तुम्ही पत्रामध्ये ज्या रितेपणाचे (emptiness) वर्णन केलेत ती गोष्ट वाईट नाही. हे अंतर्मुख आणि बहिर्मुख रितेपण हे बरेचदा नवीन चेतनेकडे जाणारी योगमार्गावरील पहिली पायरी असते. मनुष्याची प्रकृती ही एखाद्या गढूळ पाण्याने भरलेल्या पेल्यासारखी असते. त्यातील गढूळ पाणी फेकून द्यावे लागते आणि तो पेला स्वच्छ करून, त्यामध्ये दिव्य रस […]

साधनेमधील विरामाचे कालावधी

साधना, योग आणि रूपांतरण – ६७ नाउमेद न होता किंवा निराशेच्या गर्तेत जाऊन न पडता अडचणींवर मात करण्यासाठी, (तुम्हाला तुमच्यामध्ये असणाऱ्या) सातत्यपूर्ण उत्कट अभीप्सेचे आणि ईश्वराभिमुख झालेल्या अविचल आणि अढळ इच्छेचे साहाय्य लाभते. परंतु अडीअडचणी येतच राहतात कारण त्या मानवी प्रकृतीमध्येच अंतर्भूत असतात. आंतरिक अस्तित्वामध्ये (ईश्वरविषयक) ओढीचा एक प्रकारे अभाव जाणवत आहे, (त्या दृष्टीने) कोणतीच […]

अभीप्सा आणि नकार

साधना, योग आणि रूपांतरण – ६६ निश्चल-नीरव (silence) स्थितीमध्ये प्रवेश करणे ही सोपी गोष्ट नाही. मानसिक आणि प्राणिक गतिविधींना बाहेर फेकून दिल्यानेच ते शक्य होते. (मात्र) त्या नीरवतेला, त्या शांतीला तुमच्यामध्ये प्रविष्ट होण्यासाठी वाव देणे अधिक सोपे असते. म्हणजे तुम्ही स्वतःला उन्मुख करा, खुले करा आणि तिचे अवतरण होण्यासाठी तिला वाव द्या, हे सोपे असते. […]

विचारांवर नियंत्रण

साधना, योग आणि रूपांतरण – ६५ मन निश्चल-नीरव करण्यासाठी, येणारा प्रत्येक विचार परतवून लावणे पुरेसे नसते, ती केवळ एक दुय्यम क्रिया असू शकते. तुम्ही सर्व विचारांपासून दोन पावले मागे सरले पाहिजे आणि विचार आलेच तर नीरव चेतना या भूमिकेतून त्यांचे निरीक्षण केले पाहिजे, मात्र स्वतःहून विचार करायचे नाहीत किंवा विचारांबरोबर एकरूप व्हायचे नाही अशा रीतीने […]

सक्रिय साक्षात्कार

साधना, योग आणि रूपांतरण – ६४ भौतिक मनाच्या (physical mind) गोंगाटाला, तुम्ही अस्वस्थ न होता, अविचलपणे नकार दिला पाहिजे. इथपर्यंत नकार दिला पाहिजे की तो (गोंगाट) नाउमेद होऊन जाईल आणि मान हलवत निघून जाईल आणि म्हणेल, “छे! हा माणूस फारच शांतचित्त आणि कणखर आहे.” नेहमीच अशा दोन गोष्टी असतात की ज्या वर उफाळून येतात आणि […]

साधनेतील निरसता

साधना, योग आणि रूपांतरण – ६३ (साधना, उपासना काहीच घडत नाहीये असे वाटावे) अशा प्रकारचे कालावधी नेहमीच असतात. तुम्ही अस्वस्थ होता कामा नये, अन्यथा ते कालावधी दीर्घकाळपर्यंत टिकून राहतात आणि साधनेमध्ये अडथळे निर्माण होतात. तुम्ही अविचल राहिले पाहिजे आणि कोणत्याही आवेशाविना स्थिरपणे अभीप्सा बाळगली पाहिजे. किंवा तुम्ही परिवर्तनाच्या दृष्टीने जोर लावत असाल तर तोसुद्धा अविचल, […]

साधनेतील उत्कटता

साधना, योग आणि रूपांतरण – ६२ अभीप्सेच्या शक्तीमधील आणि साधनेच्या ऊर्जेमधील चढ-उतार अटळ असतात. आणि जोवर साधकाचे संपूर्ण अस्तित्व हे रूपांतरणासाठी तयार झालेले नसते तोवर सर्वच साधकांच्या बाबतीत हे चढ-उतार नेहमीचेच असतात. अंतरात्मा जेव्हा अग्रभागी आलेला असतो किंवा तो सक्रिय असतो आणि मन, प्राण त्याला सहमती दर्शवितात तेव्हा तेथे उत्कटता आढळून येते. परंतु अंतरात्मा जेव्हा […]