Entries by श्रीअरविंद

शून्यावस्था आणि अतिमानस

साधना, योग आणि रूपांतरण – ९७ मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण करणारी शक्ती ही अतिमानसिक ‘शक्ती’ असते. ‘सच्चिदानंद’ चेतना – (विशुद्ध सत्-चित्-आनंद) जी सर्वच गोष्टींना निःपक्षपातीपणे आधार पुरवीत असते ती शक्ती रूपांतरण घडवीत नाही. परंतु ‘सच्चिदानंदा’ची अनुभूती आल्यानंतरच (बऱ्याच नंतरच्या टप्प्यावर) अतिमानसाप्रत आरोहण (ascent) आणि अतिमानसाचे अवरोहण (descent) शक्य होते. त्यासाठी प्रथम तुम्ही मानसिक, […]

ईश्वराचे दर्शन

साधना, योग आणि रूपांतरण – ९६ ‘ईश्वरा’चा वैयक्तिक साक्षात्कार हा कधी ‘साकार’ असू शकतो तर कधी तो ‘निराकार’ असू शकतो. ‘निराकार’ साक्षात्कारात, चैतन्यमय ‘दिव्य पुरुषा’ ची ‘उपस्थिती’ सर्वत्र अनुभवास येते. तर ‘साकार’ साक्षात्कारामध्ये, उपासना ज्याला समर्पित केली जाते ‘त्या’च्या प्रतिमेनिशी तो साक्षात्कार होत असतो. भक्तासाठी किंवा साधकासाठी ‘ईश्वर’ नेहमीच स्वतःला सगुणसाकार रूपात आविष्कृत करू शकतो. […]

अतिमानसाची आवश्यकता

साधना, योग आणि रूपांतरण – ९५ पूर्वीच्या प्रचलित योगमार्गांद्वारे जे आत्मशोध घेण्यासाठी प्रयत्नरत असतात ते स्वतःला मन, प्राण आणि शरीर यांपासून वेगळे करतात आणि त्या गोष्टींपासून वेगळे राहून, आत्म्याचा साक्षात्कार करून घेतात. मन, प्राण आणि शरीर यांना परस्परांपासून अलग करणे हे अगदीच सोपे असते, त्यासाठी अतिमानसाची गरज नाही. ते सर्वसाधारण योगमार्गांद्वारे केले गेले आहे. म्हणजे […]

अनुभूती आणि साक्षात्कार

साधना, योग आणि रूपांतरण – ९१ (अनुभव आणि साक्षात्कार या दोन्हीमध्ये काय फरक आहे असा प्रश्न एका साधकाने विचारला असावा असे दिसते तेव्हा श्रीअरविंद यांनी त्यास दिलेले हे उत्तर…) योगमार्गामध्ये घडणाऱ्या गोष्टींचे अनुभव, अनुभूती (experiences) आणि साक्षात्कार (realizations) हे दोन प्रकार असतात. ‘ईश्वरा’चे मूलभूत सत्य, ‘उच्चतर’ किंवा ‘दिव्य प्रकृती’, जगत-चेतना आणि तिच्या विविध शक्तींची लीला, […]

आंतरिक अनुभव

साधना, योग आणि रूपांतरण – ९० तुम्ही बाह्यवर्ती व्यक्तित्वाबद्दल जे म्हणत आहात ते योग्य आहे. तुमच्या आंतरिक प्रकृतीच्या अंतरंगामध्ये जे आहे तेच तुमच्या बाह्य व्यक्तित्वाद्वारे आविष्कृत झाले पाहिजे आणि (त्यानुसार) त्याच्यामध्ये परिवर्तन झाले पाहिजे. परंतु त्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या आंतरिक प्रकृतीचे अनुभव आले पाहिजेत आणि मग, त्यांच्याद्वारे आंतरिक प्रकृतीची शक्ती वृद्धिंगत होते. आंतरिक प्रकृती बाह्यवर्ती […]

अंतरंगामध्ये जीवन जगायला शिका.

साधना, योग आणि रूपांतरण – ८९ तुम्ही तुमच्या अंतरंगामध्ये, स्वतःचे (म्हणजे तुमच्या बाह्यवर्ती प्रकृतीच्या विविध घटकांचे) एकीकरण अधिक दृढपणे केले पाहिजे. तुम्ही जर स्वतःला सतत विखुरत (disperse) राहिलात, आंतरिक वर्तुळ ओलांडून पलीकडे गेलात, तर सामान्य बाह्यवर्ती प्रकृतीच्या क्षुद्रतेमध्ये आणि ती प्रकृती ज्याप्रत खुली आहे अशा गोष्टींच्या प्रभावाखाली तुम्ही सतत वावरत राहाल. अंतरंगामध्ये जीवन जगायला शिका. […]

आंतरिक प्रकाश व श्रवण

साधना, योग आणि रूपांतरण – ८८ (ध्यानावस्थेत प्रकाश दिसल्याचे एका साधकाने श्रीअरविंद यांना कळविले तेव्हा त्यांनी दिलेले हे उत्तर….) प्रकाश अनेक प्रकारचे असतात. अतिमानसिक, मानसिक, प्राणिक, शारीरिक, दिव्य किंवा असुरी असे सर्व प्रकारचे प्रकाश असतात. त्यांच्याकडे तुम्ही लक्षपूर्वक पाहिले पाहिजे, अनुभवांच्या आधारे प्रगल्भ होत गेले पाहिजे आणि त्या प्रत्येकामधील फरक ओळखायला शिकले पाहिजे. खऱ्या प्रकाशांच्या […]

योगसाधना करण्याची आवश्यकता

साधना, योग आणि रूपांतरण – ८७ (बाह्यवर्ती चेतना आणि आंतरिक अस्तित्व यांच्यामधील अडथळा भेदला गेला की काय होते याचा काहीसा विचार आपण कालच्या भागात केला.) कोणत्या न् कोणत्या पद्धतीने एकदा का तो अडथळा मोडून पडला की मग तुम्हाला असे आढळू लागते की, योगासाठी आवश्यक असणाऱ्या प्रक्रिया आणि गतिविधी या गोष्टी तुमच्या बाह्य मनाला जितक्या कठीण […]

अंतरात्मा अग्रस्थानी आल्यावर…

साधना, योग आणि रूपांतरण – ८६ (रूपांतरण करू इच्छिणाऱ्या साधकासाठी आपल्या आंतरिक प्रांतांविषयी सजग होणे कसे महत्त्वाचे असते हे आपण कालच्या भागात पाहिले.) तुम्ही जर तुमच्या बाह्य ‘स्व’ शीच जखडून राहिलात, तुमच्या शारीर-मनाशी आणि त्याच्या क्षुल्लक हालचालींशी स्वतःला बांधून ठेवलेत, तर तुमची अभीप्सा कधीच प्रत्यक्षात उतरू शकणार नाही. बाह्य अस्तित्व हे आध्यात्मिक प्रेरणेचा स्रोत नसते, […]

आंतरिक प्रांताविषयीची जागरूकता

साधना, योग आणि रूपांतरण – ८५ (चेतना अंतराभिमुख झाल्यावर साधकाला कोणकोणते अनुभव येतात हे कालच्या भागात आपण समजावून घेतले.) साधकाने हे समजून घेतले पाहिजे की, हे अनुभव म्हणजे नुसत्या कल्पना नसतात किंवा स्वप्नं नसतात, तर त्या वास्तव घटना असतात. आणि जसे बऱ्याचदा घडते त्याप्रमाणे जरी त्या गोष्टी म्हणजे अगदी, नुसत्या मनोरचना असल्या, जरी त्या अगदी […]