Entries by अभीप्सा मराठी मासिक

हुजीको

१९१६ ते १९१९ या काळात मीरा अल्फांसा (श्रीमाताजी) जपानमध्ये वास्तव्यास होत्या. त्या काळातील त्यांची जिवश्चकंठश्च मैत्रीण कोबायाशी यांनी श्रीमाताजींविषयी सांगितलेल्या आठवणी. जपानी भाषा शिकण्यासाठी आणि आमच्यातील एक होऊन जाण्यासाठी त्या आमच्याकडे आल्या; पण त्यांच्या मोहक आणि नावीन्यपूर्ण वागणुकीतून आम्हालाच कितीतरी शिकायला मिळाले. मोठी गोड मैत्रीण होती ती. फार हुशार, अत्यंत तल्लख, उत्तम कलावंत, तिच्या बोटांवर […]

,

अभीप्सा ०२

मानवामध्ये उपजतच आध्यात्मिक आस असते; कारण पशुंमध्ये नसणारी अपूर्णतेची आणि मर्यादांची जाणीव त्याच्यामध्ये असते आणि तो आज जे काही आहे त्याच्या पलीकडे प्राप्त करण्याजोगे काहीतरी आहे, हे ही त्याला जाणवत असते. स्वत:च्या पलीकडे जाण्याची ही उर्मी मानववंशामधून पूर्णपणे कधीही नाहीशी होत नाही. जडामधून, विकसित अशा विचारी मनाचा उदय होण्याची आजवर झालेली वाटचाल ही आत्मभान असणाऱ्या […]

अतिमानसाचे अवतरण : एक सुवर्णदिन

(०१ जानेवारी १९६९ रोजी अतिमानस चेतनेचे पृथ्वीवर आविष्करण झाले; त्याचा प्रारंभच एक प्रकारे १९५६ साली घडलेल्या खालील प्रसंगामध्ये झाला होता. त्या दिवशी अतिमानस चेतनेने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला.) ती २९ फेब्रुवारी १९५६ ची संध्याकाळ होती. श्रीमाताजी प्लेग्राऊंडवर उपस्थित होत्या. त्यांनी ‘Synthesis of Yoga’ मधील एक उतारा वाचून दाखविला, त्यावरील प्रश्नोत्तरांनंतर सारे ध्यानस्थ झाले. ध्यानामध्ये जे […]

दिव्य प्रेम

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. अरेबियाच्या वाळवंटी प्रदेशामध्ये एक दिव्य जीव जन्माला आला.या पृथ्वीतलावर लोकांमध्ये ईश्वरी प्रेमभावना जागृत करावी, ह्या हेतूने त्याने जन्म घेतला होता. पण लोकांना त्याच्या पाठीमागची उदात्त भावना समजू शकली नाही, लोकांचा गैरसमज झाला, त्यांनी त्याच्यावर संशय घेतला, ते हात धुऊन त्याच्या पाठीमागे लागले. लोकांनी त्याच्यावर अनैतिकतेचे आरोप केले. सरतेशेवटी, यासर्वांपासून […]

अलेक्झांड्रा डेव्हिड नील आणि वाघ

‘ल्हासा’ या गावामध्ये प्रवेश करणाऱ्या श्रीमती अलेक्झांड्रा डेव्हिड नील ह्या पहिल्या युरोपियन बुद्धमार्गी महिला होत्या. त्यांचा तिबेटचा प्रवास खूप कष्टप्रद होता. नील जेव्हा एका जथ्याबरोबर तिबेटकडे जायला निघाल्या होत्या. तेव्हाची ही गोष्ट आहे. त्याकाळात इंडो-चायना मार्गे तिबेटमध्ये जाणे तुलनेने सोपे असल्याने नील त्या मार्गाने निघाल्या होत्या. नरभक्षक वाघांची वस्ती असलेल्या जंगलातून त्यांची वाट जात होती. […]

नियमनकर्ता चैत्य पुरुष

श्रीमाताजींना त्यांच्या एका निकटवर्ती शिष्याने विचारले, “माताजी, तुमचा चैत्य पुरुष तुमच्या जीवनाचे संपूर्णतया नियमन करत आहे, असा अनुभव तुम्हाला पहिल्यांदा कधी आला?” श्रीमाताजी म्हणाल्या, “ही खूप जुनी गोष्ट आहे. मला वाटते ते बहुधा १९०४ साल असावे. एके दिवशी माझ्या भावाच्या मित्रामुळे माझी मार्क थिऑन यांच्याशी भेट झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा मी त्यांना भेटले तेव्हा, […]

चैत्य अस्तित्वाचा पहिला अनुभव

चैत्य अस्तित्वाचा श्रीमाताजींना आलेला पहिला अनुभव त्या त्यांच्या एका निकटवर्ती शिष्याला सांगत आहेत. तो अनुभव असा – मला तो अनुभव इ.स. १९१२ साली आला. पुढील सर्व वाटचालीसाठी आधारभूत असणारा हा पहिला अनुभव आहे. परंतु ह्या अनुभवापर्यंत पोहोचायला मला संपूर्ण एक वर्ष लागले. मी खाता-पिता, उठता-बसता ‘आंतरिक अस्तित्वाशी एकत्व’ हा एकच ध्यास घेतला होता. मला दुसरे […]

जपानमधील एक प्रसंग

एक जण मानवी एकतेचा प्रचार करण्यासाठी जगप्रवास करीत होता. मीरा जपानमध्ये असताना, तिची त्या व्यक्तीशी टोकियो येथे भेट झाली. “अमुक अमुक झाले तर किती बरे होईल? प्रत्येकजण सुखी होईल, प्रत्येक जण दुसऱ्याला समजून घेऊ शकेल, कोणीही कोणाशी भांडणार नाही.” अशा कल्पनेचा प्रचार करीत तो जगभर हिंडत असे. लोक त्याला त्याचे नाव विचारत, तेव्हा तो सांगत […]

बालकासमान विश्वास

तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती अशी की, अंधारा काळ हा अपरिहार्य आहे. जेव्हा तुमच्यातील चैत्य सक्रिय असतो तेव्हा कोणत्याही स्पष्ट कारणाविना तुम्हाला एक प्रकारचा आनंद जाणवतो. तो काही काळ तसाच टिकून राहतो आणि परत कोणत्यातरी मानसिक किंवा प्राणिक प्रतिक्रिया उमटतात आणि परत मग तुम्ही त्याच त्या अंधारात जाऊन पडता. हे काही काळ चालत […]

निश्चलता

श्रीअरविंद एकांतवासात असताना, श्रीअरविंदांचे १९२६ ते १९५० या कालावधीमध्ये एकही छायाचित्र काढण्यात आले नाही. आणि नियतीची योजना कशी असते पाहा; १९५० साली म्हणजे ज्यावर्षी श्रीअरविंदांनी देह ठेवला त्यावर्षी श्री. कार्टिअन ब्रेसन हे सुप्रसिद्ध छायाचित्रकार आश्रमात आले होते. आश्रमात आल्यानंतर त्यांनी श्रीमाताजींना श्रीअरविंदांचे छायाचित्र घेण्याविषयी परवानगी मागितली. श्रीमाताजींनी मला बोलावून सांगितले, “मी श्री. ब्रेसन यांना छायाचित्र […]