ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

देशाची फाळणी आणि भारताचे भवितव्य

 

(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला पुढील संदेश तिरूचिरापल्लीच्या ‘ऑल इंडिया रेडिओ’ वरून प्रसारित करण्यात आला. त्या भाषणातील हा दुसरा भाग…)

भारत स्वतंत्र झाला आहे पण त्याला एकात्मता साध्य झालेली नाही; एक भंगलेले, विदीर्ण झालेले स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. एकवेळ तर असे वाटून गेले की, भारत पुन्हा एकदा ब्रिटिशांच्या सत्तेपूर्वी जसा विभिन्न संस्थानांमध्ये विभागलेला होता तशाच अराजकतेमध्ये जाऊन पडतो की काय. परंतु सुदैवाने हे विनाशकारी पुनर्पतन टाळता येईल अशी एक दाट शक्यता अलीकडे विकसित झाली आहे. ‘संविधान सभे’च्या (Constituent Assembly) समजुतदार, मूलगामी धोरणामुळे उपेक्षित वर्गाच्या समस्या या कोणत्याही मतभेदाविना वा फाटाफूटीविना दूर होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

परंतु हिंदु आणि मुस्लीम यांतील जुने सांप्रदायिक भेद होते त्याचे आता देशाच्या कायमस्वरूपी राजकीय विभागणीत रूपांतर होऊन ते अधिक दृढमूल झालेले दिसत आहेत. काँग्रेस (तत्कालीन) आणि राष्ट्र, आत्ता तोडगा निघालेली ही परिस्थिती म्हणजे एक तात्पुरता उपाय आहे, आणि तो कायमचा उपाय नाही, हे लक्षात घेतील, अशी आशा आहे. कारण असे झाले नाही तर, भारत गंभीररीत्या दुर्बल होईल, कदाचित लुळापांगळाही होईल : अंतर्गत कलहाची शक्यता तर कायमच भेडसावत राहील, किंवा कदाचित एखादे नवे आक्रमण वा परकीय सत्तेचा विजय या धोक्याची शक्यताही संभवते.

देशाची ही फाळणी नष्ट व्हायलाच पाहिजे. दोन्ही देशांमधील ताणतणाव कमी करून, शांती आणि सद्भाव यांविषयीच्या गरजेबद्दलची चढतीवाढती जाणीव बाळगून, एकत्रित आणि एकदिश होऊन केलेल्या कृतीची वाढती गरज लक्षात घेऊन, किंवा याच हेतूसाठी अस्तित्वात आलेल्या एकात्मतेच्या साधनाद्वारे ही फाळणी नष्ट होईल, अशी आशा बाळगता येईल. कोणत्याही रूपामध्ये, कोणत्याही प्रकारे का असेना अशा रितीने एकात्मता घडून येऊ शकते; त्याचे नेमके अचूक रूप हे व्यावहारिक असण्याची शक्यता आहे पण ते काही फारसे महत्त्वाचे नाही. कोणत्याही मार्गाने का असेना ही भेदात्मकता, ही फाळणी नाहीशी व्हायलाच पाहिजे आणि ती नाहीशी होईलच. कारण त्याविना भारताचे भवितव्य हे खरोखर दुर्बल आणि निराशाजनक असेल. परंतु ते कदापिही तसे असता कामा नये. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 36 : 475 – 476)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

श्रीअरविंद याच्या दिव्य दृष्टीसमोरील पाच ध्येयं

  (भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला…

2 days ago

भारताचे जीवितकार्य – प्रास्ताविक

  अखिल सृष्टीसाठी असलेल्या दिव्य योजनेमध्ये भारताला मध्यवर्ती भूमिका बजावावी लागणार आहे, हे श्रीअरविंद आणि…

3 days ago

अनंत व चिरंतन किरणांचे आविष्करण

(श्रीमाताजीकृत प्रार्थना) १० एप्रिल १९१४ अचानकपणे पडदा भेदला गेला आणि समोर विस्तीर्ण क्षितिज खुले झाले…

4 days ago

साधनेची दुसरी बाजू

(श्रीअरविंद यांनी कुमारी मार्गारेट वुड्रो विल्सन यांना दिलेल्या पत्रोत्तरामधील काही भाग आपण गेले दोन दिवस…

5 days ago

साधना आणि एकाग्रता

(श्रीअरविंद यांनी कुमारी मार्गारेट वुड्रो विल्सन यांना दिलेल्या पत्रोत्तरामधील काही भाग आपण विचारात घेतला. आज…

6 days ago

आपले जीवितकार्य

(कुमारी मार्गारेट वुड्रो विल्सन यांनी श्रीअरविंद यांना लिहिलेले पत्र आपण काल विचारात घेतले. आज आपण…

7 days ago